नाचणी सत्त्व
साहित्य : नाचणीचे पीठ २ छोटे चमचे, दही १ छोटा चमचा, पाणी दोन वाट्या, मीठ चवीनुसार, हिंग पूड चिमुटभर, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : एका छोटया पातेल्यात दोन चमचे नाचणीचे पीठ. त्यात दही, मीठ ,
हिंगपूड, पाणी घालून चांगले हलवून घ्या. नंतर ते मंद आचेवर शिजवा. शिजवताना सारखे हे मिश्रण हलवत रहा. पातेले खाली उतरवून त्यात साजूक तूप घालून सोसेल असे गरम गरम खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून शिजवलेले सत्त्व खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
८०.८० कॅलरी |
कर्बोदके |
०७.३५ ग्राम |
प्रथिने |
०१.०४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.३३ ग्राम |
कॅल्शियम |
४१.८५ मि.ग्राम. |
लोह |
००.४० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०४.२० मि.ग्राम |
टीप : नाचणीचे सत्त्व हे परिणामी थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यास उपयुक्त ठरते. हे सत्त्व कुठल्याही वयोगटातील व्यक्ती खाऊ शकतात.
नाचणीचे सत्त्व दूध घालून
साहित्य : नाचणीचे पीठ २ चमचे, साखर दीड चमचा, दूध दीड कप, साजूक तूप १ छोटा चमचा
कृती : नाचणीच्या पिठात प्रथम २ चमचे पाणी घालून पिठातील गाठी काढून टाका. नंतर त्यात गार दूध घाला व शिजवत ठेवा. शिजवताना पीठ चमच्याने हलवत रहा. साखर घालून पीठ खाली उतरवा. दूध कमी प्रमाणात असल्यास निम्मे दूध व निम्मे पाणी घाला.
एक मध्यम आकाराची वाटी भरून शिजवलेले सत्त्व खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
८०.८० कॅलरी |
कर्बोदके |
०७.३५ ग्राम |
प्रथिने |
०१.०४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.३३ ग्राम |
कॅल्शियम |
४१.८५ मि.ग्राम |
लोह |
००.४० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०४.२० मि. ग्राम |
टीप : नाचणीचे सत्त्व हे परिणामी थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यास उपयुक्त ठरते. हा पदार्थ तूप न घालता सुद्धा खायला देऊ शकता.
डाळ तांदळाची पेज
साहित्य : तांदूळ १ वाटी, मूगडाळ ०.५ (अर्धी) वाटी, जिरे २ चमचे, तूप १ छोटा चमचा, मीठ, पाणी.
कृती : डाळ व तांदूळ दोन्ही स्वच्छ धुऊन सावलीत वाळत घाला. सुकल्यानंतर मंद आचेवर भाजून त्याचा रवा काढा. दळताना त्यात जिरे घाला. पेज करायच्या वेळेला २ छोटे चमचे दळलेले पीठ आणि तूप एकत्र करून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात पाणी आणि मीठ घालून पेज शिजवून घ्या. गरम असताना खायला घ्या.
एक मध्यम आकाराची वाटी भरून शिजवलेली डाळ तांदळाची पेज खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१०४.१२ कॅलरी |
कर्बोदके |
१०.६६ ग्राम |
प्रथिने |
०२.३५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.४६ ग्राम |
कॅल्शियम |
२६.३५ मि. ग्राम |
लोह |
००.७५ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
१४.७० मि. ग्राम |
टीप : लहान बाळाला पदार्थ खाऊ घालण्यापूर्वी तो आईने आधी चाखून पहावा.
बटाटयाची पेज
साहित्य : बटाटयाचा कीस (सुकवलेला) दीड चमचा, मीठ चवीप्रमाणे, हिंग चिमूटभर, जिरे पूड चिमूटभर, दही १ छोटा चमचा, पाणी.
कृती : बटाटे किसून तो वाळवून त्याची पूड करून ठेवावी. दीड चमचा बटाटयाची पूड, मीठ, हिंग, जिरे पूड, दही, पाणी एकत्र करून मंद आचेवर शिजवावे, गरम असतानाच खायला दयावे.
एक मध्यम आकाराची वाटी भरून बटाटयाची पेज खाल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१२.७० कॅलरी |
कर्बोदके |
०२.४१ ग्राम |
प्रथिने |
००.३१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३० ग्राम |
कॅल्शियम |
०८.४५ मि. ग्राम |
लोह |
००.०६ ग्राम |
‘क’ जीवनसत्त्व |
११.५५ ग्राम |
टीप : बटाटयाऐवजी रताळे सुद्धा वापरू शकता, रताळ्याची पेज दूध साखर घालूनही करता येते. दीड चमचा छोटया रताळ्याचा सुकवलेला कीस, १ कप दूध, दीड ते दोन छोटे चमचे साखर एकत्र करून गरम केल्यावर रताळ्याची पेज तयार.
राजगिऱ्याच्या लाह्या
साहित्य : राजगिऱ्याच्या लाह्या १ मोठा चमचा, दूध १२ कप, साखर २ चमचे.
कृती : राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून ठेवाव्यात, त्या स्वच्छ करून त्याचे पीठ करून ठेवावे. राजगिऱ्याचे पीठ १ चमचा, साखर, दूध एकत्र कालवून लहान ८-१२ महिन्याच्या मुलांना खायला दयावे.
एक मध्यम आकाराची वाटी भरून राजगिऱ्याच्या लाह्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
७३.०५ कॅलरी |
कर्बोदके |
०९.७५ ग्राम |
प्रथिने |
०३.३७ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०२.३५ ग्राम |
कॅल्शियम |
२१९.६० मि. ग्राम |
लोह |
०५.६२ ग्राम |
‘क’ जीवनसत्त्व |
४२८३.५० ग्राम |
टीप : राजगिऱ्याच्या ऐवजी तुम्ही ज्वारीच्या लाह्याचे पीठ पण वापरू शकता. राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा. राजगिऱ्याच्या लाह्या तयार करण्याची कृती प्रकरण ३ मध्ये वाचावी.
रव्याची पेज (गोड)
साहित्य : रवा २ छोटे चमचे, दूध दीड कप, गुळ २-३ छोटे चमचे, तूप छोटा चमचा.
कृती : छोटया पातेल्यात रवा आणि तूप घालून मंद आचेवर भाजून घ्या. थोडासा लालसर रंग आला की, दूध साखर घालून शिजवा. ही पेज बशीत ओतून कोमट झाल्यावर बाळाला खायला दयावी. चमच्या चमच्याने भरवावी.
एक मध्यम आकाराची वाटी भरून शिजवलेली रव्याची पेज खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्ये |
प्रमाण |
ऊर्जा |
९९.७० कॅलरी |
कर्बोदके |
१२.४५ ग्राम |
प्रथिने |
१०.०० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.०८ ग्राम |
कॅल्शियम |
०२.२० मि. ग्राम |
लोह |
००.१६ ग्राम |
‘अ ’ जीवनसत्त्व मिळते . |
|
टीप : ही पेज दूध साखरेऐवजी तक, जिरे आणि मीठ घालून पण करता येते. अशीच खीर तांदळाच्या रव्याची सुद्धा करता येते. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.
डाळ तांदळाची खिचडी
साहित्य : तांदूळ १ वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : डाळ व तांदूळ एकत्र करून दोन वेळा धुऊन त्यात मीठ घालून भरपूर पाणी घालून शिजवून घ्या. ही खिचडी तूप घालून खायला दयावी. ह्या खिचडीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या चिरून घातल्या तरी खिचडी चविष्ट लागते. फळभाज्यामध्ये कोबी, फ्लॉवर, दोडका, तोंडली इत्यादी. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेवग्याची पणे, करडई, गाजर इत्यादी.
एक मध्यम आकाराची वाटी भरून शिजवलेली डाळ तांदळाची खिचडी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
६९.४० कॅलरी |
कर्बोदके |
१३.६६ ग्राम |
प्रथिने |
१७.२० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.२२ ग्राम |
कॅल्शियम |
०८.५० मि. ग्राम |
लोह |
००.७१ ग्राम |
‘ब ’ जीवनसत्त्व |
२१.७० मि. ग्राम. |
नाचणीच्या पिठाचा शिरा
साहित्य : नाचणीचे पीठ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, १ मोठा चमचा सुके खोबरे किसलेले, पाणी २ ते ३ वाट्या थोडे गरम करून घ्यावे.
कृती : नाचणीचे पीठ तूप एकत्र करून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या पिठात थोडे थोडे पाणी घालून शिजवून घ्या. नंतर त्यात गुळ घालून हलवून घ्या. किसलेले खोबरे घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.
एका मध्यम आकाराची वाटी भरून नाचणीच्या पिठाचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
७१.६० कॅलरी |
कर्बोदके |
१६.७० ग्राम |
प्रथिने |
००.७७ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.१४ ग्राम |
कॅल्शियम |
४२.४० मि. ग्राम |
लोह |
००.६५ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०४.२० मि.ग्राम
|
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/26/2020
अन्न आणि पोषण बोर्ड निर्मित अर्भक बाळाला आहाराचे म...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा ...
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स...