অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जाडेभरडे धान्य व पोषक महत्त्व


जनसंख्या प्रस्फोट आणी अन्न मागणी नेहमी बरोबरीने जात आहेत. परंपरेने आपण विविध प्रकारचे धान्य वापरतो. शहरी जीवनामुळे आपल्या संतुलित आहाराचे अर्थच नाहीसे होत आहे, आपल्या रोजच्या आहारातून जाडे भरडे धान्य काढले गेल्यामुळे. जाडे भरडे धान्यांचे उपयोग आपल्या देशाच्या रोजच्या उष्णतापरिमाणच्या (कॅलरी) आवश्यकतेनुसार परिवर्तित केलेले असते. जाडे भरडे धान्यांचे उत्पादन जरी वाढलेले असतील तरी दुस-या धान्यांच्या उत्पादना प्रमाणे वाढलेले नाही. जरी त्यात सूक्ष्म आणी स्थूल पोषक तत्त्व असतील, तरी त्याला माध्यमिक महत्त्व आहे. भारतात जाडे भरडे धान्यांचे प्रतिव्यत्ति खप १९५१-५५ साली दर वर्षी ४४.६ किलो पासून १९७०-७४ साली ३८.५ किलो पर्यंत कमी झाले. नुक्तेच झालेल्या राष्ट्रीय पोषण अनुश्रवण विभागाच्या (National Nutrition Monitoring Bureau) निकालानुसार जरी धान्य आणी कनिष्ठ तृणधान्यांचे (millet) ओपयोग कमी झाले असतील तरी त्याचे प्रमाण रोजच्या आहाराच्या आवश्यकतेनुसार बरोबर किंवा जास्तच आहे.

नाचणी

नाचणी हे भारतीय उत्पत्तीचे विचारित असलेले आणी बहु ओपयोगी कनिष्ठ तृणधान्य आहे ज्यामध्ये जास्त प्रमाणात ३४४ एम जी/ १०० ग्राम कैल्शियम आहे. दुस-या कोणत्याही धान्या मध्ये एवढे कैल्शियम नाही. नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण ३.९ एम जी/ १०० ग्राम आहे, जे दुस-या धान्यांपेक्षा जास्त आहे, बाजरी सोडून. मधुमेह (डायबटीज) असणा-यांना नाचणी हे एक पुरेपूर पोषक आहार आहे. परंपरेने स्तनमोचन करताना भरडलेले नाचणी किंवा त्याचे पेज दिले जाते. आत्ता नाचणीचे सेवई सुद्धा बाजारात मिळते.

बाजरी

बाजरी खूप सा-या औध्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. बाजरीच्या १०० ग्राम खाध्य भागात ११.६ ग्राम प्रोटीन, ६७.५ ग्राम कार्बोहाइड्रेट, लोह ८ एम जी आणी १३२ मायक्रो ग्राम कैरोटीन आहे जे आपल्या डोळ्यांच्या सौरक्षणासाठी आवश्यक आहे. जरी त्यात काही पोषक प्रतिरोधी आहेत जसे फयटिक ऑसिड, पॉलीफिनॉल आणी अमाइलेज इनहिबिटरस, ते पाण्यात भिजवल्याने, मोड आणल्याने आणी दुसरे स्वयंपाकाच्या पद्धतीने पोषक प्रतिरोधी कमी होऊन जातात. बाजरी हे एक खूप महत्त्वाचे अन्न पदार्थ आहे. जे जनावरांच्या चा-यासाठी सुद्धा वापरले जाते; भारतात जेथे कोठे बाजरी उत्पन्न केले जाते तेथे.

ज्वारी

ज्वारी हे नायजीरियाचे प्रधान अन्न राहिले आहे. औध्योगिक क्षेत्रात ज्वारी हे दुस-या सर्व धान्यांपेक्षा सर्वाधिक वापरात. ते मादक पेय करण्यास वापरले जाते; ब्रेड करणा-या उध्योगात सुद्धा गहू आणी ज्वारीचे मिश्र वापरले जाते. स्तनमोचनाचे खाध्य पदार्थ तयार करणारे व्यापारी औध्योगिक क्षेत्रात ज्वारी – चवळी चे मिश्र आणी ज्वारी – सोयाबीन चे मिश्र वापरतात. त्यात १०.४ ग्राम प्रोटीन, ६६.२ ग्राम कार्बोहाइड्रेट, २.७ ग्राम तंतु आणी दुसरे मायक्रो आणी मॉक्रो पोषक तत्व.

तंतुचे महत्त्व

परिभाषे प्रमाणे तंतु हे झाडांच्या कोशिकाचे एक घटक आहे जे आपल्या आहाराचे एक अंश आहे. तंतुचे आरोग्यासाठीचे फायदे अपरिमित आहेत. तंतुचे एक प्रवृत्ती हे आहे की ते पाणी शोशून घेते आणी स्थूलक कर्ता आहे. ते आपल्या अन्नाला पाचन नलिकेत जास्त तीव्रतर संक्रम करण्यास मदत करते, अंतडीत विष्ठा कमी वेळेस रोकून ठेवते. ते बाईल सॉल्टला गांठून कोलेस्टरॉलचे (पित्त द्रव) नाश जास्त करते. ते एक हायपो कोलेस्टरॉलेमिक कर्ता आहे आणी म्हणूनच ह्रदय रोग असणा-या लोकांच्या आहारात घेणे फायदेशीर आहे. सर्व धान्यांमध्ये तांदळात सर्वात कमी प्रमानात तंतु आहे. ज्वारी मध्ये ८९.२%, बाजरी मध्ये १२२.३% आणी नाचणी मध्ये ११३.५% तंतु असते.

मानवी आहारात कैल्शियमचे महत्त्व

एशीया आणी ऑफ्रिकेच्या स्त्रीयांच्या आहारात कैल्शियमचा समावेश सिफरिश केलेल्या स्तरापेक्षा कमी आहे. गरोदरपणात आणी स्तनपानाच्या वेळेस कैल्शियमच्या कमतरते मुळे बाळाची हाडांची रचना अपर्याप्त होते. त्याच्या व्यतिरिक्त, गरोदरपणात कैल्शियमच्या कमतरतेमुळे आईच्या आरोग्याशी तडजोड करण्यास गरज पडते, गर्भ विकासाकरिता आणी स्तनपानासाठी आईच्या हाडांमधून कैल्शियम वापरले जाऊ शकते. कारण कैल्शियमच्या कमतरते मुळे आईला काही त्रास होऊ शकते जसे नाडी संबंधित अणी उच्च रक्तदाब.
गरोदरपणाच्या दुस-या भागात जर कैल्शियमची पुरवणी केली तर गरोदरपणामुळे होणारे उच्च रक्तदाब आणी प्री- एकलेम्सिया. धान्यांच्या पोषक तत्वांचे विश्लेशण केले की नाचणी आणी ज्वारी मध्ये कैल्शियम आणी तंतु प्रमाण जास्त आहे.

धान्यांचे प्रक्रिया केलेले आहार

मका, ज्वारी आणी दुसरे कनिष्ठ तृणधान्यांचे उत्पादन हे आपल्या भारतातील पूर्ण खाध्य धान्यांचा चौथा भाग आहे. आणी त्यांचा देशाच्या खाध्य धान्यांच्या अर्थ प्रबंधात एक महत्त्वाचा स्थान आहे. पारंपारिक स्वयंपाकाच्या पद्धती व्यतिरिक्त धान्य प्रामुख्याने स्तनमोचन करणारे अन्न आणी दुसरे सातूचे वाळलेले सत्व भिजवून तयार केलेले धान्य पदार्थ उत्पादनात करण्यास वापरले जाते. ज्वारी हे ग्लूकोज आणी दुसरे पेयाच्या उत्पादनास वापरतात. नाचणी आणी गहू मिश्र क्षणात तयार होणारे शेवया बाजारात मिळते.

पोषक प्रतिरोधीचे प्रमाण कमी कसे करू शकतो?

काही पारंपारिक पद्धती जसे फुलवणे, भाजणे, मोड आणणे, भिजवणे आणी सातू करण्यामुळे कनिष्ठ तृणधान्यांच्या चिकटपणामध्ये हव्या प्रमाणे बदल आणले आहे. जास्तीत जास्त चिकटपणा हे सातू करताना होतो. धान्यांना मोड आल्या नंतर आणी उन्हात वाळवल्यामुळे खूपसा-या उपयोग नसलेल्या किण्वक (एनझाईम) नष्ट होतात. अमाइलेज आणी मिश्रचे चिकटपणा हे सातू न केलेल्या धान्याच्या मिश्रणापेक्षा फार कमी असते. सातू केलेले धान्य स्तनमोचन करणारे अन्नांमध्ये आणी वयस्कर लोकांच्या पोषणात लाभदायक आहे.

धान्यांचे पोषक महत्त्व (१०० ग्राम खाध्य भागात)

अन्नाचे नाव

ऊर्जा kcal

कैल्शियम m.g.

लोह m.g.

बाजरी

३६१

४२

८.०

ज्वारी

३४९

२५

४.१

मका

३४२

१०

२.३

नाचणी

३२८

३४४

३.९

जास्त प्रमाणात कैल्शियम असणारे अन्न पदार्थ (१०० ग्राम खाध्य भागात)

अन्न पदार्थ

एम जी

नाचणी

३४४

अगथी/ लालकमळ

११३०

कडीपत्ता

८३०

शेवगा पान

४४०

पोन्नंगणी/ आळूची पान

५१०

तीळ

१४५०

म्हशीचे दूध

२१०

गाईचे दूध

१२०

चीज

७९०

स्त्रोत : Dr. T. Vijayapushpam and Ms. Amulya Rao, National Institute of Nutrition, Hydrerabad

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate