आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. मात्र त्याच वेळी औषधे खाण्याचीच काय, पण साध्या जेवणावरची वासना उडून गेलेली असते. त्यामुळे पेशंटची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देण्यात येणारी औषधे जर कुकीज किंवा बेकरी पदार्थांच्या माध्यमातून उपलब्ध केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. याबाबत सर्बीयन संशोधकांनी संशोधन केले असून, औषधी वनस्पतीच्या रसातील इथानॉलिक घटकाचा वापर बेकरी पदार्थांमध्ये केला आहे. या संशोधनामुळे औषधी वनस्पतीतील अनेक उपयुक्त रासायनिक घटक विविध प्रकारच्या कुकीजच्या माध्यमातून पेशंटपर्यंत पोचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे कुकीजच्या पोषक मूल्यामध्ये वाढ होत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन "फूड सायन्स' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले आहे.
सर्बीयातील अन्न तंत्रज्ञान संस्थेमधील अलेक्सॅड्रा मिसान यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने अनेक प्रकारच्या फळांतील आणि मिंटच्या पानांतील प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक एकत्रित करून त्याचे दोन ते सहा टक्के प्रमाणाच्या कुकीज विकसित केल्या आहेत. या प्रक्रियेत होणारे रासायनिक घटकाचे नुकसान कमी करण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न केले आहेत.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...