অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिनचर्येत गडबड.. झोपेची परवड

निद्राविकार

रात्री झोपेची वेळ असताना नेटवर पडीक असणारे, कॉल सेंटर किंवा रात्रपाळीमुळे रात्रीचा दिवस करणारे अशांच्या झोपेची नेहेमीच वाट लागते. रात्र तर खराब होतेच पण दिवसही झोपेत जातो. अशा व्यक्तींना अनियमित दिनचक्रामुळे काही निद्राविकार होऊ शकतात..
दिनाचक्रातील अनियमिततेमुळे होणाऱ्या निद्राविकारांची अनेकांना कल्पना नसते. कम्प्युटर तसेच नेटच्या जेटयुगात हे विकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यत अनेकांना भेडसावतात. तरुणाई ही या विकारांना विशेषकरून बळी पडते आहे. २०२० साली जगातला सर्वांत तरुण देश होणारा भारत जर निद्राविकारांमुळे अकार्यक्षम होणार असेल तर आताच या पुढच्या हाका ऐकून सावध व्हायला हवे.

दिनचक्रातील बिघाडामुळे होणाऱ्या निद्राविकारांची लक्षणे अशी

 • वेळेवर झोप न लागणे
 • झोपेतून जाग येणे आणि पुन्हा झोप न लागणे, दीर्घकाळ झोपेसाठी तळमळत राहणे
 • रात्री व पहाटे खूप लवकर जाग येणे, नंतर पुन्हा झोप न लागणे
 • दिवसभर सुस्तपणा व झोपाळूपणा वाटणे

कारणे कोणती?

व्यक्तीच्या मेंदूत जवळपास मध्यभागी एक छोटी द्विपर्णी संरचना असते. ते झोप व जागेपणीच्या नियमनाचे केंद्र असते. थोडक्यात, ती जैविक घड्याळाची कळच असते म्हणाना. यातील बिघाडामुळे 'सर्काडियन रिदम स्लीप डिसऑर्डर' होऊ शकतात. यासोबत मानवी देहात एक नैसर्गिक आंतरिक संतुलनभार असतो. जो शारीरिक थकव्याशी थेटच संबधित असतो. या दोहोंच्या एकत्रित कार्यप्रणालीमुळे वेळच्या वेळी झोप लागत नाही. तसेच, मध्येच जाग येते. ठरलेल्या वेळी झोप न घेता येणारा हा निद्राविकार त्या दिवशीच्या झोपेचे व पर्यायाने पुढच्या दिवसांचे खोबरे करतो.
खूप जागरण वा रात्री उशिरापर्यंत झोपेच घडयाळ लांबवण्याची वृत्ती-
वाढत्या वयानुरुप झोपेची वेळ संध्याकाळी सहा ते सात वाजता अलीकडे येते. त्यावेळी झोपणे अनेकांना शक्य होत नाही. कारण घरातील इतरांचा दिवस सुरू असतो. आपल्य आंतरिक घड्याळानुसार ही झोप पहाटे एक वा दोन वाजता पूर्ण होते. परंतु रात्री अकरा वा बारा वाजता झोपी गेल्यास शरीरातील थकवा वाढतो. तो भरून येत नाही. शरीराचे घड्याळ बिघडल्याने ती व्यक्ती दुसऱ्या दिवशीही उत्साहाने काम करू शकत नाही.
बदलत्या कामांच्या वेळांमुळे शिफ्ट वर्क सिन्ड्रोम तयार होतो, त्यामुळे अशा व्यक्तींची जीवनशैली विस्कळीत होते.
समयक्षेत्र तफावतीमुळे होणारे विकार अक्षांश-रेखांश बदलणाऱ्या प्रदेशांत वारंवार बदल केल्याने शरीरातील समयनियंत्रक बिघडतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे वा विशिष्ट कामकाजामुळे झोपेचे घड्याळ दोन तासांनी पुढे जाते.

परिणाम

 • अकार्यक्षमता
 • नैराश्य, औदासिन्य
 • सामाजिक अस्वास्थ
 • नातेसंबधातील तणाव
 • नपुंसकता

उपचार

 • जीवनशैली बदल हा प्रमुख उपचार
 • प्रखर सूर्यप्रकाशामधील वाढता वावर
 • मेलॅनिन या रंगद्रव्याची योग्य मात्रा झोप व जागृती चक्राचे नियमन करते.
 • निद्राविकार व निद्राअभ्यास करून वैद्यकीय उपचाराची तातडीने सुरुवात करावी.

डॉ. प्रसाद कर्णिक, पीएच. डी. लाइफ सायन्सेस

स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate