केंद्र शासन पुरस्कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला. मार्च २०१२ मध्ये या प्रकल्पासाठी असलेले जागतिक बॅकेचे अर्थ सहाय संपुष्टात आले असून सध्या हा प्रकल्प पुर्णपणे केंद्र शासन पुरस्कृत स्वरुपात सुरु आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व रोग सर्वेक्षण व्यवस्थांचे एकञिकरण करणे हा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रमुख उदेश आहे. अत्याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करुन सर्व स्तरावरील माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान करणे तसेच स्थानिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत रोग सर्वेक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करुन रोग नियंञणाच्या उददिष्टास हातभार लावणे हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्वपूर्ण हेतू आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पाचे मुख्यालय सहसंचालक आरोग्य सेवा पुणे १ येथे आहे.
या अंतर्गत २ जिल्हा रुग्णालयांच्या प्रयोगशाळा व १० वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांचा समावेश करण्यात आलेला आहे.साथरोग उद्रेकाच्या वेळी जिल्हयांना प्रयोगशाळा सुविधा पुरविणे हा या प्रयोगशाळांचा प्रमुख उद्देश आहे.
अ.क्र. | संदर्भ प्रयोगशाळेचे नाव | जोडलेले जिल्हे |
---|---|---|
१ | श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे |
|
२ | बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे |
|
३ | डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर |
|
४ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि.सांगली |
|
५ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद |
|
६ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड |
|
७) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला |
|
८) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर |
|
९) | सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा |
|
१०) | ग्रॅट मेडिकल कॉलेज, मुंबई |
|
बीड व नाशिक या २ जिल्हयातील जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळा म्हणून विकसीत करण्यात आल्या आहेत.
हा टोल फ्री क्रमांक २४तास उपलब्ध असून देशातील सर्व ठिकाणाहून त्यावर फोन करता येतो. ही सुविधा फेब्रुवारी २००८ पासून सुरु करण्यात आली आहे. असामान्य लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास अथवा रुग्ण संख्येत आकस्मिक वाढ झाल्यास खाजगी वैद्यकीय व्याववसायिकांनीही या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा , ही अपेक्षा आहे.
राज्यातील साथरोग परिस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी जिल्हा तसेच राज्य स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या पथकामध्ये साथरोग तज्ञ, सूक्ष्मजीवशास्ञज्ञ, कीटकशास्ञज्ञ, भिषक/ बालरोगतज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या प्रत्येक उद्रेकाचे अन्वेषण या पथकामार्फत केले जाते.
सर्वेक्षण स्तरानुसार या कार्यक्रमात लक्षणांवर, अनुमानांवर तसेचप्रयोगशाळा निदानावर आधारीत विविध व्याख्या वापरण्यात येतात.
या कार्यक्रमात राज्य व जिल्हा स्तरावर सर्वेक्ष्ाण कक्ष कार्यरत आहेत. राज्य स्तरावर राज्य सर्वेक्ष्ाण अधिका-याच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विषयातील विशेष तज्ञाचे पथक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावही जिल्हासर्वेक्षण अधिका-यासोबत जिल्हा साथरोग तज्ञ कार्यरत आहेत.
सन २०१२ मध्ये एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्पांतर्गत पोर्टलवर एकुण ४३६ साथरोग उद्रेक नोंदविण्यात आले आहेत.
या ४३६ साथरोग उद्रेकांपैकी सर्वाधिक १२७ उद्रेक डेंगी तापाचे असून त्या खालोखाल अतिसार व इतर तापाचे प्रत्येकी ८३ उद्रेक नोंदविण्यात आले आहेत.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/24/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...