१. टोमाटो सार
साहित्य : लाल टोमाटो ६ छोटे, आल्याचा तुकडा छोटा, सुके खोबरे २ मोठे चमचे, कोथिंबीर, तेल १ छोटा चमचा, लाल मिरच्या २, फोडणीचे साहित्य, मीठ चवीप्रमाणे, गुळ बारीक चिरलेला २ मोठे चमचे.
कृती : चांगले लाल टोमाटो शिजवून बारीक वाटून घ्या. सुके खोबरे, जिरे, बारीक वाटून शिजवलेल्या टोमाटोमध्ये घाला. चवीप्रमाणे मीठ, गुळ घाला. कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्या. फोडणीत लाल मिरच्याही घाला, ही फोडणी सारात घाला आणि चांगले उकळून घ्या.
एक मोठी वाटी भरून सार प्यायल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
४३.६० कॅलरी |
कर्बोदके |
०२.६२ ग्राम |
प्रथिने |
०१.०४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.२१ ग्राम |
कॅल्शियम |
३२.०५ मि. ग्राम |
लोह |
००.८४ ग्राम |
‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व |
०९.८२ मि.ग्राम |
टीप : लहान मुलांना देताना लाल मिरची कमी घाला.
२. तूर डाळीचे सार
साहित्य : तूर डाळ अर्धी वाटी, जिरे १ छोटा चमचा, सुके खोबरे २ मोठे चमचे, चिंच कोळ २ छोटे चमचे, मीठ चवीप्रमाणे, गूळ २ मोठे चमचे बारीक चिरलेला, तेल छोटा दीड चमचा, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता – ८ ते १० पाने, लाल मिरच्या २-३.
कृती : तुरीची डाळ २-३ वाटया पाणी घालून शिजवून घ्या. त्याचे पाणी गाळून घ्या. जिरे खोबरे चिंच कोळ, गुळ तेलाची फोडणी करून ती त्यात मिसळा. सार थोडेसे दाट हवे असेल तर थोडीसी तुरीची शिजवलेली डाळ त्यात घाला. हे सार चांगले उकळून घ्या. उरलेल्या डाळीचे वरण करू शकता.
एक मोठी वाटी भरून सार प्यायल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
८२.०५ कॅलरी |
कर्बोदके |
१०.२८ ग्राम |
प्रथिने |
०२.९४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.२३ ग्राम |
कॅल्शियम |
३६.०० मि. ग्राम |
लोह |
०१.६३ ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
०८.७२ मि.ग्राम |
टीप : हे सार हरभरा डाळ, मूगडाळ वापरून मसूर डाळ वापरून करता येते. कृती व साहित्य वरीलप्रमाणे .
३. पालक सार (सूप)
साहित्य : चिरलेली पालक १ वाटी, डाळीचे पीठ १ छोटा चमचा, चिंचेचा कोळ २ छोटे चमचे, मीठ चवीप्रमाणे, गुळ १ मोठा चमचा बारीक चिरलेला, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य, पाणी २ ते ३ वाटया, लाल मिरच्या २.
कृती : पालक धुऊन बारीक चिरून घ्या. त्यात २ वाटया पाणी किंवा पालक बुडेपर्यंत पाणी घालून शिजवून घ्या. शिजल्यानंतर पाणी काढून पालकाचा चोथा बाजूला करा. काढलेल्या पाण्यात डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ, गुळ, मीठ घालून उकळून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्या. त्या फोडणीत लाल मिरच्या घाला. ही फोडणी उकळलेल्या पालकाच्या पाण्यात घाला आणि परत त्याला चांगले गरम करा. गरम असतानाच प्यायला दया.
एक मोठी वाटी भरून सार प्यायल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२७.१५ कॅलरी |
कर्बोदके |
०४.८२ ग्राम |
प्रथिने |
०१.१५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३५ ग्राम |
कॅल्शियम |
४५.०० मि. ग्राम |
लोह |
०१.४२ ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
२७.९३ मि.ग्राम |
टीप : लहान मुलांना सार देताना मिरची कमी घाला. पालकाचा गाळून काढलेला चोथा परोठयामध्ये वापरू शकता किंवा थोडेसे मीठ घालून पोळीच्या पिठामध्ये घालून वापरू शकता.
४. कैरीचे सार
साहित्य : कैरीचा गर अर्धी वाटी, जिरे १ छोटा चमचा, लाल मिरच्या २-३, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य, पाणी ५-६ वाटया, सुके खोबरे २ मोठे चमचे किसलेले, कोथिंबीर १ मोठा चमचा बारीक चिरलेला, कढीपत्ता ८-१० पाने, मीठ चवीप्रमाणे, गुळ २ मोठे चमचे चिरलेला.
कृती : कैरीचे साल काढून थोडेसे पाणी घालून उकडून घ्या. नंतर त्याचा गर काढून घ्या. अर्धी वाटी गर, ४-५ वाटया पाणी एकत्र करून ठेवा. जिरे आणि खोबरे वाटून कैरीच्या पाण्यात घाला. नंतर त्यात मीठ व गुळ घालून चांगली उकळी आणा. कढईत तेल घेऊन फोडणी तयार करा. फोडणीत लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला आणि ही फोडणी सारात घाला आणि चांगली उकळा आणि गरम गरम प्यायला दया.
एक मोठी वाटी भरून सार प्यायालानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
३७.५० कॅलरी |
कर्बोदके |
०१.९३ ग्राम |
प्रथिने |
००.४१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.१२ ग्राम |
कॅल्शियम |
२१.०० मि. ग्राम |
लोह |
००.४२ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०९.८२ मि.ग्राम |
५. हुलग्याचे कढण (सार)
साहित्य : हुलगा १ वाटी मोड आलेले, सुके खोबरे २ मोठे चमचे किसून, जिरे २ छोटे चमचा, चिंचेचा कोळ १ चमचा, तेल २ छोटे चमचे, मीठ चवीप्रमाणे, गुळ २ मोठे चमचे बारीक चिरलेला, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता ८-१० पाने, लाल मिरच्या २-३, पाणी ४-५ वाटया. १ चमचा डाळीचे पीठ.
कृती : मोड आलेल्या हुल्ग्यात २ ते अडीच वाटया पाणी घालून शिजवून घ्या. हे पाणी गाळून घ्या. ह्या पाण्यात जिरे खोबरे वाटून घाला. चिंच, गुळ १ चमचा डाळीचे पीठ व मीठ घाला आणि उकळून घ्या. कढईत तेल घेऊन फोडणी तयार करा. फोडणीत लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला आणि ही फोडणी सारात घाला आणि चांगली उकळा आणि गरम गरम प्यायला दया. शिजवलेल्या हुलग्याची पुस्तकात दिल्याप्रमाणे उसळ करता येईल.
एक मोठी वाटी भरून सार प्यायल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
४६.२५ कॅलरी |
कर्बोदके |
०९.०९ ग्राम |
प्रथिने |
०२.३५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.०५ ग्राम |
कॅल्शियम |
३७.२० मि. ग्राम |
लोह |
०१.५२ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
१०.०१ मि.ग्राम |
६. हुलग्याचे पिठलं
साहित्य : कांदा १ छोटा चमचा चिरलेला, लसूण ३-४ पाकळ्या, कढीपत्ता ४-५ पाने, तेल २ छोटे चमचे, आंबटपणासाठी वाळलेले आमसूल, लाल मिरच्या २-३, मीठ चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, ४-५ वाटया पाणी.
कृती : कढईत तेल घालून फोडणी करून घ्या, फोडणीत लाल मिरची, कढीपत्ता, लसूण, कांदा घालून परतून घ्या. हुलग्याचे पीठ पाण्यात कालवून घ्या आणि मग ते कढईत ओता आणि सारखे ढवळत राहा. १ उकळी आल्यानंतर त्यात मीठ आणि आमसूल घाला आणि परत एक उकळी आण. हुलग्याचे पीठ कालवताना २ ते ३ वाटया पाणी घेऊन त्यात पीठ भिजवा. एकदम सगळे पीठ घालू नका. थोडे थोडे घालून कालवा म्हणजे गाठी होणार नाहीत आणि हवे तेवढेच पीठ घालून पिठलं करता येईल.
एक मध्यम आकाराची वाटी भरून पिठलं खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९६.३० कॅलरी |
कर्बोदके |
१७.१६ ग्राम |
प्रथिने |
०६.०६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.१५ ग्राम |
कॅल्शियम |
८६.१० मि. ग्राम |
लोह |
०२.०३ ग्राम |
‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व |
२१.३० मि.ग्राम |
टीप : हुलग्याच्या पिठाऐवजी बेसन पीठ, मुगाचे पीठ, ज्वारीचे पीठ वापरून पिठले करू शकतो. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्या...
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे...
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र क...
पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून आपण विचार केला तर कुठल...