आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.
१) याचे उत्पादन भारत, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये घेतले जाते.
२) बियांमध्ये ८० ते ८५ टक्के एंडोस्पर्म ११ ते १७ टक्के कोंडा आणि २ ते ३ टक्के एब्रियो असतो.
३) बिया आकाराने लहान असून, त्यांचा रंग लालसर असतो. या बियांना औषधी महत्त्व आहे.
४) बियांमध्ये म्यूसिलेजस असल्यामुळे त्या पाण्यात भिजवल्यास त्यांचा पृष्ठभाग चिकट होतो.
५) पाने व मूळांना विशिष्ट वास असल्यामुळे त्यांचा वापर मसाल्यासारखा करतात.
६) बियांचा वापर सॅलड आणि कॉटेज चीजमध्ये केला जातो.
७) बिया कडवट असतात. अस्थमा, कफ, कुष्ठरोग, त्वचेचे विकार, आमांश, जुलाब, लचक भरणे, क जीवनसत्त्व अभाव, अपचन, कटिवात या आजारांत बियांचा वापर लाभदायक आहे.
८) आळीवाची मुळे कडू व तिखट असून, गरमीच्या आजारात लाभदायक आहेत.
९) बिया फुफ्फुसाची कार्य सुधारण्यात मदत करतात. बियास मसाल्याचा सुगंध असून चव तिखट आहे.
१०) आळीव मध्ये मुख्य प्रमाणात सलफोराफेन हे आयसोथायोसिनेट आढळते, याचा उपयोग कर्करोगाच्या उपचारामध्ये केला जातो.
११) आळीव तेलामध्ये सिटोस्टेरॉल व अवेनास्टेरॉल हे फायटोस्टेरॉल या संवर्गातील घटक आढळतात. आळीव तेलातील स्निग्ध आम्लामध्ये मुख्यत्वे ओलेझक, लिनोलोनिक व लिनोलेइक आम्ल मुख्य घटक आहेत.
१२) डोळे व हृदयाच्या विकारात फायदेशीर असणारे ल्युटीन व झियाझांथीन हे दोन कॅरोटिनाईड हे रासायनिक घटक आळीव मध्ये उच्च प्रमाणात असतात. १३) नियमितपणे अाळीवचे सेवन केल्याने रक्तक्षय बरा होण्यास मदत होते. आळीव बिया व मध यांची पेस्ट करून घेतल्यास आमांश बरा होतो. कोंब आलेल्या आळीव बिया खाल्ल्यास आमांश व जुलाबामध्ये आतड्यांचा दाह कमी होण्यास मदत होते.
१४) आळीव बिया बुद्धीवर्धक आहेत, कारण त्यात ॲरचिडिक व लिनोलेईक हे स्निग्ध आम्ल चांगल्या प्रमाणात असते.
१५) स्तनदा मातांसाठी आळीव जीवनसत्त्व व खनिजांचा चांगला स्रोत आहे.
१६) आळीवमध्ये गोंदाचे प्रमाण चांगले असते. याचा वापर गम अरेबिक व ट्रँगाकांथ या उच्च कर्बोदकांसाठी पूरक म्हणूनही केला जातो.
१) उत्तर अमेरिका, युरोप आणि भारतात जवसाची लागवड केली जाते.
२) याच्या बिया आकाराने सपाट अंडाकृती असून लालसर विटकरी ते फिकट पिवळ्या रंगाच्या असतात.
३) बिया कुरकुरीत असून विशिष्ट चव आहे. जवसाचा वापर तेल, पीठ आणि पावडर तयार करण्यासाठी करतात.
४) याच्या तेलामध्ये बहुअसंपृक्त स्निग्ध आम्ले, पाचक प्रथिने आणि लिग्नीन आढळतात. तेल अल्फा लिनोलोनिक आम्लाचा चांगला स्रोत अाहेत. जवसामध्ये चांगल्या गुणवत्तेची प्रथिने, विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात.
५) तेलामध्ये अल्फा लिनोलेनिक, लिनोलेईक व ओलेईक आम्ल जास्त प्रमाणात आढळतात.
६) कोंडारहित बिया व तेलरहीत पिठापासून प्रथिन आयसोलेट बनवता येतो.
७) जवसामध्ये प्रामुख्याने ग्लोब्युलिन आणि अब्ल्यूमिन प्रथिने आढळतात. यामध्ये अर्जेनिन, अस्पारटिक आम्ल व ग्ल्युटामिक आम्ल असते. तर लाइसिन, मिथीयोनिन व सिस्टिन हे अमिनो आम्ल कमी प्रमाणात आढळते.
८) जवसामध्ये आढळणारा फिनॉलिक रासायनिक घटक लिगनान मानवी आरोग्यास उपयुक्त आहे. हृदयविकार, मधुमेहाचा धोका कमी करण्यास याचा उपयोग होतो.
९) सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल व मोहरीच्या तेलापेक्षा जवसामध्ये बहुअसंपृक्त स्निग्ध आम्लांचे प्रमाण जास्त आहे. ईकोसानॉईडस हे रासायनिक घटक ओमेगा-३ प्रकारच्या स्निग्ध आम्लांपासून बनतात. हे घटक जवसामध्ये आढळतात. हे स्निग्ध पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.
१०) जवसामध्ये २५ ते ४५ टक्के प्रथिने व सुमारे १० टक्के तंतुमय पदार्थ असतात. जवसामधील लिगनाग, फेनॉल, टोकोफेरॉल (जीवनसत्त्व ई) आणि फ्लॉवोनॉईडस हे अँटीऑक्सिडंटस तेल खराब होण्यापासून वाचवितात.
तेलबिया ---- उष्मांक टक्के ---- पाणी टक्के ---- प्रथिने टक्के ---- तेल टक्के ---- खनिजे टक्के ---- तंतुमय पदार्थ टक्के ----कर्बोदके टक्के ----कॅल्शिअम (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) ---- फॉस्फरस (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) ---- लोह (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम)
आळीव ---- ४४५ ---- ३ ---- २५ ---- २४ ---- ६ ---- ८ ---- ३३ ---- ३७७ ---- ७२३ ---- १००
जवस ---- ५३० ---- ६ ---- २० ---- ३७ ---- २ ---- ५ ---- २९ ---- १७० ---- ३७० ---- ३
कारळे---- ५१५ ---- ४ ---- २४ ---- ३९ ---- ५ ---- ११ ---- २७ ---- ३०० ---- २२४ ---- ५७
तीळ ---- ५६३ ---- ५ ---- १८ ---- ४३ ---- ५ ---- ३ ---- २५ ---- १४५० ---- ५७० ---- ९
दुर्लक्षित तेलबिया ---- लिनोलेनिक ---- लिनोलेईक ---- ओलिईक ---- इकोसानॉईक ---- पालमिटिक ---- ॲरॅचिडीक ---- स्टिअरीक
आळीव ---- ३४ ---- २२ ---- ११.८ ---- १२ ---- १०.१ ---- ३.४ ---- २.९
जवस ---- ५३.२१ ---- १७.२५ ---- १८.५१ ---- - ---- ६.५८ ---- - ---- ४.४३
कारळे---- - ---- ५७.१ ---- १५.२ ---- १.७१ ---- १८.९ ---- - ---- ६.५७
तीळ ---- ०.४८ ---- ३८.२९ ---- ४१.६८ ---- ०.१५ ---- १२.९६ ---- ०.५३ ---- ५.७६
संपर्क - ०२४२६-२४३२५९
(लेखक अन्नशास्त्र तंत्रज्ञान विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/23/2020
भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीव...
लेअर कोंबड्यांमध्ये पंखांचा किंवा पायांचा लकवा (पॅ...
ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया ...
जवस लागवडीबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे.