आरोग्यासंबंधी माहिती देणे आणि त्यावर कार्य करणे का आवश्यक आहे?
मुलांमध्ये बहुतेक रोग आणि मृत्युच्या घटना घाणेरड्या हातांनी खाल्ल्याने, किंवा घाणेरडे पदार्थ खाण्याने होतात. यांपासून त्यांच्या तोंडावाटे शरीरात पुष्कळसे रोगजंतु जातात. मानव आणि पशुंच्या मलापासून देखील हे येतात.
चांगल्या आरोग्य सवयींमुळे विशेषत: डायरिया पासून बचाव होऊ शकतो. सर्व प्रकारचा मल शौचकूप किंवा शौचालयात फेकणे, मुलांच्या मलाशी संपर्क झाल्यानंतर किंवा मुलांना खायला देण्याआधी किंवा खाद्यपदार्थांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबण आणि पाण्यासह चांगले धुवून घ्यावेत. किंवा राख आणि पाण्या बरोबर धुतले तरी चालतात. कोणता ही मल चांगल्या प्रकारे साफ करणे, आणि पशुंचा मल घर, रस्ता, विहीर, आणि मुलांच्या के खेळायच्या जागेपासून खूप दूर ठेवावा.
सर्वांनी एकत्रित होऊन शौचकूप आणि संडास बनवावे आणि त्याचा वापर करणे, जलस्त्रोतांचे संरक्षण करणे आणि कचरा तसेच घाण पाणी या सारख्या वस्तूंची सुरक्षित विल्हेवाट लावायची आवश्यकता सामाजिक आहे. सरकारांच्या द्वारे समाजाला स्वस्त दरात शौचकूप आणि संडास बनविण्यासाठी आवश्यक सूचना देधे फार आवश्यक आहे कारण हे सर्व कुटुंबाच्या द्वारे वहनीय आहे. नागरी क्षेत्रांत, अल्प-व्ययीन (कमी खर्चिक) ड्रेनेज सिस्टम आणि स्वच्छतेची व्यवस्था, सुधारित पेय-जलापूर्ती आणि कचरा गोळा करणे यां सारख्या कामांसाठी सरकारी मदतीची गरज असते.
प्रत्येक कुटुंब आणि समाजाला आरोग्याच्या बाबतीत जाणून घेण्याचा अधिकार आहे का
- सर्व प्रकारच्या मलाची सुरक्षित विल्हेवाट लावायला हवी. शौचकूप किंवा संडास सर्वांत चांगला विकल्प आहे.
- कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी, ज्यांमध्ये मुलांचा ही समावेश आहे, मल संपर्कानंतर, खाण्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि मुलांना दूध पाजण्याआधी, आपले हात खूप चांगल्या प्रकारे साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्या बरोबर धुणे हे फार आवश्यक आहे.
- साबण आणि पाण्याने रोज चेहरा धुतल्याने डोळ्यांच्या संसर्गापासून बचाव होतो. विश्वाच्या पुष्कळशा भागांमध्ये, डोळ्यांचा संसर्ग ट्रॅकोमाकडे नेतो ज्याने अंधत्व येऊ शकते.
- पाणी एखाद्या सुरक्षित स्त्रोतापासूच घ्यावे किंवा शुध्द केलेले पाणी वापरावे. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याच्या भांड्यांना झाकून ठेवावे हे आवश्यक आहे.
- कच्चे किंवा उरलेले खाणे धोक्याचे ठरू शकते. कच्चे पदार्थ नीट शिजवून खावे. शिजविलेले अन्न पूर्णपणे गरम करून उशीर केल्याविना खावे.
- खाद्यपदार्थ, भांडी आणि स्वयंपाकाची भांडी ठेवण्याच्या जागा नेहमी स्व्च्छ ठेवाव्यात. खाद्यपदार्थ नेहमी झाकून ठेवावे. घरातील सर्व कचÚयाची सुरक्षित विल्हेवाट लावायला हवी कारण यांमुळे रोगांपासून बचाव होतो.
- सर्व प्रकारच्या घरगुती घाणीची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावल्याने रोगांपासून बचाव होतो.
सहाय्यक माहिती : आरोग्य
महत्वपूर्ण संदेश : सर्व मल सुरक्षिततेसह फेकायला हवा. शौचकूप किंवा संडास सर्वोतम मार्ग आहे.
- पुष्कळसे रोग, विशेषत: अतिसार (डायरिया), मानवी मलामध्ये आढळणार्या या रोगजंतुंमुळे होतात. जर रोगजंतु जेवण, किंवा पाणी, हात, भांडी, किंवा स्वयंपाकाच्या जागी पोचले तर ते तोंडावाटे गिळले ही जाऊ शकतात, आणि या रोगाचा प्रसार करू शकतात.
- रोगजंतुंचा प्रसार थांबविण्यासाठी सर्वात उत्तम एकमात्र उपाय आहे सर्व मलाची—मानव किंवा पशुंचा – सुरक्षित विल्हेवाट लावावी. मानव मल शौचकूप किंवा शौचालयात टाकून द्यावा. संडास नेहमी स्वच्छ ठेवावे. पशुंचा मल घर, रस्ते आणि मुलांच्या खेळायच्या जागेपासून खूप दूर ठेवायला हवा.
- जर शौचकूप किंवा संडासाचा उपयोग करणे शक्य नसेल तर, सर्वांनीच घर, रस्ते, पाण्याचे स्त्रोत आणि मुलांच्या खेळायच्या जागेपासून खूप दूर जाऊन मलत्याग करावा आणि मल ताबडतोब पुरून टाकावा.
- सर्व प्रकारचा मल, अगदी लहान मुलांचा ही, रोगजंतुंचे स्थानांतरण करतो आणि म्हणून धोक्या आहे. जर मुले शौचकूप किंवा संडासाविना, लॅट्रिन किंवा पॉटीविना मलत्याग करतात तर त्यांचा मल ताबडतोब शौचकूप किंवा संडासात टाकून द्यावा किंवा पुरून टाकावा.
- लॅट्रिन आणि संडास नेहमी स्वच्छ ठेवावेत. लॅट्रिन झाकून ठेवावी आणि शौचकूपांमध्ये फ्लश चालवायला हवा.
- स्थानिक सरकार आणि एनजीओ कमी खर्चात सॅनिटरी लॅट्रिन बनविण्याचा सल्ला देऊन समुदायांची मदत करू शकतात.
महत्वपूर्ण संदेश : मुलांसहित, कुटुंबांच्या सर्वच सदस्यांसाठी, मलाशी संपर्क झाल्या नंतर, जेवणास स्पश्र करण्याआधी आणि मुलांना खायला प्यायला देण्याआधी, हात साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्याबरोबर चांगल्या प्रकारे धुणे आवश्यक आहे.
हात साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्याबरोबर चांगल्या प्रकारे धुतल्याने रोगजंतु निघून जातात. फक्त बोटेच खंगाळून काम चालत नाही तर हात साबण किंवा राखेने धुवायला हवेत. कारण रोगजंतु आणि घाण तोंडात जाण्यापासून बचाव होतो. हात धुतल्याने कृमिसंसर्ग देखील दूर राहतात. साबण आणि पाणी किंवा राख आणि पाणी शौचालयांच्या बाहेर सोयीस्करपणे ठेवावे.
- हे विशेषत: महत्वपूर्ण आहे कि आताच ज्या मुलाने मलत्याग केला असेल त्याचे ढुंगण/नितंब धुतल्यानंतर हात साबण किंवा राखेने धुवायला हवेत. याच प्रकारे पशुंच्या मलसंपर्क किंवा कच्चे खाद्यपदार्थ यांस हात लावल्या नंतर देखील हात धुणे फार महत्यावे आहे.
- स्वयंपाक करतांना, वाढतांना, किंवा जेवणाआधी, किंवा मुलांना जेवायला देण्याआधी हात धुणे फार महत्यावे आहे. मलत्याग केल्या नंतर व जेवण करण्याआधी आणि नंतर दोन्ही हात धुण्याची सवय मुलांना लावावी ज्यायोगे त्यांचा रोगांपासून बचाव होईल.
मुले साधारणपणे तोंडात हात घालत राहतात, म्हणून मुलांनी हात धुणे फार महत्यावे आहे विशेषत: जेव्हां ते घाणीत खेळत असतील.
मुलांना सहजच कृमि संसर्ग होतो, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्व कमी होत जातात. कृमि आणि त्यांची अंडी मानवी मल आणि मूत्रामध्ये, वरच्या पातळीवरील पाणी आणि जमीनीत, आणि चुकीच्या प्रकाराने शिजविलेल्या मांसामध्ये ही आढळतात.
- मुलांनी संडासाजवळ किंवा मलत्याग करण्याच्या जागेवर खेळू नये. संडासाजवळ चप्पल किंवा जोडे घातल्याने संसर्गापासून बचाव होतो, रोगजंतु पायाच्या त्वचेद्वारा शरीरात प्रवेश करू शकत नाहीत.
- अशा जागी राहणार्या मुलांना जेथे हे कृमि-जंतु आहेत, वर्षभरातून दोन किंवा तीनदा चांगले एन्टीहेल्मेन्टिक उपचार देणे.
महत्वपूर्ण संदेश :साबण आणि पाण्याने रोज चेहरा धुतल्याने डोळ्यांच्या संसर्गापासून बचाव होतो. विश्वीतल काही भागांत डोळ्यांचा संसर्ग, ट्रॅकोमाकडे झुकतो ज्यामुळे अंधत्व पण येऊ शकते.
मलिन चेहरा माश्यांना आकर्षित करतो, आणि त्यामुळे एकापासून दुसÚया व्यक्तीपर्यंत रोगाणु पसरतात. डोळे खराब होऊ शकतात आणि दृष्टित बिघाड होऊ शकतो. जर डोळे स्वस्थ नाही ठेवले तर संसर्ग होऊ शकतो आणि अंधत्व देखील येऊ शकते.
जर डोळे स्वच्छ आणि स्वस्थ आहेत, पांढरा भाग स्पष्ट आहे, डोळे ओलसर आणि चमकदार आहेत, आणि दृष्टि तीक्ष्ण आहे तर तुमचे डोळे स्वस्थ आहेत आणि जर डोळे खूप जास्त कोरडे किंवा लाल आणि सुजलेले असतील, जर एखादा प्रवाह वहात असेल किंवा नीट दिसत नसेल तर ताबडतोब मुलाला आरोग्य कर्मचाÚयास दाखवा.
महत्वपूर्ण संदेश : पाणी सुरक्षित स्त्रोतापासूनच घेणे किंवा शुध्द केलेले पाणी वापरा. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवा.
जेव्हां स्वच्छ पाण्याची पुरेशी आपूर्ति होत आहे तेव्हा कुटुंबामध्ये रोग कमी होतात आणि त्यांना माहिती होते की कशाप्रकारे रोगाणुंना दूर ठेवावे.
जर पाणी स्वच्छ नसेल तर ते उकळून किंवा गाळून स्वच्छ करू शकता.
स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतांमध्ये चांगल्या प्रकारे निर्मित आणि पुरेशा देखरेखीमध्ये ठेवलेले पाइप सिस्टम, ट्यूबवेल्स्, संरक्षित विहिरी आणि ओढे समाविष्ट होतात. पाण्याचे असुरक्षित स्त्रोत आहेत – तलाव, नद्या, उघड्या टाक्या आणि बावडी (अशी खूप मोठी विहिर ज्यामध्ये खाली जाण्यासाठी पायÚया असतात) यांतून घेतलेले पाणी उकळून वापरू शकता. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी झाकून ठेवावे.
कुटुंबे आणि समुदाय आपल्या जलस्त्रोतांना या प्रकारे स्वच्छ ठेवू शकतात.
- विहिरींना झाकून ठेवावे आणि त्यावर आहेत हैंडपंप लावावे.
- घरांमधून बाहेर निघणारे सांडपाणी आणि मल यांना पाण्याच्या अशा स्त्रोतांपासून दूर ठेवावे जेथून पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, आणि कपडे धुण्यासाठी पाणी मिळते.
- पाण्याच्या स्त्रोतापासून संडास कमीत कमी 15 मीटर लांब असावा.
- बादल्या, दोÚया, आणि पाण्याची भांडी नेहमी स्वच्छ आणि चांगल्या जागी ठेवावे, जमिनीवर ठेवू नये.
- जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून आणि कुटुंबाच्या राहण्याच्या जागेपासून दूर ठेवावे.
- कुठल्या ही पाण्याच्या स्त्रोताच्या जवळपास कीटकनाशकांचा वापर करू नये.
कुटुंबे आपल्या घरी पाणी या प्रकार स्वच्छ ठेऊ शकतात.:
- पिण्याचे पाणी स्वच्छ आणि झाकून ठेवावे.
- मलिन हातांनी पाण्यास स्पर्श करू नका.
- एखाद्या वेगळ्या भांड्याने पाणी काढावे.
- पाण्याच्या भांड्याला नळ लावून घ्या.
- पाण्याच्या भांड्यात कोणाला ही हात घालू देऊ नका आणि त्यातून सरळ पाणी काढू देऊ नका.
- जनावरांना भरलेल्या पाण्यापासून दूर ठेवावे.
जर पिण्याच्या पाण्याबाबत काही अनिश्चितता असेल, तर स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क करावा.
महत्वपूर्ण संदेश : कच्चे किंवा उरलेले अन्न घातक ठरू शकते. कच्चे खाणे धुऊन आणि शिजवून खावे. शिजविलेले अन्न पूर्णपणे गरम करून विना विलंब खावे.
खाद्यपदार्थ पूर्णपणे शिजविल्याने त्यातील रोगाणु मरतात. खाद्यपदार्थ, विशेषत: मांस आणि पोल्ट्री यांस, खूप चांगल्या प्रकारे शिजवावे.
सामान्य गरम खाद्यपदार्थांत रोगाणु खूप तीव्रतेने वाढतात. शिजविल्यानंतर लवकर जेऊन घ्यावे म्हणजे जेवणात रोगाणु येत नाहीत.
- जर जेवण दोन किंवा जास्त तासांसाठी ठेवायचे असल्यास, खूप गरम ठेवावे किंवा एकदम थंड जागी ठेवावे.
- जर शिजविलेले जेवण दुसÚया वेळच्या जेवणापर्यंत ठेवायचे असल्यास, त्याला झाकून ठेवावे म्हणजे जेवण किडेमाकोड्यापासून सुरक्षित राहील आणि खातांना जेवण पूर्णपणे गरम करून घ्यावे.
- योगर्ट आणि आंबट दलिया खाणे फार चांगले कारण याच्या आम्लांमुळे रोगाणुंची वाढ होत नाही.
- कच्चे पदार्थ, विशेषत: पोल्ट्री आणि समुद्री आहारामध्ये रोगाणु असतात. शिजविलेले जेवण कच्च्या पदार्थांपासून रोगाणु घेऊ शकते म्हणून कच्चे आणि शिजविलेले पदार्थ वेगळे ठेवावेत नाही तर शिजविलेल्या जेवणात रोगाणु येतीलच. चाकू, भाजी चिरायचे बोर्डस् आणि स्वयंपाकाच्या जागेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि या सर्व वस्तू वापरल्या नंतर धुऊन ठेवाव्यात.
- आईचे दूध तान्ह्या आणि लहान मुलांसाठी सुरक्षित आहे. जनावरांचे ताजे उकळलेले दूध न उकळलेल्या दुधापेक्षा अधिक सुरक्षित आहे.
- आईचे दूध काढून खोलीच्या तपमानावर एका स्वच्छ आणि झाकलेल्या भांड्यात आठ तासांसाठी ठेऊ शकता.
- तान्ह्या आणि लहान मुलांसाठी स्वयंपाक करतांना खास लक्ष द्यावे. त्यांचे जेवण तयार करतांना ताजे शिजवावे त्याला जास्त वेळपर्यंत ठेऊ नये.
- फळे आणि भाज्या जर तान्ह्या आणि लहान मुलांना कच्च्या द्यायच्या असतील तर आधी त्या स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुऊन घ्या कीटकनाशक आणि अन्य औषधे फळे आणि भाज्यांवर दिसून येत नाहीत पण प्राणघातक होऊ शकतात.
महत्वपूर्ण संदेश जेवण, भांडी आणि स्वयंपाकाच्या जागा स्वच्छ ठेवाव्यात. स्वयंपाक झाकून ठेवावा.
जेवणावर बसलेले रोगाणु गिळले जाऊ शकतात आणि रोग देऊ शकतात. जेवणास रोगाणुंपासून वाचविण्यासाठी:
- स्वयंपाकाच्या जागा स्वच्छ ठेवाव्यात.
- चाकू, जेवणाची भांडी, पातेली आणि ताटे स्वच्छ आणि एका वर एक ठेवावे.
- ताटे आणि भांडी पुसण्याचे फडके धुऊन उन्हात वाळवावेत. ताटे, भांडी आणि पातेली जेवतांच स्वच्छ घासून एखाद्या रैक मध्ये रोज वाळवावे.
- स्वयंपाकास जनावरांपासून आणि कीटकांपासून बचावासाठी झाकून ठेवावे.
- दुधासाठी बाटल्या किंवा बोंडली वापरू नये कारण जोपर्यंत या बाटल्यांना चांगल्या प्रकारे उकळलेल्या पाण्यात धुतले जात नाही त्यामध्ये रोगाणु असू शकतात ज्यामुळे डायरिया होऊ शकतो. मुलांना आईचेच दूध द्यावे किंवा कपाने दूध पाजावे.
महत्वपूर्ण संदेश :घरातील संपूर्ण केरकचर्याची सुरक्षित विल्हेवाट रोगांपासून बचाव करते.रोगाणुंचा विस्तार माश्या, झुरळे, उंदीर आणि घुशींच्याद्वारे होतो जे कचर्यामध्ये घुसून खाणे शोधतात व रोगाणुंना जागा करून देतात, उदा: फळे व भाज्यांची सालपटे इत्यादि.
जर कचर्याचे सामुदायिक एकत्रीकरण करण्यात आले नाही तर, प्रत्येक कुटुंबास एका कचरापेटीची गरज पडेल जेथे रोज घरगुती कचरा जाळण्यात किंवा पुरण्यात येईल.
जवळपासच्या क्षेत्रास मल, कचरा इत्यादि सांडपाणी यांपासून मुक्त आणि स्वच्छ ठेवण्याने रोगांपासून बचाव होतो. वापरलेले पाणी एकत्र करण्यासाठी एक खड्डा खणावा ज्यायोगे हे पाणी किचन गार्डन किंवा शेतांकडे पाठविले जाऊ शकेल.
कीटकनाशक आणि वनौषधि सारख्या रसायनांची एक अत्यंत अल्प मात्रा देखील खाद्यपदार्थ, हात किंवा पाय किंवा पाण्यात मिसळले गेल्यास घातक ठरू शकते. रसायनांचे काम करतांना वापरलेले कपडे आणि कंटेनरांना घरगुती वापराच्या पाण्याजवळ धुऊ नये.
कीटकनाशक आणि इतर रसायनांचा वापर घराच्या जवळपास किंवा पाण्याजवळ करू नये. रसायनांचा संग्रह पाण्याजवळ किंवा स्वयंपाकाच्या जागेजवळ करू नये. कधी ही खाद्यान्नांचा संग्रह रसायने, कीटकनाशकांच्या डब्यांमध्ये करू नये.
स्त्रोत : UNICEF