चिमणचारा - पोषाहार तयार करतांना घ्यायची काळजी
वेगवेगळे पदार्थ करत असताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
- स्वयंपाकघर स्वच्छ असावे. चूल वापरात असाल तर धूर घराबाहेर जाण्यासाठी सोय असावी. स्वयंपाक करण्याकरीता शक्यतो निर्धूर चुलीचा वापर करावा. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ धुतलेली असावीत. चुलीजवळील जागा लगेचच स्वच्छ करावी.
- जेवण तयार करण्यासाठी आणि पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते झाकून ठेवलेले असावे. हे पाणी काढण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा.
- स्वयंपाक करत असताना नाकाला, केसांना हात लावू नये. हाताची नखे कायम कापलेली असावीत.
- स्वयंपाक करताना, लहान बाळाला जेवण देताना हात स्वच्छ धुऊन मग भरवावे.
- जर तुम्ही आजारी असाल, हाताला कापलेले असे, हातापायावर कुठे जखम असेल तर काळजीपूर्वक स्वयंपाक करावा.
- एका वेळेला जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे. कारण ताज्या अन्नात पोषण मुल्ये जास्त असतात.
- अन्न तयार झाल्यानंतर ते झाकून ठेवा. मुंग्या व इतर किडे लागू नयेत म्हणून मोठया थाळीत/ प्रतीत पाणी घालून त्यात शिजवलेले अन्न ठेवा.
- अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे धान्य, भाजी स्वच्छ निवडून घ्यावी.
- फळभाज्या, पालेभाज्या आपण निवडून त्या निवडल्यानंतर २ ते ३ मिनिटे पाण्यात मीठ घालून त्यात बुडवून ठेवाव्यात. नंतर परत धुऊन मग भाज्या चिराव्यात. भाजी चिरल्यानंतर पाण्यात बुडवून ठेवू नका. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे (‘क’ जीवनसत्त्व) नष्ट होतात.
- फळ, भाज्या ज्या आपण कच्च्या खाऊ शकतो त्या सालीसकट खाव्यात. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात.
- पालेभाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत शिजवाव्यात, त्यामुळे लोह मिळते.
- डाळ, तांदूळ जास्त घासून धुऊ नये. तसे केल्यास त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात.
- डाळी शिजवताना त्यात पालक, वंग, गवारीच्या शेंगा, मुलं, शेवगा, बटाटा यापैकी कुठल्याही भाज्या घालून शिजवाव्यात. त्यात तेल, मीठ, मसाले ह्यांचा योग्य तेवढाच वापर करा.
- घरासमोर थोडी जागा असेल तर त्या जागेचा वापर आपण परसबागेसारखा करू शकतो. त्यामध्ये कोथिंबीर, पालक, आले. गवती चहा, कारले, घोसावळे, काकडी, दुधी भोपळा लावू शकतो.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.