अन्न शिजवताना पाळावयाची पथ्ये
पोषक द्रव्यांवर होणारे परिणाम आणि पाळावयाची पथ्ये
- जेव्हा भाजीपाला बारीक चिरला जातो, त्यावेळी त्यातील पाचकरस (एन्झाइम) जास्त प्रमाणात मोकळे होतात आणि त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो.
- भाज्या जास्त शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.
- भाज्या उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे जीवनसत्त्व आणि पाचकरस (एन्झाइम) पाचकरस एकदम कमी होतात.
- पदार्थ जास्त शिजवू नयेत, अर्धवट कच्चेच ठेवावेत. जेव्हा जास्त शिजवणे आवश्यक असेल तेव्हा मात्र मोठ्या आचेवर आणि थोडावेळ शिजवावेत.
- खाण्याच्या आधी फार वेळ अन्न पुन्हा – पुन्हा गरम करू नये. तसे केल्याने जीवनसत्त्वांचा प्रमाण कमी होते.
- भाज्या पाण्यात घालून बराच वेळ ठेवणे किंवा भाजी चिरल्यानंतर धुणे यामुळे भाज्यांतील ‘क’ जीवनसत्त्व कमी होते.
- वाळविल्यामुळे सर्व भाज्या आणि फळांमधील ‘क’ जीवनसत्त्व कमी होते. फक्त आवळ्यातील ‘क’ जीवनसत्त्व वाळविल्यामुळे नष्ट होत नाही.
स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.