অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गणेशोत्सव कसा साजरा कराल?

गणेशोत्सव कसा साजरा कराल? निसर्गविरोधी की निसर्गस्नेही

निसर्गविरोधी

प्लास्टरच्या मूर्ती : प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्‍या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने                     सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत.

विषारी रंग      : मूर्तीचे रासायनिक रंग अत्यंत विषारी असतात.

मूर्तिचा आकार   : मोठ्या आकाराच्या मूर्तीमुळे मातीचा आणि प्लॅस्टरचा वापर वाढतोे. या मूर्तीच्या विसर्जनानंतर

नद्या, विहिरी, तळी यांमध्ये गाळ वाढतो.

आरास         : प्लास्टिक, थर्माकोल अशा अ-विघटनक्षम पदार्थांचा वापर केला जातो. रोषणाईसाठी वीज जाळली जाते.

निर्माल्य        : पाण्यात टाकले गेल्याने पाणी दूषित होते.

ध्वनिप्रदूषण     : सार्वजनिक आणि घरगुती उत्सवात ध्वनिवर्धकांचा अतिरेकी वापर होतो.

आरोग्य आणि निसर्गाची अशी हानी हिंदू धर्माला मान्य नाही.

निसर्गस्नेही

गणेशोत्सव असा साजरा करा!

  • मूर्ती मातीचीच असावी. ती शक्यतो स्वत: बनवा. मूर्तीसाठी घराच्या आजूबाजूच्या मातीचा वापर करा.
  • ती छोटी असावी. मूर्तीचा आकार आणि भक्ती यांचा काहीही संबंध नाही.
  • मातीचे व जलरंग वापरून ती रंगवा किंवा शेंदूर वापरा.
  • हे शक्य नसेल, तर नेहमीच्या पूजेतील धातूची गणेशमूर्ती वा एखादी फोटोफ्रेम ‘उत्सवमूर्ती’ म्हणून बसवा.
  • आरास करण्यासाठी रंगीत पाने, फुले, फळे इत्यादींचा वापर करा. प्लास्टिक, थर्माकोल किंवा अगदी कागदाचाही वापर टाळा.
  • मूर्तीपाशी तेलाचा दिवा लावा. विजेची रोषणाई टाळा.
  • मूर्तीचे विसर्जन घरीच बादलीत करा.
  • निर्माल्याचे विसर्जन कुंडीत किंवा झाडांच्या बुंध्याशी करा. त्याचे खत बनेल.
  • ध्वनिवर्धकांचा वापर टाळा.

काळाच्या ओघात धर्मात शिरलेल्या विकृती दूर करून हिंदू धर्म पुनश्‍च निसर्गस्नेही बनवू या.

 

स्रोत : गतिमान संतुलन

स्त्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate