অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पालेभाज्यांचे आहारातील महत्व

पालेभाज्यांचे आहारातील महत्व

आपल्या आहाराचे पिष्टमय , नत्रयुक्त , चरबी युक्त , क्षार , जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेतच पण आपल्या आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी 'अ' जीवनसत्व, कबौंदकांच्या पचनासाठी 'ब' जीवनसत्व तर स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी 'ई' जीवनसत्वाची गरज असते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी 'ड' जीवनसत्व, रक्ताची घनता ठरावीक प्रमाणात ठेवण्यासाठी 'के' जीवनसत्व आणि या सर्वांना सावरणारे असे 'क' जीवनसत्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेच असते. ही सर्व जीनवसत्वांची गरज आपण विविध पालेभाज्यांमध्ये भागवू शकतो.

याविषयी पालेभाज्यांमध्ये विविध खनिज तसेच खनिज तसेच एन्झाइम्सही विपुल प्रमाणात असतात. पालेभाजीची उपयुक्तता वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे त्यात असलेला चोथा. या चोथ्यामुळे शरीरात घाण साठून राहत नाही. आतडी कार्यक्षम राहतात. आतड्यातील आवश्यक जीवजंतूंची पैदासही या चोथ्यामुळेच होते. त्यामुळे आपण खालेल्या अन्नाच्या विविध घटकांचे अगदी शेवटपर्यंत नेऊन पचन करणे शरीराला सहज शक्य होते. शिवाय आतड्यात तयार होणारे पितासारखे विषमय पदार्थही या चोथ्यामुळे बाहेर टाकणे शक्य होते. अशाप्रकारे विविध पालेभाज्या आपल्या आहारात नित्य असणे गरजेचे आहे. काही पालेभाज्यांचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क

पालेभाजी अन्नघटक आहारातील उपयोग
१) पालक

प्रथिने - २0.0 टक्के

कॅल्शियम- ७३ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस - २१ मि.ली. ग्रॅम

लोह ९.१o मि.ली. ग्रॅम

'क' जीवनसत्व-

२८ मि.ली. ग्रॅम

शरीरात रक्तवृद्धी होते.रक्त शुद्ध होते तसेच हाडे मजबूत होतात. क' व 'ब' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास ते अधिक लाभदायी असतात. पालकमध्ये सल्फर, सोडियम, पोटेंशियम व अमिनो ऑम्लही असते.
२) मेथी

प्रथिने - ४.४ टक्के

कॅल्शियम- ३९५ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ५१ मि.ली. ग्रॅम

लोह- ५.१६ मि.ली. ग्रॅम

क’ जीवनसत्व - ५२ मि.ली. ग्रॅम

मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे.मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कमरेचे दुखणे दूर होते. शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत  अ' जीवनसत्व, कॅल्शियम, प्रथिने तसेच काबौहायड्रेडचे प्रमाण अधिक असते
३) चवळाई

प्रथिने - ४.0 टक्के

कॅल्शियम- ३९७ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ८३ मि.ली. ग्रॅम

लोह- ५.५५ मि.ली. ग्रॅम

‘क’ जीवनसत्व- ९९ मि.ली. ग्रॅम

चवळाई नियमित खाल्ल्याने शरीरातील 'अ', 'ब-१', 'ब-२', 'क' ही जीवनसत्वे व कॅल्शियम, लोह व पोटॅशियम यांची उणीव 'क' ही जीवनसत्वे व कॅल्शियम, लोह व पोटॅशियम यांची उणीव भरुन निघते. गरोदर व अंगावर पाजणा-या स्त्रिया यांनाही चवळाई लाभदायक आहे. संपूर्ण गरोदरपणात एक कप चवळाईचा रस, मध व चिमूटभर वेलची पूड घालून रोज घ्यावे. त्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होते व त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळते.
४) कोथिंबीर

प्रथिने - ३.३ टक्के

कॅल्शियम- १८४ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ७१ मि.ली. ग्रॅम

लोह- ५.१८ मि.ली. ग्रॅम

‘क’ जीवनसत्व- १३५ मि.ली. ग्रॅम

कोथिंबिरीची पाने जठराला सशक्त करुन त्याला कार्यप्रवण करतात. जठराची जळजळ कमी करून तेथील अंतःस्त्राव वाढवतात. कोथिबीरने ताप कमी होती, पित्त शमते, ती पौष्टिक आहे, दृष्टिदोष कमी होतो. कोथिबीर चटणी, कोशिबीर, खिचड़ी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वांकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी सदासर्वदा, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरली जाते.

कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जळजळीत पदार्थ खाणा-यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राॅग औषधांची रीअॅक्शन ,अंगावर पित्त , खाज किंवा गळवांचा त्रास होतो, त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा शोष हा उपद्रव कमी  करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा . भाज्यात कोथिंबीर अग्रस्थानी आहे.


५ ) आंबटचुका

प्रथिने - १.६ टक्के

कॅल्शियम- ६३ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- १७८ मि.ली. ग्रॅम

लोह- ७.८ मि.ली. ग्रॅम

'जीवनसत्व- १२ मि.ली. ग्रॅम

बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणा-या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावीत.
शेपू

प्रथिने - 3.0 टक्के

कॅल्शियम- १९0 मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस– ४२ मि.ली. ग्रॅम

लोह- १७४ मि.ली. ग्रॅम

‘क’ जीवनसत्व- २५ मि.ली. ग्रॅम

शेपूची भाजी रेचक, पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. शेपूच्या बियामुळे पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होते. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.
करडई

प्रथिने - २.५ टक्के

कॅल्शियम- १८५ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ३५ मि.ली. ग्रॅम

लोह- ७.५ मि.ली. ग्रॅम

'क'जीवनसत्व- १५ मि.ली. ग्रॅम

 

करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे.पालेभाजांच्या रसाने लघवी साफ होते.राजगेिरा
राजगिरा

प्रथिने - ५.९ टक्के

कॅल्शियम- ५३0 मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ६0 मि.ली. ग्रॅम

लोह- १८४ मि.ली. ग्रॅम

क'जीवनसत्व- ८१ मि.ली. ग्रॅम

 

राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीमध्येही आहेत.
तांदुळजा

प्रथिने - ४.0 टक्के

कॅल्शियम- ३९७ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ८३ मि.ली. ग्रॅम

लोह- ५.२५ मि.ली. ग्रॅम

'क'जीवनसत्व- ९९ मि.ली. ग्रॅम

शरीरात सी जीवनसत्वासाठी तांदुळजाची भाजी खावी, ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर-कांजन्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.विषविकार नेत्रविष्कार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतड्यांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्य़ाकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठ्या आतड्यास जास्त उपयुक्त घटक मिळतात. तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण व मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. असल्यास तांदुळजाचा रस प्यावा.

१० चाकवत

प्रथिने - ३.७ टक्के

कॅल्शियम- १५० मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ८0 मि.ली. ग्रॅ

लोह- २.४ मि.ली. ग्रॅम

'क'जीवनसत्व- ३५ मि.ली. ग्रॅम

चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात, पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर अग्रिमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरुप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो चाकवत रुचिकर, पाचक, रक्तशोधक, दर्दनाशक, त्रिदोषशामक, शीतवीर्य, बल व शुक्राणूवर्धक आहे. चाकवतमध्ये व्हिटामिन 'सी' व 'बी' युक्त आहे. चाकवत डोळे, लघवी व पोटासंबंधीच्या तक्रारीसाठी विशेष लाभदायक आहे.

११ अळू

प्रथिने - ६.८ टक्के


कॅल्शियम- ४६० मि.ली. ग्रॅम


फॉस्फरस- १२५ मि.ली. ग्रॅम


लोह- ३८७ मि.ली. ग्रॅम


'क'जीवनसत्व- ६३ मि.ली. ग्रॅम

अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पितावर उत्तम गुण देते. विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा.
१२ अंबाडी

प्रथिने - १.७ टक्के


कॅल्शियम- १७२ मि.ली. ग्रॅम


फॉस्फरस- ४० मि.ली. ग्रॅम


लोह- 0.५ मि.ली. ग्रॅम


'क'जीवनसत्व– २0 मि.ली. ग्रेम

 

अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे, पण डोळ्यांचे विकार, त्वचारोग,रक्ताचे विकार असणा-यांनी ती वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते. मिरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
१३ कडीपत्ता

प्रथिने - ६.१ टक्के १00 ग्रॅम


कॅल्शियम- ८३० मि.ली. ग्रॅम


फॉस्फरस- ५७ मि.ली. ग्रॅम


लोह- 0.७ मि.ली. ग्रॅम


'क'जीवनसत्व- ४ मि.ली. ग्रॅम

कढीपत्यामध्ये ८३0 मि.ली. ग्रॅम कॅल्शियम आहे, म्हणजे दुधाच्या जवळजवळ चौपट आहे. याशिवाय, फॉलिक अॅसिड व केरोटीनचे प्रमाणही जास्त आहे. फोलिक अॅसिड हे हृदयसंरक्षक 'बी' जीवनसत्व आहे, केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असून केसगळती थांबते. कोलेस्टेरॉल शर्करा कमी करण्याचा गुण कोथिंबिरीप्रमाणे यात देखील आहे. भाजीसाठी ओला मसाला बनवताना, कोणतीही चटणी बनवताना कढीपत्याचा भरपूर वापर करावा.
१४ घोळ

प्रथिने - २.४ टक्के


कॅल्शियम- १११ मि.ली. ग्रॅम


फॉस्फरस- ४५ मि.ली. ग्रॅम

 

लोह- ८.१४ मि.ली. ग्रॅम

 

क'जीवनसत्व- २९ मि.ली. ग्रॅम


 


 

घोळची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. चवीने ओशट असलेली घोळची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते, रक्तमूळव्याध, दातातून रक्त येणे , सूज, अंगाचा दाह, मुत्रपिंडाच्या विकारात उपयुक्त आहे .

नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.


 


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate