অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिमणचारा-पोषाहार-डोसा/इडली

शेपूचा डोसा

साहित्य : तांदूळ २ वाटया, जाड पोहे अर्धी वाटी, शेपू बारीक कापलेला २ वाटया, हिरवी मिरची वाटलेली १ छोटा चमचा, खाण्याचा सोडा अर्धा चमचा, तेल २ मोठे चमचे, मीठ चवीप्रमाणे, गुळ १ मोठा खडा. कृती : २ वाटया तांदूळ रात्री भिजवून ठेवलेला, पोहे, मिरची आणि शेपू सर्व एकत्र करून वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणात तांदूळ पण वाटून घाला. त्यात मीठ व सोडा घालून हे मिश्रण तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर पसरा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून गुळाच्या खड्याबरोबर खायला दया. एक मध्यम आकाराचा शेपूचा डोसा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

१७१.६५     कॅलरी

कर्बोदके

२८.३४      ग्राम

प्रथिने

०२.८०      ग्राम

स्निग्ध पदार्थ

०५.४७      ग्राम

कॅल्शियम

२७.००      मि. ग्राम

लोह

०४.५१      ग्राम

‘अ’ आणि ‘ब’  जीवनसत्त्व

७३३.६२     मि.ग्राम

नाचणी डोसा

साहित्य : नाचणी पीठ १ वाटी, उडदाची डाळ भिजवून वाटलेली अर्धी वाटी, कांदा १ मोठा बारीक चिरलेला, मिरच्या २ बारीक चिरलेल्या, कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे, तेल २ मोठे चमचे, मीठ चवीप्रमाणे. कृती : वाटलेली उडदाची डाळ, नाचणीचे पीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ एकत्र करून पीठ, डोसा करता येईल इतकाच पातळ भिजवा. तापलेल्या तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर पसरवा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून गरम खायला दया. एक मध्यम आकाराचा नाचणीचा डोसा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

१९८.१५     कॅलरी

कर्बोदके

३१.४५     ग्राम

प्रथिने

०६.०१     ग्राम

स्निग्ध पदार्थ

०५.७१     ग्राम

कॅल्शियम

१३७.८४     मि. ग्राम

लोह

०१.८७     ग्राम

‘अ’ आणि ‘ब’  जीवनसत्त्व

४२०.८५     मि.ग्राम

डाळ तांदळाचा डोसा

साहित्य : तांदूळ २ वाटया, हरभरा डाळ १ वाटी, तुरीची डाळ १ वाटी, उडदाची डाळ पाव वाटी, आले, लसूण, हिरवी मिरची बारीक वाटून चवीप्रमाणे, मेथी १ गड्डी, तीळ २ छोटे चमचे, मीठ, साखर चवीप्रमाणे, तेल ३ मोठे चमचे. कृती : सर्व धान्य थोडे भाजून एकत्र करून गिरणीतून दळून आणावे. हवे तेवढे रात्री भिजवून ठेवावे. साधारण डोसा करता येईल इतकेच पातळ भिजवा. सकाळपर्यंत पीठ आंबून येईल. त्या पिठात १ चमचा तेल, आले, लसूण, हिरवी मिरची बारीक वाटलेली, मेथी बारीक चिरलेली, मीठ साखर चवीप्रमाणे, चांगले कालवून घ्या. त्यानंतर तव्यावर तेल घालून त्यात थोडे तीळ घालावे व त्यावर हे डोश्याचे मिश्रण जाडसर घालून मंद आचेवर ५-६ मिनिटे शिजू दयावे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून गरम खायला दया. एक मध्यम आकाराचा डाळ तांदळाचा डोसा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

 

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

२७६.००     कॅलरी

कर्बोदके

२९.९८      ग्राम

प्रथिने

०६.११      ग्राम

स्निग्ध पदार्थ

०७.००      ग्राम

कॅल्शियम

०६.००      मि. ग्राम

लोह

०१.५०      ग्राम

‘अ’ आणि ‘ब’  जीवनसत्त्व

२६५.३०     मि.ग्राम

टीप : या डोश्यात मेथी ऐवजी दोडका, दुधी भोपळा, गाजर, मुळा किसून किंवा पालक चिरून घालू शकता.

हिरव्या मुगाचा डोसा

साहित्य : हिरवे मूग २ वाटया भिजवून मोड आलेले, हरभरा डाळ पीठ, कोथिंबीर १ वाटी, मीठ, तेल २ चमचे, आले, लसूण, हिरवी मिरची बारीक वाटून. कृती : मोड आलेले हिरवे मूग, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र करून मीठ घालून वाटून घ्या. नंतर त्यात डाळीचे पीठ घालून हलवून घ्या. तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर डोश्याचे पीठ पसरवा. दोन्ही बाजूंनी भाजून गरम खायला दया. हा डोसा हिरव्या रंगाचा दिसतो. त्याबरोबर लसणाची चटणी रुचकर लागते. एक मध्यम आकाराचा हिरव्या मुगाचा डोसा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

२३२.८०     कॅलरी

कर्बोदके

३१.०७      ग्राम

प्रथिने

१३.२०      ग्राम

स्निग्ध पदार्थ

०५.९६      ग्राम

कॅल्शियम

७४.००    मि. ग्राम

लोह

०२.५३     ग्राम

‘अ’ आणि ‘ब’  जीवनसत्त्व

४३६.७७   मि.ग्राम

तांदळाची इडली

साहित्य : तांदूळ २ वाटया, उडदाची डाळ १ वाटी, मेथी दाणा १ चमचा, मीठ, खायचा सोडा पाव चमचा, पाणी, मीठ चवीप्रमाणे. कृती : तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळे भिजत घाला. तांदळामध्ये मेथी दाणे घाला. ८ तासानंतर दोन्ही वेगवेगळे वाटून एकत्र करून पीठ फुगण्यासाठी बाजूला ठेवून दया. फुगलेल्या पिठात मीठ आणि सोडा घालून हलवून घ्या. हे पीठ इडलीच्या पात्रात घालून इडल्या उकडून घ्या. तांदळाच्या, नाचणीच्या, ज्वारीच्या दोन मोठया इडल्या किंवा ३ लहान आकाराच्या इडल्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतील.

पोषक द्रव्ये

तांदळाची इडली

नाचणीची इडली

ज्वारीची इडली

ऊर्जा

१५३.८५

१४८.४५

१५४.७५  कॅलरी

कर्बोदके

३२.००

३०.९९

३०.७७   ग्राम

प्रथिने

०५.८५

०५.७९

०५.७२   ग्राम

स्निग्ध पदार्थ

००.५९

००.६८

००.८६   ग्राम

कॅल्शियम

२६.१०

१२६.३०

३०.६० मि. ग्राम

लोह

०१.०२

०१.२३

०१.२९  ग्राम

‘अ’ जीवनसत्त्व

८४.९०

७४.४०

५७.९०  मि. ग्राम

 

टीप : ह्या पिठामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात मीठ घालून फुगायला ठेवावे म्हणजे पीठ जास्त आंबट होत नाही. इतर वेळेला मीठ न घालता ठेवले तरी चालेल. इडली पात्र नसेल तर छोटया छोटया वाट्यांमध्ये हे मिश्रण घालून इडल्या करता येतात. ही इडली पुस्तकात दिलेल्या चटणी पूड ह्या चटणीबरोबर खायला देऊ शकता. नेहमी पांढरी इडली खायचा कंटाळा येतो. त्यात वेगळेपणा आणण्यासाठी इडलीच्या पिठात गाजर, बीट, कोबी, वाटाणे, पालक इत्यादी किसून घालू शकता. इडली छान रंगीत दिसते. अशीच इडली नाचणीची आणि ज्वारीची करता येते. कृतीमधील तांदळाऐवजी नाचणी किंवा ज्वारी वापरा. नाचणीची इडली जरा काळपट दिसते पण खायला रुचकर लागते. ज्वारीची इडली पिवळसर दिसते. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.

स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate