অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिमणचारा-पोषाहार-लाडू

गहू नाचणी लाडू

साहित्य : गव्हाचे पीठ २ वाटया, नाचणी पीठ २ वाटया, तूप २ वाटया, गुळ साडे तीन वाटया, सुके खोबरे दीड वाटी किसलेले. कृती : गव्हाचे पीठ आणि नाचणी वेगवेगळे तुपावर खरपूस भाजून घ्या. खोबरे वेगळे भाजून घ्या. भाजलेले पीठ कोमट झाल्यावर त्यात गुळ व खोबरे घालून लाडू वळून घ्या. भाजलेले पीठ गरम असतांना गुळ घातला तर लाडू कडक होतो म्हणून कोमट झाल्यावर गुळ घालावा. म्हणजे लाडू मऊ राहतील. एक मोठया आकाराची गहू नाचणी लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

२८१.९०कॅलरी

कर्बोदके

५१.९९  ग्राम

प्रथिने

०५.१४  ग्राम

स्निग्ध पदार्थ

०८.६४ ग्राम

कॅल्शियम

१०३.७० मि. ग्राम

लोह

०२.२४  ग्राम

‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व

९१.२१  मि.ग्राम

टीप : गव्हाचे पीठ न वापरता नुसत्या नाचणीच्या पिठाचे लाडू केले तरी चालतात.

राजगिऱ्याचे लाडू

साहित्य : राजगिरा २ वाटया, गुळ २ वाटया, शेंगदाणे जाडसर कूट दीड वाटी, सुके खोबरे १ वाटी, तूप दीड छोटा चमचा. कृती : मोठया कढईत थोडा थोडा राजगिरा घालून तो फोडून त्याच्या लाह्या कराव्या. जुना राजगिरा जास्त चांगला फुलतो. लाह्या चांगल्या घोळून स्वच्छ करून घ्याव्यात. नंतर २ वाटया राजगिरा लाह्या घेतल्या असतील तर २ वाटया गुळ घ्यावा. त्या गुळाचा पाक करावा. त्यात थोडे तूप घालावे व भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस व राजगिऱ्याच्या लाह्या घालून हलवावे व थोडेसे थंड झाल्यावर ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वाळावे. दोन मोठया आकाराचे राजगिऱ्याचे लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

७७.५५ कॅलरी

कर्बोदके

१८.८३     ग्राम

प्रथिने

०२.१३ ग्राम

स्निग्ध पदार्थ

००.३१  ग्राम

कॅल्शियम

१७१.०० मि. ग्राम

लोह

०५.११ ग्राम

‘अ’  जीवनसत्त्व

४२५७.००  मि.ग्राम

नाचणी सोयाबीन लाडू

साहित्य : नाचणी पीठ २ वाटया, सोयाबीन पीठ १ वाटी, तूप २ वाटया, सुके खोबरे १ वाटी, गुळ किसलेला अडीच वाटया. कृती : नाचणी, सोयाबीन दोन्ही पिठे वेगवेगळे तूप घालून खरपूस भाजून घ्या. सुके खोबरे वेगळे भाजून घ्या. भाजलेली दोन्ही पीठ थोडेसे कोमट झाल्यावर गुळ घाला व लाडू वाळावेत. एक मोठया आकाराचा नाचणी सोयाबीनचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

२३२.८०  कॅलरी

कर्बोदके

३१.०७  ग्राम

प्रथिने

१३.२०  ग्राम

स्निग्ध पदार्थ

०५.९६  ग्राम

कॅल्शियम

७४.००   मि. ग्राम

लोह

०२.५३  ग्राम

‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व

४३६.७७      मि.ग्राम

टीप : ह्या लाडूमध्ये सुके खोबरे वापरले नाही तरी चालते, पण वापरले तर लाडू कुरकुरीत लागतात.

तांदळाच्या पिठाचे लाडू

साहित्य : तांदूळ १ वाटी, गुळ १ वाटी, पाव वाटी तूप, सुके खोबरे अर्धी वाटी, तीळ २ मोठे चमचे, खसखस १ मोठा चमचा.

कृती : तांदूळ धुऊन सावलीत वाळवा. भाजून दळायला दया. नंतर कढईत चिरलेला गुळ पातळ करून घ्या. त्याला बुडबुडे यायला लागले की त्यात तूप घालून हलवून घ्या. त्यात उरलेले सगळे साहित्य घालून चांगले हलवून घ्या आणि लगेच लाडू वाळा. हे मिश्रण गार झाल्यावर लाडू वाळले जात नाही. म्हणून पटापट लाडू वळावेत. एक मोठया आकाराचा तांदळाच्या पिठाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

२१५.७०      कॅलरी

कर्बोदके

३३.४३       ग्राम

प्रथिने

०२.६३       ग्राम

स्निग्ध पदार्थ

०८.४१       ग्राम

कॅल्शियम

३१.००       मि. ग्राम

लोह

०२.८३       ग्राम

‘अ’  जीवनसत्त्व

९८.४१      मि.ग्राम

टीप : डाळ, तीळ सुके खोबरे आणि खसखस वेगवेगळे भाजून घ्या आणि नंतर लाडवात घाला. या चार पैकी कुठलेही दोन पदार्थ वापरले तरी चालतील.

उडदाचा आणि मुगाचा लाडू

साहित्य : उडदाचे पीठ १ वाटी, मुगाचे पीठ १ वाटी, साखर दीड वाटी, तूप दीड वाटी, सुके खोबरे १ वाटी. कृती : तुपावर उडदाचे आणि मुगाचे पीठ वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. सुके खोबरेसुद्धा वेगळे भाजून घ्या आणि भाजलेल्या दोन्ही पिठात खोबरे व पिठी साखर घालून पिठाचे लाडू वाळा. एक मोठया आकाराचा उडदाचा आणि मुगाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.

पोषक द्रव्य

प्रमाण

ऊर्जा

३७२.९०      कॅलरी

कर्बोदके

४५.७९      ग्राम

प्रथिने

१४.५५      ग्राम

स्निग्ध पदार्थ

०५.७८      ग्राम

कॅल्शियम

१३९.२०     मि. ग्राम

लोह

०२.३२      ग्राम

‘ब’  जीवनसत्त्व

१३३.८०      मि.ग्राम

टीप : हे लाडू नुसते मूग वेगळे आणि नुसते उडीद वेगळे वापरून करू शकतो.

 

स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate