अन्न पदार्थ आणि त्याचे पोषक मुल्य
केळी – आवडते व परवडणारे फळ
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.
केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.
- ऊदासीनता : केळ्यामध्ये एकप्रकारचे प्रोटीन असते त्याचे सेरोटोनीन मध्ये रुपांतर होते, ज्यामूळे खाणारे खुश व शांत होतात.
- पाळीच्या आधीची लक्षणे (पी.एम.एस.): केळ्यात विटामिन बी ६ असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते, ज्याने स्वभाव ऊत्साही राहतो.
- अशक्तपणा : जास्त प्रमाणात लोह असल्याने, केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते व अशक्तपणा घालविण्यास मदत मिळते.
- रक्तदाब : केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटँशियम असते व कमी साखर, ज्यांमूळे रक्तदाबासाठी ते अत्यंत ऊपयूक्त आहे.
- मेंदुची क्षमता वाढविण्यासाठी : संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पोटँशियम असलेल्या फळांनी मेंदुचे बळ वाढविण्यास मदत होते.
- जुलाब : केळ्यात फायबरचे देखील प्रमाण फार असते, त्यामूळे पचनाची रोजची सवय परत आणायला मदत होते, व जुलाब थांबतात.
- जळजळ : केळ्याचा नैसगिक पाचक द्रव्यांनी शरीरावर परिणाम होतो, ज्यामूळे जळजळ शमते.
- अल्सर: केळे हे पाचक अन्न म्हणून वापरले जाते, जे त्याच्या मऊपणामूळे आतड्यातील विकार दुर करते. जास्त जळजळ शमवून ते आतड्याचा पापूद्रा बनते व आतड्याचे त्रास कमी करते.
- स्ट्रोक : केळे जेवणात रोज खाणा-यांना, स्ट्रोकने येणा-या मृत्यूचे प्रमाण ४०% ने कमी होते.
तृणधान्य
तृण धान्य ही कमी चरबी व मीठाची असतात; त्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्याच्या कँलशियमच्या मोठ्या प्रमाणामूळेच, ते हदयासाठी, हाडांसाठी व नखांसाठी फार चांगले आहे.
- त्यात मिसळलेले फायबरचे प्रमाण पण जास्त असते. एका खाण्यात( अर्धा कप,शिजविलेले) ४ ग्रँम घट्ट विरघळणारे फायबर (बीटा ग्लुकँन) असते. ह्या फायबर मूळे रक्तातील एल.डी.एल काँलेस्ट्राँलचे प्रमाण ज्याला वाईट काँलेस्ट्राँल म्हणतात ते कमी होते.
- तृण धान्य जास्तीचे फँट शोषून घेते आणि ते संडास वाटे बाहेर फेकते. त्यात जास्त प्रमाणात फायबर असल्याने ते जुलाबाचा त्रास आणि पचना संबंधीचे त्रास देखील कमी करते.
- तृण धान्य जास्त प्रमाणात घेतल्यास शरिरातील साखरेचे प्रमाण कमी करता येते व साखरेची पातळी राखता येते.
- तृण धान्याचा ऊपयोग मेंदूच्या विकारावर देखील करता येतो.
- तृण धान्याचा ऊपयोग गर्भाचे रोग आणि गर्भपिशवीच्या रोगातही आहे खास जेव्हा पाळी जाते तेव्हा याचा चांगला ऊपयोग होतो.
- तृण धान्यात काही खास फॅटीअँसीड आणि रोगप्रतीबंधक गुण आणि विटामिन ई आहेत ज्यामूळे पेशी निकामी होण्याचे प्रमाण कमी होते आणि कँसरचे प्रमाणही कमी होते.
स्त्रोत :पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 7/9/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.