অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा

गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित २००२

कायद्यातील तरतुदी

  • पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंदी.
  • पोटातील गर्भाचे लिंग माहित करून गर्भपात करण्यास बंदी
  • पोटातील गर्भाचे लिंग माहित करून मिळेल अशा स्वरुपाची जाहिरात करण्यास बंदी.
  • कायद्यातील तरतुदी न पाळल्यास शिक्षा.
  • प्रसुतीपूर्व लिंग निदान करण्यास कायद्याने बंदी आहे.

    कायदा सांगतो की

  • जिथे सोनोग्राफी केली जाते ती जागा
  • सोनोग्राफी करण्याचे मशीन, आणि
  • ते मशीन वापरणारी व्यक्ती
  • या सर्वांची नोंदणी केली पाहिजे. तसेच संबंधित व्यक्ती प्रशिक्षित आणि पात्र हव्यात.
    कायदा सांगतो की
  • वेटींग रूम, ओपीडी, सोनोग्राफी मशिनच्या शेजारी, येथे गर्भलिंगतपासणी केली जात नाही असा बोर्ड असायला हवा.
  • डॉक्टरांकडे या कायद्याची प्रत असायला हवी.
  • सोनोग्राफी मशीन वापरण्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असावे.
  • सोनोग्राफी मशीन, केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेले असावे.
  • स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

    अंतिम सुधारित : 5/28/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate