आरोग्यकारक विचारांचा,सवयींचा समाजात प्रसार व्हावा म्हणून आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हजारो गोळया, औषधे, इंजेक्शनांनी जे काम होत नाही ते साध्या उपायांनी, चांगल्या सवयींनी होऊ शकते. उदाहरणार्थ,दारूच्या व्यसनापासून समाजाची मुक्ती ही लाखो लोकांचे आजार आणि दुःख टाळू शकते. काही देशांमध्ये मांसाहाराचा अतिरेक टाळण्याचे पध्दतशीर प्रयत्न झाले,त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी झाले. हे काम अनेक रूग्णालये सुरू करूनही झाले नसते. मच्छरदाणीचा नियमित वापर करायला शिकवणे हे शेकडो लोकांना दरवर्षी मलेरियाच्या गोळया देण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. दिसायला साध्या, सोप्या गोष्टींचा प्रसार करून सामाजिक आरोग्य कसे वाढू शकते याची ही उदाहरणे आहेत. अशी अगणित उदाहरणे आहेत. म्हणूनच आपण आरोग्यशिक्षण ही महत्त्वाची जबाबदारी समजून जमेल तितके प्रयत्न करीत राहिले पाहिजे. यासाठी सहज होतील अशा प्रयत्नांबरोबरच काही पध्दतशीर काम करणेही आवश्यक असते.
स्त्रोत : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रत्यक्ष आरोग्यशिक्षण करताना ब-याच अडचणी येतात. त...
कोठल्याही विषयावर/समस्येवर आरोग्यशिक्षण करायचे असल...
निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिल...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित स्त्रीचं व्यक्तिमत्व जप...