অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व

आहारचे योग्य संतुलन राखायचे असेल, तर भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश आहारामध्ये असायला हवा. अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर. हे फळ ताजे आणि सुकविलेले अशा दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असून, याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.

निरनिराळ्या ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे, ही निसर्गाने मनुष्याला दिलेली देणगीच आहे. ही ताजी रसरशीत फळे शरीराच्या आरोग्याकरिता अतिशय लाभदायक असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते.

अंजीरचे फायदे

 • अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
 • अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर हे थंड असते.
 • जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.
 • अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार, रक्तविकार व वात ही दूर होतात.
 • अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
 • पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
  आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
 • अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
 • अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
 • अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
 • अंजिराचे सेवन लो किंवा हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहे. अंजीरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असून, हा क्षार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. ज्यांच्या शरीरामध्ये या क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजीराचे सेवन करायला हवे.
 • अंजीरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रक्रीयेला अवरोध निर्माण होईल.
 • अंजीर या फळाप्रमाणेच त्याची पाने ही गुणकारी आहेत. अंजीराची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स ची मात्रा नियंत्रित राहते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर चरबी साठविली जाते, त्याला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. जर ह्याची मात्रा शरीरामध्ये वाढली, तर लठ्ठपणा, हृदयरोग इत्याधी व्याधी उद्भवू शकतात
 • ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.
 • अंजीरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच अंजीर खाण्याने अधिक फायबरची मात्रा पोटामध्ये जात असून त्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहून भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी अंजीरे खावीत.
 • अमेरिकन जर्नल मधील क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात. प्राचीन सूत्रांच्या माहितीतून कळते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. याच्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात. तसेच ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांनी अंजीरे दुधामध्ये भिजवून खावीत.
 • चाळीशी च्या महिलांसाठी अंजीराचे सेवन अतिशय लाभकारी आहे. त्याने शरीरामध्ये कॅल्शियम मिळते, तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते.
 • डांग्या खोकला आणि दम्याच्या विकारात देखील अंजिराचे सेवन गुणकारी आहे. तसेच बद्धकोष्ठ, अपचन, पोटदुखी सारख्या विकारांसाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजिराच्या सेवनाने यकृताचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.
 • अंजीरातील बहुगुणी पोटयाशियम तत्व रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्करेची मात्रा नियंत्रित करतो. आपण आपल्या शरीरातील शर्करेची मात्रा तपासून पाहायला पाहिजे. पोट्याशियम तत्वयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात, खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित होते. अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
 • जे हृदयविकार आणि हृदयासंबंधी समस्यांना वाढवतात. सुकी अंजीर आपले रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणारया त्रासाला कमी करतो. हृदयातील नलीकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.

घ्यायची काळजी

 • अंजीरापासून अनेक फायदे आहेत हे आपणास समजले असून याचे जास्त सेवनही करू नये.
 • सुकी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या सडण्याचे कारण बनू शकते.
 • ज्यांना अंजीरची एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच कोणताही पदार्थ आपल्या आहारात समावेश करावा.
 • अंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.

स्त्रोत : कृषी जागरण

अंतिम सुधारित : 6/5/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate