तयार खाद्य पदार्थांचे पॅकेजिंग हे अत्यंत महत्त्वाचे असते. पॅकेजिंग चांगल्या प्रकारे झाले नसल्यास अन्नपदार्थ विविध जिवाणूंमुळे लवकर खराब होतात. त्यामध्ये लिस्टेरिया मोनोसायटोजेनच्या प्रादुर्भावामुळे तयार खाद्य पदार्थाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. डेन्मार्कमधील संशोधकांना या जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शीत वातावरणीय दाब प्लाझ्माच्या (कोल्ड ऍटमॉस्पियरिक प्रेशर प्लाझ्मा) प्रक्रियेचा चांगला फायदा होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. त्याचा फायदा मांसप्रक्रिया उद्योगासाठी होणार आहे.
मांस आणि सीफूडच्या तयार खाद्य पदार्थामध्ये लिस्टेरियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. मांस कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनामधून लिस्टेरियाचा प्रादुर्भाव प्रक्रियायुक्त मांसामध्ये होतो. त्या मांसाच्या पृष्ठभाग खराब होतो. सन 2008 मध्ये मॅपलच्या पानांमध्ये झालेल्या प्रादुर्भावामुळे कॅनडामध्ये 23 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा अलीकडील काळातील मोठा प्रादुर्भाव होता. त्यामुळे डेन्मार्कमधील संशोधिका सुझान नोचेल यांनी तयार मांसाच्या पॅकेजिंगमध्ये होणारा लिस्टेरियाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत संशोधन केले आहे. त्यामध्ये प्लाझ्माचा वापर केला असून, सूक्ष्म जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी प्लाझ्मातील अतिनील प्रकाशकण, भारीत कण आणि सुपर ऑक्साईड, हायड्राक्सील प्रकारच्या प्रतिकारक घटकांचा वापर केला जातो.
पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये तयार स्वरूपातील मांसामध्ये प्रयोगासाठी लिस्टेरियाने प्रदूषित केलेल्या मांसावर अप्रत्यक्ष प्लाझ्माचा मारा करण्यात आला. या मांसामध्ये ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे रंगामध्ये बदल होत असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्यावर15.5, 5, 31, 62 वॉट प्लाझ्माची प्रक्रिया दोन ते 60 सेकदांसाठी करण्यात आली. त्यामुळे लिस्टेरियाच्या प्रादुर्भावामध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात घट झाल्याचे आढळले आहे. प्लाझ्माच्या तीव्रतेचा आणि कालावधीतील बदलाने फारसा फरक पडत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे लिस्टेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/26/2020
सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही आ...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
महाराष्ट्राध्ये साधारणतः ४० लाख हेक्टर क्षेत्रावर ...
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर...