लवकर उठणे हा आरोग्याचा अगदी महत्त्वाचा नियम आहे. लवकर उठण्याने मलविसर्जन नियमित व्हायला मदत होते. व्यायामही सकाळी लवकरच करणे आवश्यक असते. लवकर उठण्यासाठी रात्री लवकर जेवणे व लवकर झोपणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राने मानवी जीवनाच्या रात्रंदिन चक्राचा अभ्यास करून शरीराला स्वत:चे 'घडयाळ' असते असे सिध्द केले आहे. आयुर्वेदाने ते फार पूर्वीच सांगितले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे दैनंदिन जीवनाचे घडयाळ सांभाळायला पाहिजे. या घडयाळानुसार मानवी शरीरात अनेक जैवरासायनिक चक्रे असतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 1/28/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
दहा दिवसांपेक्षा अधिक अवधीनंतर तोच बाह्य पदार्थ दु...
फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे...