অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नपदार्थातील पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण समजणे झाले सुलभ

अन्नपदार्थातील पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण समजणे झाले सुलभ

प्रस्तावना

अमेरिकी कृषी विभागाने राष्ट्रीय पोषक घटकांचा प्रमाणित संदर्भासाठी माहिती साठा 2014 मध्ये नुकताच अद्ययावत केला आहे. बेल्ट्‌सव्हिले येथील मानवी अन्नद्रव्य संशोधन संस्थेने या माहिती साठ्याचे संकलन केले असून, त्यामध्ये 8600 अन्नघटकांचा समावेश आहे.

पोषक अन्नघटकांविषयीची यादी

गेल्या काही वर्षांमध्ये आहारविषयक जागरुकता वाढत आहे. अलीकडे आहारतज्ज्ञांचा सल्लाही लोक विविध आजारांसाठी घेत असतात. अशा वेळी त्यांना प्रत्येक पदार्थामध्ये नेमके कोणते घटक आहेत, हे कळत नाही. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योजकांनाही आपल्या पदार्थातील पोषक घटकांचे प्रमाण ठरविण्यासाठी या माहिती साठ्याची मदत होते. दर वर्षी अमेरिकी कृषी विभागातर्फे पोषक अन्नघटकांविषयीची यादी अद्ययावत केली जाते. त्यात नवीन अन्नद्रव्ये, नवीन पदार्थ यांची माहिती वाढवली जाते. तसेच उपलब्ध असलेल्या पोषक घटकांविषयी काही बदल असल्यास ते अद्ययावत केले जातात.

प्रत्येक अन्नपदार्थाच्या गटानुसार संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या माहितीचा फायदा सामान्य ग्राहकापासून प्रक्रिया उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी होऊ शकतो.

ग्राहकानुसार अन्नघटकांतील पोषक घटकांची माहितीही वेगळी उपलब्ध आहे. उदा.- एखाद्याला आहारतज्ज्ञाने अधिक फायबर घ्यायला सांगितले, तर त्याला प्रत्येक अन्नघटकामध्ये फायबरचे नेमके प्रमाण कळू शकेल. तसेच त्याची उतरत्या क्रमाने यादीही मिळू शकते किंवा कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ नेमके कोणते, हेही कळू शकते.

अशी पाहता येते माहिती

  1. इंटरनेट सुरू करून "ndb.nal.usda.gov.' या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. त्यामध्ये वरील बाजूला असलेली "Nutrients List' हा पर्याय निवडा.
  3. या पर्यायामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, कोलेस्टेरॉल फॅट, कॅफेन, क जीवनसत्त्व अशा शंभरपेक्षा अधिक पोषक घटकांची यादी आहे. त्यावर क्‍लिक करावे.
  4. त्यानंतर पदार्थांच्या "All Foods' किंवा "Abridged List' अशा पर्यायावर क्‍लिक करावे. त्यामध्ये अमेरिकेमध्ये आहारामध्ये असलेल्या एक हजार पदार्थांची यादी आहे.
  5. पदार्थांचे सुमारे 25 गट आहेत.
  6. पदार्थांचे नाव किंवा अन्नद्रव्य घटक यातून निवड करावी.
  7. अगदी घरगुती वापरासाठी व 100 ग्रॅम पदार्थ, असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

 

संदर्भ : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate