किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत WIFS, PMHS, AFHC हे घटक कार्यक्रम राबविले जातात. ''विकली आयर्न फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन'' हा कार्यक्रम पूर्ण देशभर आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत महिला व बाल कल्याण मंत्रालय व समाज कल्याण मंत्रालय यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. भारतातील 15 ते 19 वयोगटातील एक तृतीयांश मुला-मुलीमध्ये रक्तक्षय आढळून येतो. NFHS 42015-16 नुसार नंदुरबार जिल्ह्यात 15 ते 49 वयोगटातील स्त्रियामध्ये रक्तक्षयाचे प्रमाण 62 टक्के आहे. तसेच 6 ते 59 महिने वयोगटातील बालकामध्ये रक्तक्षयाचे प्रमाण हे 61 टक्के आहे. याशिवाय शारिरीक व मानसिक विकासामध्ये रक्तक्षयामुळे विपरीत परिणात दिसून येतात. रक्तक्षय असलेली मुलगी जेव्हा आई बनते तेव्हा ती अधिकच तिच्यामध्ये रक्तक्षय अधिक (ॲनिमिक) वाढतो.
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आहारामुळे असणाऱ्या रक्तक्षयाच्या प्रमाणी तिव्रता कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक शासकीय शाळा, अनुदानीत विना-अनुदानित महानगरपालिका व रहिवाशी शाळामध्ये जाणारे किशोरवयीन मुले मुली इ. 6 ते 12 वीमध्ये शिकतात. त्याचप्रमाणे 10 ते 19 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुली यांच्यापर्यंत अंगणवाडीच्या माध्यमातून पोहोचणे व त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत इ. 6 ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दर सोमवारी Tab.IFA(Blue Tablet) व शाळाबाह्य 10 ते 19 वर्षे वयोगटातील मुली यांना अंगणवाडीमार्फत Tab.IFA सेवन करावयाचे आहे. तसेच 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळेतर्गत Tab.WIFS Junior (Pink Tablet) दर सोमवारी सेवन करावयाचे आहे.
या कार्यक्रमांतर्गत विविध विभागांनी कामे करावयाची असून आरोग्य विभाग- Tab.IFA चे शाळा व अंगणवाडी स्तरावर वाटप करणे, तालुका स्तरावर अंगणवाडी व शिक्षण विभागाकडून अहवाल एकत्रित करून जिल्हास्तरावरून सादर करणे, कार्यक्रमाचे सहनियत्रण करणे.
शिक्षण विभाग- शाळेमध्ये दर आठवड्याला मुला-मुलींना गोळ्यांचे सेवन करणे दर महिन्याच्या शेवटी सेवन झालेल्या गोळ्यांचा अहवाल तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाला सादर करणे.
महिला व बालविकास विभाग- अंगणवाडी स्तरावर शाळाबाह्य मुलींना सेवन करणे दर महिन्याच्या शेवटी सेवन झालेल्या गोळ्यांचा अहवाल तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाल सादर करणे.
किशोर अवस्थेतील मुलीमध्ये शारिरीक, मानसिक, भावनिक सामाजिक बदल होत असतात. यामध्ये मुख्यत: मासिक पाळी सुरू होणे या महत्वाच्या टप्प्याचा समावेश आहे. एकूण लोकसंख्येमध्ये किशोरवयीन मुलीची संख्या अंदाजे 10 ते 11 टक्के एवढी आहे. मासिक पाळी सुरू होण्याचे वय 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते. योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नैराश्य येणे, उदासिनता येणे, शारिरीक अस्वच्छता व त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी केंद्र शासनाकडून सुचीत केलेल्या मासिक पाळीच्या वेळेस घ्यावयाच्या काळजीबाबत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 10 ते 19 वर्षाच्या किशोरवयीन मुलींसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे. माफक दरात सॅनिटरी नॅपकिन गावपातळीवर आशामार्फत उपलब्ध करून देणे व त्यांचे योग्य पद्धतीने विल्लेवाट लावणे.
राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत संस्था व सामाजिक पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येतात. आपल्या जिल्ह्यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मैत्री क्लिनीकची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्लिनीकमध्ये 10 ते 19 वयोगटातील किशोर मुला-मुलींचा आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यात येते. आपल्या जिल्ह्यातील 12 ग्रामीण रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय याठिकाणी यांची नियूक्ती करण्यात आलेली आहे. यांच्यामार्फत किशोर मुला-मुलींना आरोग्याबाबत सल्ला व मार्गदर्शन केले जाते.
मैत्री क्लिनीक स्थापन करण्यात आलेल्या 12 प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावामध्ये ग्राम पातळीवर हजारी लोकसंख्येमागे 10 ते 19 वयोगटातील 2 मुले व 2 मुली यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत गावातील मुली-मुलींचे गट स्थापन करून त्याद्वारे त्यांच्या आरोग्य समस्याचे निराकरण करण्यात येते. किशोरवयीन आरोग्य दिवस तीन महिन्यातून एकदा उपकेंद्र स्तरावरील गावांमध्ये आयोजित करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने पौगंडावस्थेतील आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यात येते. उदा. आहार, लैंगिक व प्रजनन आरोग्य, मानसिक आरोग्य, अन्याय, वागणूक हिंसाचार, मादक पदार्थाचा गैरवापर व असंसर्गजन्य आजार इत्यादी.
10 ते 19 वर्षे वयोगटातील WIFS गोळ्या सेवन करणारे किशोरवयीन लाभार्थी संख्या नंदुरबार तालुक्यातील 47 हजार 230, नवापूर 29 हजार 269, शहादा 45 हजार 368, तळोदा 16 हजार 791, अक्कलकुवा 22 हजार 798, धडगाव 11 हजार 123, यामध्ये शाळेत जाणारे व शाळा बाह्य मुला मुलीची संख्या आहे.
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/28/2020