Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/11 02:02:17.044286 GMT+0530
मुख्य / आरोग्य / योजना व कायदे / मिशन इंद्रधनुष्य
शेअर करा

T3 2020/07/11 02:02:17.048852 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/11 02:02:17.074244 GMT+0530

मिशन इंद्रधनुष्य

भारतात सन 1985 पासून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आपल्या राज्यातही लसीकरण कार्यक्रम राबविले जात आहेत.

प्रस्तावना

भारतात सन 1985 पासून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आपल्या राज्यातही लसीकरण कार्यक्रम राबविले जात आहेत. आपल्या देशाला 27 मार्च 2014 मध्ये पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणपत्रही जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हे अर्थातच पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळेच शक्य झाले आहे. बालकांना शून्य ते दोन वर्षे वयोगटात द्यावयाच्या विविध लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याकडे आहे. मात्र अद्यापही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण हे 65 टक्केच आहे. पहिल्या दोन वर्षांत बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. त्यामुळे मातेच्या गरोदरपणात व बालकाच्या शून्य ते दोन वर्षे वयोगटाच्या काळात योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठीच लसीकरणापासून पूर्णतः वा अंशतः वंचित असलेली शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे 2020 पर्यंत पूर्णतः लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने 25 डिसेंबर 2014 पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’या नावाने विशेष लसीकरण मोहिम सुरु केली आहे.आपल्या देशात बालमृत्यू व प्रसुतीदरम्यान होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या लसीकरणामुळे शक्य होणार आहे. याशिवाय लहान वयात येणाऱ्या आजारांमुळे होणारे कुपोषणही टाळता येणार आहे.बालकांना देण्यात येणाऱ्या लसी.

नवजात अर्भकांना प्रत्येकी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासोबतच कावीळ, क्षयरोग या लसींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच लसीकरणातून पाच रोगांपासून बालकाला सुरक्षितता लाभणार आहे. या उपक्रमात पेंटाव्हॅलंट, रोटाव्हॅक्सीन आणि इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन याचा समावेश आहे. आतापर्यंत आरोग्य विभागातर्फे नवजात अर्भकास प्रत्येकी दीड महिन्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासाठी (डीपीटी) इंजेक्शनचा डोस दिला जात होता.

आता याच डोसमध्ये कावीळ आणि ह्युमन इन्फ्ल्यूएन्झा-बी प्रतिबंधक घटकांचाही समावेश राहील. हा डोस पूर्वीप्रमाणेच (०.५ एमएल) देण्यात येणार आहे. पेंटाव्हॅलंट लस वापरास राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा वापर सहा महिन्यांच्या आत सुरू करण्यात येणार आहे.

देशातील 201 जिल्ह्यांची निवड; राज्यातील सात जिल्हे आणि 12 महानगरपालिका

या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे किमान काम झालेले देशातील 201 जिल्हे यासाठी निवडण्यात आले आहेत. अपूर्ण लसीकरण, लसीकरणापासून वंचित बालके व गरोदर मातांचे प्रमाण जेथे किमान 50 टक्क्यांपर्यंत आहे, अशा ठिकाणांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांतील माता व बालकांना पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर लसीकरण करण्यात येणार आहे.
देशातील या 201 जिल्ह्यात महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि 12 महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यात बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मार्च 2015 पासून प्रत्येक महिन्यात सात दिवस या प्रमाणे चार महिने म्हणजे जून 2015 पर्यंत हे मिशन राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात या मिशनचा प्रारंभ 29 मार्च पासून होणार आहे.

लसीकरणाचे वेळापत्रक...

 • या मिशन अंतर्गत होणाऱ्या लसीकरणात गोवर दोन डोस (बाळाचे वय 9 महिने व दिड वर्षे).
 • घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वातचे (एकत्रित) तीन डोस (दीड,अडीच व साडेतीन महिने).
 • ओरल पोलिओ तीन डोस (दीड, अडीच व साडेतीन महिने).
 • बीसीजी अर्थात क्षयरोग प्रतिबंधक लस एक डोस (जन्मतः).
 • कावीळ तीन डोस (दीड, अडीच व साडेतीन महिने).

मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी...

 • प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा आयोजित करावी.
 • यात शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग अशा विभागांचा समावेश करावा.
 • लसीकरणाचे प्रमाण कमी असणारी आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, गाव, तालुका निहाय आराखडा तयार करावा.
 • ज्या गावात वारंवार साथींचे उद्रेक होत आहेत अशा गावांचाही कृती आराखड्यात समावेश करावा.
 • ज्या उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेविकांचे पद रिक्त आहे, किंवा त्या दीर्घकाळ रजेवर आहेत अशा गावांचाही समावेश या आराखड्यात करावा.
 • प्रत्येक गावात आरोग्यसेविका, आशा सेविका यांनी शून्य ते दोन वर्षे बालकांची तसेच गरोदर मातांची अद्ययावत यादी तयार करावी.
 • आरोग्य विभागाने ही मोहिम राबवावयाची असली तरी त्यासाठी अन्य शासकीय विभाग आणि समाजातून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे.


- मिलिंद मधुकर दुसाने,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

स्त्रोत : महान्युज

3.04761904762
शालिग्राम तेजनकर Sep 20, 2017 09:24 AM

माझा मुलगा १४ महिन्याचा झाला आहे तर लसीकरण कुठे द्यायचे ? सध्या मी नाशिक शहरात राहत आहे .

निखिल चव्हाण Aug 22, 2017 10:52 PM

मी आता नागपूर शहरात राहतो माज्या मुलीला १८ महिने होत आहे तर तीला लसीकरण कुठे द्यायच

रामदास सोनार आरोग्य सहाय्यक Mar 22, 2015 11:46 PM

मिशन इंद्रधनुष्य फक्त आरोग्य सेवेचे काम नसून ती एक सामाजिक चळवळ व्हायला पाहिजे
माझ्या गावातील एकहि बालक लसिकरणा पासून वंचित नाही राहिला पाहिजे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2020/07/11 02:02:17.347541 GMT+0530

T24 2020/07/11 02:02:17.353295 GMT+0530
Back to top

T12020/07/11 02:02:16.971180 GMT+0530

T612020/07/11 02:02:16.989486 GMT+0530

T622020/07/11 02:02:17.034334 GMT+0530

T632020/07/11 02:02:17.035087 GMT+0530