सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन, भूक मंदावणे, सिगारेट-विडीचे व्यसन, भरपूर प्रमाणावर भात व त्यावर मसालेदार रस्सा, प्रचंड मांसाहार व सुक्या मासळीचा अतिरेक, साठवलेले खाद्यपदार्थ यामुळे जठराचा कॅन्सर होण्याची भीती आहे. भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार लोक जठराच्या कॅन्सरने मृत्यूमुखी पडत असल्याचा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी एका अहवालाच्या आधारे केला आहे.
'नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री-आयसीएमआर'च्या अहवालाच्या आधारे बलदोटा इस्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्स या संस्थेचे चेअरमन डॉ. अमित मायदेव यांनी बुधवारी ही माहिती दिली. जठराचा कॅन्सर झालेल्या एका ७७ वर्षीय महिलेवर त्यांनी एंडोस्कोपिक सबम्युकोसल डिसेक्शन (ईएसडी) या आधुनिक तंत्रज्ञानाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा त्यांचा दावा आहे.
जठराच्या कॅन्सरचे प्रमाण गेल्या दहा वर्षांपासून भारतात वाढत आहे. भारतात अन्ननलिकेचा कॅन्सर प्रामुख्याने आढळतो. त्यानंतर जठराच्या कॅन्सरचे प्रमाण आहे. जठराचा कॅन्सर विकसनशील देशात अधिक आढळतो. सिगारेट पिणाऱ्यांमध्ये जठराचा कॅन्सर होण्याचे प्रमाण दुपटीने असते. पण विडी पिणाऱ्यांमध्ये तीन पटीने या कॅन्सरचा धोका वाढतो. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात या कॅन्सरचे प्रमाण अधिक असून पुरुषांमध्ये तो अधिक आढळतो.
दूषित पाणी व कच्चे सॅलेड यामध्ये एच पायलॉरी हा विषाणू आढळतो. हा विषाणू जठराच्या कॅन्सरला आमंत्रण देण्याची शक्यता असते. मुंबईत एक लाख नागरिकांच्या मागे पाच जणांना एच पायलॉरी या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याचा दावा डॉ. मायदेव यांनी केला.
सहा महिन्यांपासून अधिक काळ अॅसिडिटी असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. जठराचा कॅन्सर सूक्ष्म असताना निदान केले तर ९० टक्के पेशंट बरे होतात. गरमागरम खाद्यपदार्थ, प्रचंड प्रमाणात भाताचे सेवन व त्यासोबत तिखट आणि सुकी मासळी अधिक प्रमाण खाणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक आहे. त्यामुळे ताजी फळे व भाज्यांचे प्रमाण जेवणात अधिक ठेवल्यास जठराच्या कॅन्सरचा धोका टाळता येतो, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स
अंतिम सुधारित : 7/13/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...