१. मूग मटकी परोठा
साहित्य : उकडलेले मूग १ वाटी, उकडलेली मटकी १ वाटी, कोथिंबीर १ मोठा चमचा, आंबटपणासाठी लिंबाचा रस/ सुकवलेल्या कैरीची पूड, लाल तिखट अर्धा चमचा, चवीपुरते मीठ आणि साखर.
कृती : पाणी न घालता पाट्यावर वाटून हे सारण गव्हाच्या भिजवलेल्या पिठात घालून लाटायचे. त्यासाठी गव्हाचे न चाळलेले पीठ २ वाटया, सारण तयार करण्यासाठी उकडलेले मूग, मटकी, मिरची, लाल तिखट, कैरीची पूड, लिंबाचा रस १ चमचा, कोथिंबीर एकत्र करून मीठ घालून सारण पाणी न घालता पाट्यावर वाटून तयार करावे. आता गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. त्या गोळ्याला वाटीचा आकार दया. त्यात सारण भर आणि जाडसर परोठा लाटा. दोन्ही बाजूंनी तेल लावून छान भाजून घ्या.
एक छोटा मध्यम आकाराचा मूग मटकी परोठा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१८९.६० कॅलरी |
कर्बोदके |
३०.१५ ग्राम |
प्रथिने |
०४.३४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.७७ ग्राम |
कॅल्शियम |
१४.६९ मि. ग्राम |
लोह |
०१.७० ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
१९.२० मि.ग्राम |
टीप : गव्हाच्या पिठात तेल आणि मीठ घालून मळून १५ मिनिटे ठेवा म्हणजे परोठे छान होतात. आंबटपणा साठी लिंबाचा रस किंवा सुकवलेल्या कैरीची पुड वापरा. असेच उकडलेल्या बटाट्याचे सारण करून पण परोठा करता येतो.
२. पौष्टिक परोठा
साहित्य : गव्हाचे पीठ न चाळलेले दीड वाटी, बेसन पीठ, उकडलेला बटाटा १ किसून घातलेला, बारीक कापलेला पालक पाऊण वाटी, हिरव्या मिरच्या २ बारीक कापलेल्या, आंबटपणासाठी ४ मोठे चमचे दही किंवा २ चमचे लिंबाचा रस, तेल ३ मोठे चमचे, चवीपुरते मीठ.
कृती : वरील सर्व साहित्य आणि १ चमचा तेल घालून परोठ्याचे पीठ भिजवून घ्या. १५ मिनिटानंतर त्याचे छोटे गोळे करून घ्या. थोडेसे लाटून खरपूस भाजून गरम खायला दया.
एक मध्यम आकाराचा पौष्टिक परोठा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१३४.७४ कॅलरी |
कर्बोदके |
१२.९२ ग्राम |
प्रथिने |
०५.६० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०१.०७ ग्राम |
कॅल्शियम |
२५.९० मि. ग्राम |
लोह |
०१.१९ ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
३१.०० मि.ग्राम |
३. मेथीचा परोठा
साहित्य : गव्हाचे पीठ न चाललेले २ वाटया, बाजरीचे पीठ १ वाटी, मेथी बारीक कापलेली २ वाटया, कोथिंबीर अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या ३-४, आले लसूण पेस्ट २ चमचे, तीळ १ चमचा, ओवा १ चमचा, मीठ चवीप्रमाणे, तेल ३ मोठे चमचे, दही ४ छोटे चमचे, लिंबाचा रस २ छोटे चमचे.
कृती : वरील सर्व पदार्थ एकत्र करून परोठ्याचे पीठ १ चमचा तेल घालून पाणी घालून मळून घ्या. हे पीठ घट्ट मळा. मेथी, कोथिंबीर व मीठ हे पदार्थ एकत्र आल्यानंतर त्याला पाणी सुटते आणि भिजवलेले पीठ सैल होते त्यामुळे पीठ भिजवल्यापासून १५ मिनिटानंतर परोठे लगेचच करावे. लाटलेले परोठे तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजावे.
एक मध्यम आकाराचा मेथीचा परोठा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
३५६.९२ कॅलरी |
कर्बोदके |
१०.६२ ग्राम |
प्रथिने |
०३.७६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.७१ ग्राम |
कॅल्शियम |
२३.३० मि. ग्राम |
लोह |
०२.८० ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
२८.०५ मि.ग्राम |
टीप : हा परोठा मेथी ऐवजी पालक, मुळा, दुधी भोपळा, दोडका, कोबी ह्या भाज्या वापरून करू शकतो. कृती व साहित्य वरील प्रमाणे.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
चिमणचारा-पोषाहार-उसळ/भाजी
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्या...
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र क...
पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून आपण विचार केला तर कुठल...