অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आशा

प्रस्तावना

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ASHA या मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक ASHA तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक ASHA नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे ASHA मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही ASHA वर असते. ग्रामीण भागातील ASHA या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे ASHA ना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.

ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास ASHA सदैव तत्पर असतात.

आशा ची ठळक वैशिष्टये

१. आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ASHA ओळखल्या जातात. २. आशा एक प्रशिक्षित (आरोग्य) कर्मचारी असुन आदिवासी व गैर-आदिवासी भागातील जनता व (आरोग्य विषयक) सरकारी कर्मचारी यांच्यात दुव्याचे काम करतात. ३. समाजात आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न उदभवल्यास प्रथम आशा ला कळवले जाते. ४. समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम ASHA मार्फत केले जाते. ५. आरोग्य विषयक गोष्टींना चालना देण्याचे कामही ASHA मार्फत केले जाते. ६. राज्यातील १५ आदिवासी व ३१ गैर-आदिवासी जिल्हयांमध्ये ASHA कार्यरत आहेत. ७. ASHA ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा) करण्यावर अवलंबून आहे.

ASHA ची नियुक्ती

आदिवासी क्षेत्र १. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ ASHA. २. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. ३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २०-४५ वयोगटातील असव्यात. ४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी. गैर-आदिवासी क्षेत्र:- १. गैर-आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ ASHA असते. २. गैर-आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. ३. गैर-आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २५ - ४५ वयोगटातील असव्यात. ४. गैर-आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी. नियुक्ती प्रक्रिया:- १. निवड केलेल्या उमेदवारांमधुन VHNSC ग्रामसभेला ३ नावे सुचित करतात. २. ग्रामसभेला सुचित केलेल्या ३ उमेदवारांमधुन एका उमेदवाराची ASHA म्हणुन नियुक्ती केली जाते. ३. ASHA ची नियुक्ती झाल्याचे नियुक्ती पत्र तालुका आरोग्य अधिका-यामार्फत निर्गमित केले जाते.

आशाला मदत करणारी यंत्रणा

१. एका जिल्हयासाठी १ DCM (District Community Mobiliser). २. एक आदिवासी भागासाठी १ BCM (Block Community Mobiliser). ३. आदिवासी भागात प्रत्येक १० ASHA साठी १ Block Facilitator. ४. गैर-आदिवासी भागात प्रत्येक PHC साठी १ Block Facilitator. ५. ASHA स मदत करण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येकी एका सल्लागार समितीची निर्मीती केलेली आहे.

प्रशिक्षण

१. ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर ASHA प्रशिक्षणासाठी पात्र ठरते. २. प्रशिक्षण हे ७+४+४+४+४ असे एकुण २३ दिवस अशा प्रकारे ५ सत्रात विभागलेले असते. ३. प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ASHA ला तिच्या कार्यकुशलतेवर आधारित प्रोत्साहनपर वेतन/भत्ते प्राप्त होत असतात. ४. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच ASHA प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.

प्रोत्साहनपर वेतन/भत्ते

१. ASHA ला दिले जाणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ता तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो. २. ASHA च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात. ३. ASHA ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे महिन्यातुन एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात. ४. ASHA ला दिले जाणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात.

 

स्त्रोत : आरोग्य आशा

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate