नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन "तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते.
संक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा वारा या ऋतूत जाणवत असल्याने थंडी कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ योग्यत्या प्रमाणात वापरावेत. या कालखंडामध्ये शरीराचे बल उत्तम असते. अशा परिस्थितीत तिळगूळ, साजूक तूप गुळाची पोळी हे पदार्थ पथ्यकरच ठरतात.
तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. गूळ अतिशय आरोग्यदायी असल्याने स्वयंपाकात तर तो वापरला गेलाच पाहिजे. भरपूर श्रम केल्यानंतर खूप थकवा येतो.
आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले. आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चुल्हाण्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी विटा आणि फाय...
ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे;...
भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भा...
गुळासाठी योग्य शिफारशीत जातींच्या लागवडीपासून गूळ ...