অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शांत झोपेसाठी

निद्राविकार

आपण काय खातो यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असतेच, पण आपण किती वेळ झोपतो, आपल्या निद्रेचा पॅटर्न कसा आहे, हेदेखील निरामय आरोग्याचे निदर्शक आहे. झोपी जाणे म्हणजे मेंदू स्वीच ऑफ करणे हा समज आता विज्ञानातील नव्या संशोधनाने बदलायला लावला आहेच, त्यासोबत निद्रेच्या विविध विकारांवर संशोधनही सुरू झाले आहे. निद्राविकार कोणते व ते का होतात, त्यांच्यावर मात कशी करता येईल, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
झोप ही आपल्या शरीराची अचेतन अवस्था नसून एका विशिष्ट प्रकारची जागृत अवस्था आहे. आपण झोपलो की, मेंदूचे काही भाग काम सुरू करतात. आपली झोप टिकवण्यासाठी अथकपणे काम करू लागतात. एखादे नाटक संपल्यावर रंगमंचावर आवराआवर सुरू होते, अगदी त्याचप्रमाणे. दिवसभरातील घडामोडी, बरे- वाईट अनुभव, विविध विचार आणि माहितीचा महापूर मेंदूला सामावून घ्यायचा असतो. झोप ही माणसाला अत्यावश्यक असली, तरी निसर्गाने रचलेली ही सुरक्षायोजना अनेकदा बिघडते. विविध प्रकारच्या निद्राविकारांमध्ये व्यक्ती अडकते.

पॅरासॉम्निया म्हणजे नेमके काय?



पॅरासॉम्निया म्हणजे विविध प्रकारचे निद्राविकार. हे विकार जडलेल्या अनेक व्यक्ती झोपेच चालतात वा बोलतात. त्यांना सकाळी उठल्यावर आपल्या कृतींचे स्मरण नसते. अतिशय नाट्यपूर्ण असा हा निद्राविकार आहे. झोपेत आपल्या हातून काय कृती घडू शकते, यावर या व्यक्तीचे नियंत्रण नसते. त्याच्या डोक्यातील वेड्यावाकड्या विचारांवर ही व्यक्ती कृती करत जाते. आपण झोपेत असे वागलो होतो, याचा पूर्णपणे विसरही त्यांना पडतो. झोपेच चालणे, बोलणे, नखे खाणे, दात चावणे ही या विकाराची लक्षणे आहेत. एखादे लहान मुलं झोपेतून उठून बसते वा त्याला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोठ्याने किंचाळून उत्तर देते, त्याला नाईट टेरर असेही म्हणतात. पन्नाशीनंतर होणारा हा आजार रेम स्लीप बिहेव्हिअर डिसऑर्डरमध्ये गणला जातो.

रेस्टलेस लेग सिन्ड्रोम

काही व्यक्तींना झोपेमध्ये फिटस् म्हणजे एपिलेप्सीचा त्रास असतो. त्याचे योग्य निदान न झाल्यास या व्यक्ती अंधश्रद्धांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यांच्या हातापायांच्या अस्ताव्यस्त होणाऱ्या हालचालींना रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणतात. अॅनिमिया असल्यास याचा त्रास अधिक जाणवतो. अधिक थकवा येतो, लहान मुलांना हा निद्राविकार असल्यास ती हायपर होतात.

उपचार -झोपेचा पॅटर्न कसा आहे, याचा शास्त्रीय अभ्यास करणेकोणत्याही प्रकारच्या औषधांविना झोपेचा पॅटर्न सुधारता येतो

आहारामध्ये आवश्यक बदल



स्लीप स्टडीमध्ये झोपेमधील त्रुटी, त्यातील दोष व आजारांचा अभ्यास केला जातो.
मेंदूमधील काही विशिष्ट संप्रेरकांचा झोपेशी जवळचा संबध असतो, या लहरींचा व शरीराचा संवाद कसा आहे, याचा वैद्यकीय पद्धतीने अभ्यास करून योग्य उपचारपद्धतीने या निद्राविकारांवर मात करता येते.

 

स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

 

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate