निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो. श्वासनलिकाचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे. नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत. खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते. निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो. श्वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते. पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात.
स्त्रोत - m4 मराठी
अंतिम सुधारित : 10/7/2020
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...