मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.
जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे.
पहिल्या वर्षात घेतलेल्या काळजीने व मिळालेल्या प्रेमाने मूल भरभरून वाढते. त्याच्या वाढीसाठी व भावनिक विकासासाठी त्याला प्रेमाने जवळ घेणे तसेच त्याच्याशी बोलणे फार महत्वाचे असते. आईच्या कुशीत असल्याने व गरजेनुसार स्तनपान मिळाल्यावर बाळाला सुरक्षित वाटते.
मुले व मुली यांच्याय शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक गरजा सारख्याच असतात, शिवाय दोघांची शिकण्याची क्षमतादेखील सारखीच असते. मुले व मुली दोघांना ही प्रेम व कौतुकाची सारखीच गरज असते.
आपली एखादी गरज सांगण्यासाठी रडणे ही मुलांची एक पध्दत आहे. अशावेळी त्यास जवळ घेऊन प्रेमाने बोलून त्याचे सांत्वन केल्यास विश्वासाचे व सुरक्षिततेचे नाते निर्माण होते.
फिकुटलेली, कुपोषित किंवा बहुतेक आजारी मुले नंतर घाबरट आणि उदास बनतात व इतर सर्वसामान्य मुलांमध्ये दिसणारा खेळण्याचा, शिकण्याचा व इतरांशी बोलण्याचा उत्साह त्यांच्यात आढळत नाही.खाण्यासाठीदेखील त्यांना विशिष्ट पद्धतीने प्रवृत्त करावे लागते.
मुलांमध्ये दिसणार्या भावना वास्तविक व सशक्ता असतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर त्यांना विलक्षण दुःख होते. मुले साधारणापणे अंधाराला किंवा अनोळखी व्यक्तींना घाबरतात. मुलांच्या मताची किंवा भावनांची टिंगल केली, दुर्लक्ष केले किंवा त्याबद्दल त्यांना शिक्षा केली तर मोठेपणी अशी मुले लाजाळू किंवा घाबरट बनतात तसेच त्यांना आपल्या भावना नीटपणे व्यक्त करता येत नाहीत. मुलांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी संयमाने व सहानुभूतीने परिस्थिती हाताळल्यास अशी मुले आनंदी बनतात व त्यांची मनस्थिती संतुलित राहते.
मुलांना शारीरिक शिक्षा केल्याने किंवा त्यांच्यासमोर हिंसेचा उद्रेक झाल्यास मुलांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. रागाच्या भरात शिक्षा केली गेलेली मुले कालांतराने स्वतःच हिंसक बनतात. मूल त्याच्या कुटुंबाचा व समुदायाचा एक परिपूर्ण घटक बनण्यासाठी कुटुंबातील वागण्याबोलण्याची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट असणे व त्याचबरोबर मुलास त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल बक्षीस किंवा उत्तेजन देणे गरजेचे आहे.
मुलांची काळजी घेण्यामध्ये आई-वडील अशा दोघांचाही सहभाग, कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर असणे आवश्यक आहे. वडिलांची भूमिका येथे अधिक महत्वाची आहे. मुलाची प्रेमाची व प्रोत्साहनाची गरज भागवण्याबरोबरच चांगले शिक्षण, पोषक आहार व आरोग्य संगोपन पुरवण्याचे काम वडील करू शकतात. मुलाभोवतीचे वातावरण सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणे पित्यास शक्य आहे. घरातील स्त्री गर्भवती असताना किंवा मुलास दूध पाजत असताना वडिलांनी घरातील कामे करू शकतात.
जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात होणारा आईचा स्पर्श व मिळणारे आईचे दूध ह्यामुळे बालकाचे व आईचे नाते घट्ट होऊन चांगल्या विकासास व वाढीस चालना मिळते.
स्पर्श, ऐकणे, वास येणे, पाहणे व चव घेणे ह्या पाच गोष्टींद्वारे मूल त्याच्याभोवतीच्या जगाचा अभ्यास करू लागते.
मुलांशी बोलण्याने, त्यांना स्पर्श केल्याने व जवळ घेण्याने, परिचित चेहरे दिसल्याने, ओळखीचे आवाज ऐकू आल्याने व विविध वस्तू हाताळण्यामुळे त्यांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. जन्मापासूनच सुरक्षित वातावरण व प्रेम मिळाल्याने आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याभने मुले वेगाने शिकतात. सुरक्षिततेची ही भावना मिळालेली मुले शाळेत चांगली प्रगती दाखवतात तसेच जीवनातील अडचणींवर सामान्यळत: अधिक चांगल्या प्रकारे मात करू शकतात.
पहिले 6 महिने, बाळाच्या इच्छेनुसार पाजलेले आईचे दूध, सहा महिने वयानंतर मिळणारा सुरक्षित व पोषक असा पूरक आहार व त्याचबरोबर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत चालू ठेवलेले स्तनपान ह्यामुळे मुलांची तब्येत तर चांगली राहतेच शिवाय त्यांना आईचे प्रेमदेखील लाभते.
मुलांच्या वाढी व विकासासाठी सर्वांत महत्वाचा मार्ग म्हणजे त्यांचा इतरांशी येणारा संपर्क. पालक व संगोपनकर्ते जितक्या जास्त वेळा मुलाशी बोलतील आणि त्याच्या शंकांना प्रतिसाद देतील तितके ते अनेक गोष्टी चटकन शिकेल. पालकांनी किंवा संगोपनकर्त्यां नी बालकाशी बोलणे, गाणे म्हणून किंवा वाचून दाखवणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्यक्ष शब्दार्थ समजला नाही तरी अशा तर्हेच्या ‘संवादा’ द्वारे त्यांची भाषाकौशल्ये व आकलनक्षमतेचा विकास होतो.
संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी.
लहान मुलांना फार काळ एकटे सोडू नये. अशाने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते.
मुलींना मुलांइतकेच जेवण लागते व मुलांइतकीच त्यांनादेखील प्रेमाची, वात्सल्याची गरज असते. नवीन गोष्ट शिकल्यास, करून दाखवल्यास सर्व मुलांचे कौतुक करावे व त्यांना उत्तेजन द्यावे.
मुलांची शारीरिक व मानसिक वाढ योग्य रीतीने होत नसल्यास पालकांनी आरोग्यसेवकाचा सल्ला घ्यावा.
मुलांना पहिल्यांदा त्यांच्या मातृभाषेमधून शिक्षण दिल्याने स्वतःच्या भावना व्यक्त करणे त्यांना सोपे जाते. गाणी, गोष्टी, खेळ व कवितांमधून मुले भाषा चटकन शिकतात.
पोषणयुक्त आहार मिळालेली व वेळेवर लसीकरण झालेली मुले सहसा आजारी पडत नाहीत व त्यांची खेळण्याची, शिकण्याची व परस्परसंवादाची क्षमतादेखील बळावते. ह्यामुळे त्या कुटुंबाचा आरोग्यसेवांवर खर्च होणारा एकंदर पैसा तर वाचतोच शिवाय आजारपणामुळे मूल शाळेत न जाण्याचे प्रमाण कमी होऊन, आजारी मुलाची काळजी घेण्यामधील पालकांचे श्रम वाचतात तसेच त्यांनादेखील आजारी मुलासाठी रोजगार बुडवून घरी थांबावे लागत नाही.
मुले मौजमस्ती करण्यासाठी खेळतात, पण ह्या खेळण्यामधूनच त्यांचे शिक्षण व विकास मोठ्या प्रमाणावर होत असतो. खेळण्याने त्यांचे ज्ञान, अनुभव व आत्मविश्वास वाढून कुतूहल जागृत होते.
मुले एखादी गोष्ट नाना प्रकारे करून पाहतात, परिणामांची तुलना करतात, त्यासंबंधी प्रश्न विचारतात, समस्यांचा तोंड देतात व ह्यामधूनच ती शिकतात. खेळांमुळे त्यांचे भाषा व विचारसामर्थ्य, निर्णयक्षमता, योजकता व संघटनकौशल्य वाढते. अपंग मुलास खेळण्याकरता प्रवृत्त करणे त्या मुलासाठी फार महत्वाचे ठरते.
खेळण्याची व कुटुंबियांसोबत सुसंवाद साधण्याची मुलामुलींची गरज सारखीच असते. विशेषतः वडिलांबरोबर खेळल्याने परस्पसरांमध्येु स्नेहबंध अधिक सशक्ता होतो.
पालक किंवा संगोपनकर्त्यांणनी मुलास स्पष्ट सूचना देऊन त्यांच्याकडून सरळसाधी कामे करवून घ्यावी, खेळायला वस्तू किंवा खेळणी द्यावी, करण्यासाठी नवीन गोष्टी सुचवाव्या पण मुलाच्या खेळावर अंमल बजावण्याचा प्रयत्न करू नये. मुलाचे जवळून निरीक्षण करा आणि मुलाचे म्हणणे व कल्पना माना.
अगदी लहान मूल एखादी गोष्ट कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच करण्याचा हट्ट धरते तेव्हा संगोपनकर्त्यांानी संयमित राहणे आवश्य क आहे अशावेळी, मुलास थेट धोका पोहोचत नसल्यास, त्यास ते काम करू द्यावे. कारण एखादे नवीन व कठिण काम पार पाडण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्या मुलाच्या विकासाचे सकारात्मक पाऊल आहे.
विकासाच्या विविध टप्प्यांवर मुलास योग्य त्या वेगवेगळ्या वस्तू खेळण्यासाठी पुरवाव्या. माती, वाळू, पाणी, पुठ्ठ्याची खोकी, लाकडी ठोकळे, डब्यांची झाकणे ह्या वस्तूंशीदेखील मुले, दुकानातून विकत आणलेल्या खेळण्याप्रमाणेच खेळू शकतात.
मुलांमध्ये सारखा बदल होत असतो व त्यांमध्ये नवनवीन क्षमता उत्पन्न होत असतात. संगोपनकर्त्यांानी हे बदल ध्यानात घेऊन तिचा किंवा त्यावचा विकास लवकर होण्यापस मदत करावी.
इतरांचे निरीक्षण करून व त्यांच्याप्रमाणे वागण्यामधून मुले समाजात कसे मिसळावे हे शिकतात. तसेच कशाप्रकारची वागणूक स्वीकारली जाते व कोणती नाही हेदेखील त्यांना समजते.
मुलाच्या वागण्याबोलण्यास व व्यक्तिमत्वास आकार देणारे महत्वाीचे उदाहरण म्हणजे त्याच्या आसपासच्या मोठ्या माणसांचे व वयाने मोठ्या मुलांचे वागणे होय. मुले इतरांच्या वागण्याचे अनुकरण करतात, लोक जे सांगतात त्याचे नव्हे. पालकांनी आरडाओरडा किंवा मारहाण केल्यास मुले तसे वागायला शिकतात. मोठ्यांचे इतरांशी वागणे सौजन्याचे, आदराचे व संयमाचे असल्यास मुले त्याचे अनुकरण करतात.
मुलांना दुसर्याची भूमिका वठवणे किंवा ढोंगीपणा करणे आवडते. हे देखील त्यास करू द्यावे कारण ह्यामधून त्यास इतरांची विचारसरणी समजून घेण्याेस आणि स्वीदकारण्या स मदत मिळते.
पालकांना व संगोपनकर्त्यांयना मुलाच्या विकासामधील महत्वाचे टप्पे माहीत असणे आवश्यक आहे. मुलामध्ये शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असल्यास ते ओळखून वेळेवर तज्ञांची मदत घेणे व अशा मुलास प्रेमाने काळजीपूर्वक वाढवणे गरजेचे असते.
सर्व मुले सारख्याच पध्दतीने वाढतात, पण प्रत्येक मूल त्याच्या् किंवा तिच्यात स्वत:च्या दराप्रमाणे विकसित होते.
ऐकणे, पाहणे व स्पर्श ह्या गोष्टींना मुलाकडून मिळणार्या प्रतिसादांचे निरीक्षण करून पालकांना किंवा संगोपनकर्त्यांना विकासामधील भविष्यकालीन समस्यांची किंवा पंगुत्वाची पूर्वसूचना मिळू शकते. मुलाचा विकासदर मंद असल्यास पालकांनी अशा मुलासोबत अधिक वेळ घालवावा, त्याच्याशी बोलावे, खेळावे व त्यास मसाज करावा (अंग चोळावे).
मूल जर त्यास मिळणार्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देत नसेल तर पालकांनी आणि संगोपनकर्त्यां नी तज्ञांचा सल्ला घ्यावा. अपंगत्व फार वाढण्यापूर्वीच वेळेवर उपचार सुरू करणे फार आवश्य क आहे. पालकांनी व संगोपनकर्त्यां नी मुलाकडे असलेल्या क्षमतांचा पुरेपूर विकास होण्याहस प्रोत्सा हन द्यावे.
अपंग मुलास किंवा मुलीस अधिक प्रेमाची व संरक्षणाची गरज असते. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे, अशा मुलाची जन्मनोंदणी करणे, त्यास आईने स्वतःचे दूध पाजणे, लसीकरण करणे व त्यास पोषणयुक्त अन्न देऊन छळ किंवा दुर्वर्तनापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. तसेच अशा मुलांना इतर सर्वसामान्य मुलांबरोबर खेळण्यासस प्रोत्सा हन द्यावे.
मनाने दुःखी असलेले किंवा मानसिक तणावाखाली असलेले मूल कधीकधी जगावेगळे वागते. अशी मुले अचानक मैत्री तोडतात, दुःखी, आळशी किंवा खोडकर बनतात. सारखी रडतात, इतर मुलांना मारतात. खेळण्यासऐवजी एकटे बसून राहतात, त्यांचा शाळेतील उत्साह कमी होतो. त्यांची भूक व झोपदेखील कमी होते.
खालील मार्गदर्शकामधून पालकांना मुलांच्या विकासासंबंधीच्या काही गोष्टी स्पष्ट होतील. सर्व मुलांच्या वाढ व विकासदरामध्ये थोडाफार फरक असतोच. काही मुलांमध्ये हळूहळू प्रगती होणे देखील सर्वसामान्य असू शकते तर काही वेळा पोषक अन्नाचा अभाव, नाजूक तब्येत, प्रेरणेचा अभाव अशी वा ह्यापेक्षा गंभीर कारणे देखील त्यामागे असू शकतात. पालकांनी शिक्षक किंवा प्रशिक्षित आरोग्यसेवका बरोबर मुलाच्या प्रगतीची चर्चा करावी.
वय एक महिना असताना बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत -
पालकांसाठी व संगोपनकर्त्यांस सल्ला -
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष ठेवा:
बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
पालक व संगोपनकर्त्यांसाठी सल्ला:
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष ठेवा:
बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
पालक व संगोपनकर्त्यांस सल्ला:
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष ठेवा:
बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
पालक व संगोपनकर्त्यांस सल्ला:
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष ठेवा:
मुलास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत -
पालक व संगोपनकर्त्यांस सल्ला:
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष द्या:
मुलास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
पालक व संगोपनकर्त्यांसाठी सल्ला:
धोक्याच्या संकेतांकडे लक्ष द्या:
स्त्रोत : UNICEF
अंतिम सुधारित : 6/25/2020
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...