आपल्या देशात वेग-वेगळ्या पद्धतींनी शिशुला अतिरिक्त खाऊ घातले जाते. बहुदा, कुटुंबासाठी जे जेवण तयार करण्यात येते, त्यातलाच एक भाग शिशुला सुद्धा खायला घातले जाते. पण आपल्या देशात जे सर्व- साधारण कुटुंबात जेवण केले जाते, त्यात नवजात शिशुच्या योग्य वाढी साठी लागणारी पोषक तत्वाची कमतरता असते. मग आपण नवजात शिशुच्या योग्य वाढी साठी लागणारी पोषक तत्वाची पूर्ती करण्याचे निश्चित कसे करू शकतो? शिशुच्या योग्य वाढी साठी लागणारी पोषक तत्वाची गरज पूर्ती करण्यासारख्या खाऊ पदारर्थ तयार करणे हे योग्य उपाय आहे. पण अशा पद्धतीचे काही क्रियात्मक अडचणी आहेत. म्हणूनच पुढचे उपाय हे आहे की कुटुंबासाठी जे जेवण तयार करण्यात येते ते नवजात शिशुच्या सेवनासाठी योग्य कसे करू शकतो. हे काही प्रकारांमध्ये करू शकतो:
(a) पारंपारिक खाऊ घालण्याची पद्धती वापरणे, पण त्यात घरी त्यार केलेल्या अतिरिक्त पोषक तत्व घालून तयार करणे.
किंवा
(b) कुटुंबासाठी तयार केलेले जेवण योग्य प्रमाणात शिशुला खाऊ घालू शकतो.
बाजारात खूप सारे शिशुला खाऊ घालण्यासाठीचे तयार ट्रेडमार्क असलेले आहार उपलब्ध आहेत जास्त करून हे सूख्या दूध पावडरने बनवलेले असतात. दुधाच्या जास्त किमतीमुळे फार कमी माता हे बाजारात मिळणारे तयार ट्रेडमार्क असलेले आहार विकत घेऊन आपल्या बाळाला सांगितलेल्या योग्य प्रमाणात देऊ शकतात. त्यावर, असे ट्रेडमार्क असलेले आहार जे दूध पदार्थाने तयार केलेले आहेत, ते आईचे दूध सोडवण्याच्या वेळेस बाळाला त्याची गरज पडत नाही. नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन ने केलेल्या अभ्यासाने हे समजून येते की ७५% प्रथिन जे दुधापासून मिळते ते आपण पोषक तत्वाची कमी न करता दुस-या शाकाहारी (भाजी) आहारात मिळणा-या प्रथिन ने पूर्ती करू शकतो.
तसेच बाजारात मिळणारे तयार शिशु आहार फार कमी प्रमाणात मिळते आणि त्यांचे नेहमी मिळणे सुद्धा नक्की नाही.
या अडचणींमुळे, आपल्याला असे सूत्र तयार करण्याची गरज आहे ज्याने एक आरोग्यजनक शिशु आहार जे स्थानिक पातळीवर उपलब्ध असेलेल्या खाद्य पदार्थांपासून तयार करू शकतो. कमीत कमी दूध पावडर वापरून, हे आहार आपण काही जास्त अवडंबर न करता तयार करू शकतो. हे पदार्थ घरी जास्त प्रमाणात किंवा सार्वजजिक पातळीवर लघु उद्योगा सारखे तयार करू शकतो असे असायला पाहिजेत. असे पदार्थ मग आपण बाजारात तयार मिळणा-या पदार्था सारखे वापरू शकतो. हे खास करून कामाला जाणा-या महिलेंना उपयोगी आहे ज्यांना रोज शिशुला खाऊ घालण्यासाठी आहार तयार करायला फार कमी वेळ मिळतो.
पण आनेक अतिरिक्त खाद्य कार्यक्रमांमध्ये, निधि वेळेवर न मिळल्यामुळे, हे शक्य नाही की प्रत्येक बालकाला रोज ५०० कॅलरीज उपलब्ध करू शकतो. बर्याच कार्यक्रमांमध्ये फक्त ३०० कॅलरीज आणि ९- १० ग्राम प्रथिन देणे शक्य आहे. पाककृती जे वर्णन केले गेले आहेत ते अशा रीतीने सूत्रित केले आहेत जे या कार्यक्रमांच्या कार्यकर्तेंच्या सवलती प्रमाणे योग्य आहे आणि ३०० कॅलरीज आणि ९- १० ग्राम प्रथिन उपलब्ध करू शकते. जेव्हा निधि पुरेसे असेल तेव्हा हे काम्य असेल की आहाराचे प्रमाण ५०% वाढवू शकतो जेणे करून शिशुच्या पूर्ण पोषणाचे पूर्ती करू शकतो.
काही पदार्थ जे शिशुसाठी रोजच्या रोज तयार करू शकतो (खालील दिलेले) त्यात ४५०- ५०० कॅलरीज आणि १२-१४ ग्राम प्रथिन असणे आवश्यक आहे जे आपण स्तनपाना ऐवजी जरा मोठ्या शिशुला खाऊ घालू शकतो. ह्या पदार्थाचे प्रमाण प्रति बालक रोजच्यासाठी आहे आणि अशा पद्धथीने तयार केले गेले आहेत की दिवस भरात अनेक वेळा खाऊ घालू शकतो.
भाजलेली कणीक
२५ ग्राम (१ १/२ मोठा चमचा)
भाजलेले चणा डाळ पीठ
१५ ग्राम (१ मोठा चमचा)
भाजलेले शेंगदाणे पूड*
१० ग्राम (२ चहा चमचे)
साखर किंवा गूळ
३० ग्राम (२ मोठे चमचे)
पालक (किंवा दुसरी कोणतेही पाले भाजी)**
३० ग्राम
*एक महत्त्वाचा मुद्दा मनात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा शेंगदाणे वेगवेगळ्या पदार्थंमधे वापरले जाते तेव्हा फक्त चांगले दिसणारे दाणे घेतले पाहिजेत. बुरशी आलेले, सुकलेले आणि रंग उडालेले दाणे घेतले नाही पाहिजेत कारण त्यांच्या वापराने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
**शिशु आहारात पालक सारखे पाले भाज़ी आपण मिळविणे हे चांगले आहे. यांच्यामधून कॅलशियम आणि जीवनसत्त्व अ मिळते जे शिशुच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे. जर पाले भाजी मिळते नसतील तर नाचणी मिळवू शकतो ज्या मध्ये कॅलशियमचा प्रमाण जास्त आहे. पण यामध्ये जीवनसत्त्व अ मिळत नाही. अशा स्थितीत शिशुला जीवनसत्त्व अ दुस-या सूत्रातून मिळणे आवश्यक आहे. एक चमचा शार्कच्या लिव्हरचे तेल आठवड्यात एकदा दिल्यास आपण खात्री करू शकतो की शिशुला पुरेसे जीवनसत्त्व अ मिळेल.
भात
३० ग्राम (२ मोठे चमचे)
भाजलेले शेंगदाणे पूड*
१५ ग्राम (३ चहा चमचे)
भाजलेले मुगाचे पीठ किंवा तूर डाळ
१० ग्राम (३/४ मोठा चमचा)
साखर किंवा गूळ
३० ग्राम (२ मोठे चमचे)
पालक (किंवा दुसरे कोणतेही पाले भाजी)**
३० ग्राम
पूर्ण कुटुंबासाठी तयार केले जाणारे फारसे परार्थ आपण थोडेफार बदल करून लहान मुलांचे गरजा पूर्ण करू शकतो. असे एक पदार्थ आहे भाताचे खिचडी.
साहित्य
(पाले भाजी मिळवल्याने मुलाच्या आहारात जीवन सत्त्व आणि खनिज वाढते. साखर मिळवल्याने मुलाला खाण्यास चवदार होते. हे पदार्थ दात आलेल्या मुलांना सोईस्कर आहे जे चावू शकतात, विशेषतः एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना)) पद्धती
|
बहुदा सहा महिन्या नंतर, मुलाला कुटुंबा साठी तयार केलेले जेवणच देतात. या आहारामध्ये ६-७ ग्राम प्रथिन असते. ही कमतरता भरून काढण्यास, मिख्यकरून प्रथिन, त्यासाठी हे उचित असेले की त्यात.
३- ४ चमचे भाजलेले शेंगदाण्याचे पूड घालून शिशुला खाऊ घालू शलतो. साखर घातल्याने, शिशुला ते खाऊ फक्त रुचकरच नाही तर त्याने जास्त कॅलरीज सुद्धा मिळते.
आधी सांगितल्यानुसार, खालील पाककृती जास्त प्रमाणात तयार करून आपण शिशुला खऊ घालण्यास तयार ठेऊ शकतो. याच्या व्यतेरिक्त, शिशुला खालील खाऊ दिल्याने सुद्धा फायदा आहे:
1. रोज आर्धी वाटी फळाचे रस
2. एक चमचा शार्कच्या लिव्हरचे तेल- आठवड्यात एकदा
हे पदार्थ तयार करताना, बाजरी किंवा नाचणी सारखे धान्य वापरणे योग्य आहे. हे तृण धान्य तादूळ आणि गहू पेक्षा स्वस्त आहे, आणि त्या बरोबरच ते तेवढेच पौष्टिक आहेत. लहान वयात बाजरी आणि नाचणी दोल्याने मुलाला अनेक धान्यांचे चव चखण्यास मिळेल. खाऊ घालण्याच्या पद्धती बद्दल पान १३ वर दिले गेले आहे.
वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे बाजरी ऐवजी ४५ ग्राम नाचणी घ्या.
नाचणीला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून, नाचणीला एका थाळीत पसरवून त्यावर एका ओल्या कापडाने झाकून त्याला मोड येण्यास एक दिवस सोडा. मोड आलेल्या नाचणीला उनात वाळवून भाझून घ्या. सातूचे रस्य येऊ पर्यंत भाजा. त्याचे पूड करून हवाबंद डब्यात घालून ठेवा.
नाचणी ( तूस काढलेले आणि भाजलेली) |
४५ ग्राम |
भाजलेली चणा डाळ |
१० ग्राम |
साखर |
३० ग्राम |
बाजरी (भाजलेली) |
४५ ग्राम |
भाजलेले मूग डाळ |
१० ग्राम |
साखर |
३० ग्राम |
साहित्य
आख्खे गहू |
३५ ग्राम |
मूग डाळ |
२० ग्राम |
शेंगदाणे |
१० ग्राम |
गूळ |
३० ग्राम |
जरी मलई काढलेले दूध पावडर मिसळणे योग्य असले तरी कधी कधी ते उपलब्ध नसेल. अशा वेळेस सुद्धा आपण शिशु आहार स्थानिक बाजारात मिळणारी सामग्री वापरून वर दिल्या प्रमाणे तयार करू शकतो. जर मलई काढलेले दूध पावडर मिळत असेल तर १० ग्राम धान्या ऐवज़ी आपण दूध पावडर मिसळून देऊ शकतो.
गरजेनुसार, उचित प्रमाणात ( ६०- ७० ग्राम किंवा ३ मोठे चमचे) वर दिलेल्या पाककृतीपैकी पूड घेऊन (क्र. ५- ९) गरम पानीच्या थोड्या प्रमाणात मिसळा. खाऊ घालायच्या आगोधर लागेल तर जरा जास्त साखर घाला.
स्त्रोत :
परिशिष्ट: नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च
हैदराबाद – ५००००७
अंतिम सुधारित : 7/8/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...