नाचणी धपाटा
साहित्य : नाचणी पीठ २ वाटया, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, कांदा बारीक कापलेला अर्धी वाटी, कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा, हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या ३-४, मीठ चवीप्रमाणे, तेल २ मोठे चमचे.
कृती : तेल सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करून लागेल तेवढेच पाणी घालून मळून घ्या. १० मिनिटे भिजत ठेवा. पीठाचे छोटे गोळे करून घ्या. पोळपाटावर पातळ कापड घालून पाण्याच्या साहाय्याने गोळे थापून घ्या. हा धपाटा तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. गरम गरम खायला दया. याबरोबर कुठलीही चटणी चंगली लागते.
दोन छोटे मध्यम आकाराचे नाचणीचे धपाटे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१७०.९० कॅलरी |
कर्बोदके |
३७.४९ ग्राम |
प्रथिने |
०५.१७ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३९ ग्राम |
कॅल्शियम |
१०५.६० मि. ग्राम |
लोह |
०१.१७ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०१.१७ मि.ग्राम |
ज्वारी कांद्याचे थालीपीठ
साहित्य : ज्वारीचे पीठ २ वाटया, कांद्याची पात बारीक चिरलेली १ वारी, हिरव्या मिरच्या ३-४ बारीक चिरलेल्या, मीठ चवीप्रमाणे, तेल २ मोठे चमचे.
कृती : ज्वारी पीठ, कांद्याची पात, हिरवी मिरची, मीठ एकत्र करून मऊसर पीठ भिजवून १० मिनिटे झाकून ठेवा. नंतर भिजवलेल्या पिठाचा बारीक गोळा करून घ्या. पोळपाटावर पातळ कापड घालून तो छोटा गोळा पाण्याच्या सहाय्याने थापून घ्या. नंतर तो गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घ्या.
एक मध्यम आकाराचे ज्वारी कांद्याचे थालीपीठ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
३०.१५ कॅलरी |
कर्बोदके |
०५.७७ ग्राम |
प्रथिने |
०४.३४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
१८९.६० ग्राम |
कॅल्शियम |
१४.६९ मि. ग्राम |
लोह |
०१.७० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
१९.२० मि.ग्राम |
मिश्र धान्यांचे थालीपीठ
साहित्य : बाजरी अर्धी वाटी, ज्वारी अर्धी वाटी, मका पीठ अर्धी वाटी, नाचणी अर्धी वाटी, तांदूळ अर्धी वाटी, सोयाबीन २ मोठे चमचे, बेसन २ मोठे चमचे, गहू २ मोठे चमचे, आले, लसूण मिरची पेस्ट.
कृती : वरील सर्व पीठ आणि साहित्य एकत्र करून पीठ मळा. जसे लागेल तसे पाणी घाला आणि पीठ मुरण्यासाठी बाजूला १० मिनिटे ठेवा. पोळपाटावर पातळ कापड घालून त्याला पाणी लावून छोटे पीठाचे गोळे ठेवून थापा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजा.
एक मध्यम आकाराचे मिश्र धान्याचे थालीपीठ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१४१.१२ कॅलरी |
कर्बोदके |
२५.२४ ग्राम |
प्रथिने |
०६.१३ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०१.९६ ग्राम |
कॅल्शियम |
४६.९६ मि. ग्राम |
लोह |
०२.०२ ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
१५२.५५ मि.ग्राम |
टीप : वर दिलेल्या ८ पिठांमधून घरात असलेली कुठलीही ३ पिठे चालतील. थालीपीठाची चव चांगलीच लागेल.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र क...
चिमणचारा-पोषाहार-उसळ/भाजी
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे...
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्या...