आमचा गावात HB कॅम्प,हेअल्थ कॅम्प,किशोरवयीन मुलांचे ट्रेनिंग हे कार्य जेव्हा सुरु केले तेव्हा मी कोणत्याही कामात सहभागी झालो नाही व घरच्यांना हि मी जाऊ दिले नाही,काय कामा सोडून हे रिकामी कामा आहे. असे मी समजायचो व जे जाणारे लोक मला सांगायचे तेव्हा त्यांनी सुद्धा म्हणायचो कि तुम्हाला काम नाही.पण जेव्हा मला नवविवाहित जोडप्याचे ट्रेनिंग उज्वला मदाम व सरांनी घेण्यासाठी योग्य जोडपे तुम्ही आहात तुम्ही हे ऐकून बघा तुम्ही या तेव्हा मला असे वाटले कि आपल्यापासून यांना तरी काय फायदा असणारे चला आपण हे ऐकून तरी बघू.
मी एकटा अगोदर येऊन बसलो. पण मेडमनी मला हे सांगितले कि हे ट्रेनिंग एकट्यांना देऊन काही उपयोग नाही.म्हणून मग मी माझी पत्नी जिला मी कधीही घराबाहेर पडू दिले नाही तिला मी स्वतः म्हंटले कि चल आपण हे ऐकून बघू तर तिलाही खूप आनंद झाला कि मला आत्तापर्यंत ज्या व्यक्ती ने कधीही घरा बाहेर जाऊ दिले नाही ते आज स्वत मला बोलवत आहे.
नवविव्हाहित प्रशिक्षण आम्ही दोघांनी घेतले,त्यामध्ये मुलगा-मुलगी होणे हे पुरुषांवर अवलंबून आहे हे मला कळाले. त्याच प्रमाणे मासिक पाळीहि मुलीची मातृत्वाची पावती आहे ती मासिक पाळी घाणेरडी नाही हे आम्हाला प्रशिक्षणा मधून कळले .तेव्हापासून मी कोणतेही कार्यक्रमसंस्थेचे काम सोडत नाही एवढेच नाहीतर मी आरोग्य समिती मध्ये सदस्य आहे व माझी पत्नी बचत गटामध्ये अध्यक्ष आहे.माझा स्त्रियां बद्दलचा आदर वाढला, संस्था ही आपल्यासाठी काम करते हे कळले व माझ्यात बद्दल झाला.
लेखक - सोपान जाधव हदियाबाद
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/26/2023