অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्य विभागाची कायापालट योजना

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य संस्थांचे जाळे असून त्या माध्यमातून ग्रामीण जनतेला  विशेषतः गरीब व जोखमीच्या लोकांना  गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते.  राज्यातील ग्रामीण जनतेला विविध गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे राज्यातील रुग्णालयांचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मोठा सहभाग आहे. राज्यातील काही रुग्णालये दुरवस्थेत असल्यामुळे परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कमी पडत आहेत असे सर्वसाधारण आढाव्याअंती राज्य शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कायापालट योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेत व सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण बदल झाला आहे. त्यामुळे हि योजना राज्यातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज व लोकाभिमुख करण्यासाठी संपूर्ण राज्यात राबविण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सदर योजनेचे काही प्रमुख उद्दिष्टे

  1. लोक/कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे
  2. राज्य शासनाच्या रुग्णालयातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे जनतेचा राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे व सर्व सार्वजनिक आरोग्य सेवेकडे सर्वांना आकर्षित करणे
  3. शासकीय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता व परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच वापर करणे.
  4. रुगानांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाधान करणे.
  5. शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे (Institutional Deliveries) प्रमाण वाढविणे.
  6. शासकीय आरोग्य संस्थांमधील बाह्य रुग्ण व आंतरुग्णांची संख्या वाढविणे
  7. शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवा देणाऱ्या ( Service Provider ) कर्मचार्यांच्या मानसिक दृष्टीकोनात  सकारात्मक ( Positive ) बदल घडवून आणणे.
  8. रुग्णाच्या तपासणीसाठी व आजारांच्या अचूक निदानासाठी प्रयोगशाळांची गुणवत्ता वाढविणे
  9. पोलीस स्टेशन असलेल्या ठिकाणी शवविच्छेदनाची सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे

 

या संबधीचा शासन निर्णय दिनांक ३ सप्टेंबर 2014 रोजी जारी केला आहे.

शासन निर्णय क्रमांक : कायापा-२०१४/प्र. क्र. १९९/ आरोग्य -३ , तारीख: ३ सपटंबर, २०१४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑपरेशन कायापालट नुसार बदल केलेले काही प्राथमिक आरोग्य केंद्रे

- कायापालट - १

- कायापालट - 2

कायापालट - 3

 

 

संदर्भ : सार्वजिनक आरोग्य विभाग,  महाराष्ट्र शासन

 

 

 

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate