वयाप्रमाणे झोपेची गरज बदलते. लहान मूल दिवसारात्री अनेक तास झोपते. याउलट वृध्द माणसांची झोप कमी असते. वयाच्या मानाने पुरेशी शांत झोप लागणे आवश्यक आहे. आरोग्याचे एक लक्षण म्हणजे 6-८ तास शांत झोप आणि झोपून उठल्यावर प्रसन्नता वाटणे. रात्री जास्त जागणे, दिवसा उशिरा उठणे यामुळे पचनसंस्थेचे चक्र बिघडते. रात्रीचे जेवण उशिरा झाले तर सकाळी जडपणा राहतो हे आपल्या अनुभवाचे आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास हलके जेवण घेऊन लवकर झोपून पहाटे उठणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. दुपारच्या झोपेने आळस येतो. त्यामुळे निदान तरूण वयात तरी दुपारची झोप टाळणे आवश्यक आहे. मात्र प्रौढ वयात दुपारी 5-10 मिनिटांची डुलकी घेणे फायद्याचे असते. त्याने मनावरचा तणाव कमी होतो. झोपेत स्वप्न पडणे हे नैसर्गिक आहे. पण स्वप्नांमध्ये नेहमी भीती वाटणे, ओरडून उठणे, अशांत झोप हा त्रास असेल तर योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
नोकरीची रोजची वेळ गाठणं आणि कामाचा ताण यामुळे सकाळ...
झोप ही माणसाची मानसिक आणि शारीरिक गरज आहे. वयाप्रम...