उपचाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे केवळ रोगाच्या वरवरच्या त्रासदायक लक्षणांवर उपाय करणारी औषधे. डोकेदुखीवरच्या गोळया, खोकल्यावरचे पातळ औषध वगैरे या प्रकारचीच उदाहरणे आहेत. रोगाच्या मुळावर उपचार करणारी औषधे हा उपचाराचा दुसरा प्रकार आहे. ज्या रोगाचे कारण माहीत आहे व ज्याच्यावर उपचार शक्य आहे अशा आजारांवर मुळावरची औषधे वापरली पाहिजेत.
औषधांच्या काम करण्याच्या पध्दतींवरून औषधांचे पुढीलप्रमाणे काही ढोबळ प्रकार पाडलेले आहेत
ही औषधे रोगाचे जंतू मारण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी असतात. उदा. पेनिसिलिन, कोझाल, क्लोरोक्वीन क्षयरोगावर वापरली जाणारी औषधे (स्ट्रेप्टोमायसिन) वगैरे.
उदा. शरीरात लोहाची (लोखंड) कमतरता असेल तर लोहक्षार असलेली औषधे देणे, जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर ती जीवनसत्त्वे देणे, इत्यादी.
सासायनिक क्रिया वगैरे (वाढवणे, कमी करणे,बदलणे) बदलणा-या औषधांचा तिसरा प्रकार होतो. डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळया,झोपेच्या गोळया फेफरे-झटके यांवरच्या गोळया, इ. सर्व या प्रकारात येतात. बरीचशी औषधे या गटात मोडतात.
उदा. पोलिओ, त्रिगुणी लस.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/31/2020
होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक क...
औषधे निरनिराळया स्वरूपांत मिळतात. काही औषधे फक्त त...
काही वेळा गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भाच्या आरो...
आयुर्वेदाने औषधे तयार करण्याच्या वेगवेगळया पध्दती ...