साहित्य :गवार १ वाटी, तीळ १ मोठा चमचा, हिरवी मिरची ४-५, चिंचेचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ व साखर. फोडणीचे साहित्य आणि तेल १ छोटा चमचा.
कृती : गवार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात गवार, शेंगदाणे, मिरची, तीळ घालून चांगले परता. गरज असल्यास थोडेसे पाणी घाला. आपल्याला गवार नुसती परतवून घ्यायची आहे, शिजवायची नाही. त्यामुळे त्याचा हिरवा रंग तसाच टिकला पाहिजे. थंड झाल्यावर चिंच व मीठ घालून वाटून घ्या.
टीप : ही चटणी परोठा, थालीपीठ याबरोबर खायला देऊ शकता.
साहित्य : सोयाबीन पाव वाटी, कोथिंबीर १ वाटी, हिरव्या मिरच्या ५-६, आले १ छोटा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, लिंबाचा रस १ मोठा चमचा, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : रात्रभर सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाण्यातून काढून गरम पाण्यात शिजवून घ्या. मग त्यात चटणीसाठी लागणारे इतर साहित्य घालून चटणी वाटून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून ती फोडणी चटणी घालून चटणी कालवा.
टीप : ही चटणी खाण्यासाठी थोडी उग्र वाटेल पण सवय झाल्यावर चविष्ट लागेल.
साहित्य : कारळे १ वाटी, भाजलेले दाणे अर्धी वाटी, तीळ अर्धी वाटी, सुके खोबरे पाव वाटी, कढीपत्ता एक वाटी, सुक्या लाल मिरच्या १० – १५, मीठ साखर चवीप्रमाणे, हिंग चवीनुसार, तेल १ छोटा चमचा.
कृती : कारळे, दाणे, तीळ हे सर्व भाजून घ्यावे. कढईत तेल घालून कढीपत्ता, लाल मिरची, सुके खोबरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. सर्व पदार्थ मीठ व हिंग घालून वाटून घ्या.
टीप : कारळ्याच्या चटणीप्रमाणे तीळ (पांढरे आणि काळे ) व जवस ह्याची चटणी करता येते. कारळ्याऐवजी तीळ १ वाटी घ्यावे/ जवस १ वाटी घ्यावे. बाकी सर्व साहित्य व कृती कारळ्याच्या चटणीप्रमाणे घ्या.
साहित्य : चण्याची डाळ १ वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी, तांदूळ पाव वाटी, वाळलेल्या मिरच्या ८-१०, सुके खोबरे पाव वाटी, चिंच, गुळ चवीप्रमाणे, धने २ चमचे, जिरे १ चमचा, कढीपत्ता १ वाटी, २ मोठे चमचे तेल, चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ बदामी रंगावर भाजून खलबत्त्यात जाडसर पीठ काढून घ्यावे. खोबरे किसून किंवा बारीक तुकडे करून कढीपत्ता व मिरच्या तेलावर भाजून घ्या. धने व जिरे भाजून घ्या. हे सर्व जिन्नस एकत्र करून वरील डाळीच्या व तांदळाच्या पिठात मिसळून त्यात चिंच व गुळ घालून पुन्हा एकत्र कुटावे. ही चटणी पुष्कळ दिवस टिकते.
टीप : ही चटणी दह्यात कालवून डोसा व थालीपिठाबरोबर देऊ शकता.
साहित्य : दुधी भोपळा सळ १ वाटी, दोडक्याचे साल १ वाटी, हिरव्या मिरच्या ७-८, सुक्या खोबऱ्याचा कीस १ वाटी, तीळ १ वाटी, फोडणीचे साहित्य, शेंगदाण्याचे जाडसर कूट १ वाटी, तेल १ मोठा चमचा, मीठ व साखर चवीप्रमाणे.
कृती : प्रथम दोडक्याची व दुधी भोपळ्याची साले बारीक चिरून घ्या. तीळ, खोबरे, दोडक्याचे व दुधी भोपळ्याची साले, मिरच्या थोडया तेलावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कढईत थोडेसे तेल घालून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून त्यात मीठ व साखर घालून चांगले हलवा. ही चटणी घट्ट झाकण असलेल्या डब्यात घालून ठेवा म्हणजे सादळत नाही.
टीप : ही चटणी पोळी, भाकरी, डोसा, थालीपीठ याबरोबर खाऊ शकता.
साहित्य : उडदाची डाळ अर्धी वाटी, मिरच्या ४-५, कैरीचा कीस चवीप्रमाणे, मीठ व साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर अर्धी वाटी, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : उडदाच्या डाळ ऐवजी चण्याची डाळ भिजवून वापरू शकता. कैरीऐवजी लिंबाचा रस २ छोटे चमचे या प्रमाणात वापरू शकता.
साहित्य : करवंद हिरवी बिया वाढलेली १ वाटी, गुळ बारीक चिरलेला १ मोठा चमचा, मीठ चवीप्रमाणे, लाल मिरच्या ५ ते ७, सुके खोबरे – अर्धी वाटी, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर पाव वाटी.
कृती : तेल आणि फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. तेल कढईत गरम करून फोडणी तयार करा आणि चटणीवर घाला. चटणी कालवून खायला दया.
टीप : ही चटणी ३-४ दिवस टिकते.
साहित्य : बटाटा २ छोटे साल काढून, तेल, मिरच्या ४-५ बारीक चिरलेल्या, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर पाव वाटी, सुके खोबरे पाऊण वाटी, लसूण- ५ ते १० पाकळ्या, मीठ, चवीप्रमाणे, साखर चवीप्रमाणे, लिंबाचा रस २ छोटे चमचे.
कृती :तेल आणि फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्या. कढईत तेल गरम करून फोडणी करून ती चटणीवर घाला. चटणी कालवून खायला दया.
साहित्य : कच्ची पपई १ छोटी, मोहरी डाळ पाऊण वाटी, हिंग १ छोटा चमचा, तिखट अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ वाटी, लिंबाचा रस ३ छोटे चमचे.
कृती : पपईची सळ काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मोहरी, मेथी, थोडेसे भाजून वाटून घ्या. मेथी, मोहरी वाटलेली त्यात तिखट मीठ घालून चांगले कालवून घ्या. तेल गरम करून त्यात हळद आणि हिंग घालून एकत्र केलेला सगळा मसाला फोडणी गार झाल्यावर घाला. नंतर त्यात लिंबाचा रस आणि पपईच्या फोडी घालून चांगले कालवून घ्या. काचेच्या स्वच्छ बरणीत ठेवा.
साहित्य : हिरवी करवंद २ वाटया, मोहरी डाळ पाऊण वाटी, मेथी २-३ चमचे, हिंग १ छोटा चमचा, हळद १ मोठा चमचा, तिखट अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ वाटी.
कृती : करवंद स्वच्छ धुऊन पुसून बिया काढून घ्या. मेथी, मोहरी डाळ थोडी भाजून त्याची पूड करून घ्या. त्यात तिखट मीठ घालून चांगले कालवून मसाल्यात घाला आणि कालवून घ्या. नंतर त्यात करवंद घालून कालवून बरणीत भरून ठेवा. तेल कमी वाटल्यास थोडे तेल गरम करून नंतर थंड करून त्यावर ओतून ठेवा.
साहित्य : हिरवी करवंद २ वाटया, मोहरी १ छोटा चमचा, हिंग १ छोटा चमचा, मीठ चवीप्रमाणे, हळद १ छोटा चमचा, मेथ्या २ छोटे चमचे, तेल १ मोठा चमचा, गुळ सव्वा वाटी.
कृती : कढईत तेल घालून त्याची फोडणी करून घ्या. त्यात मेथ्या घाला. नंतर करवंद घाला आणि परतवून घ्या. त्यात गुळ मीठ घाला आणि शिजू दया. शिजल्यानंतर काचेच्या बरणीत काढून ठेवा.
टीप : हा कायरस परोठा, पोळी बरोबर खायला देऊ.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/22/2020
जगातल्या १३० पेक्षा अधिक देशात केळीचे एकूण ७.५ दशल...
कैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग...
कैरीपासून पन्हे व लोणचे बनविण्याच्या प्रक्रियेची म...
बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण ग...