অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माता व शिशु ट्रॅकिंग कार्यक्रम

पार्श्वभूमी

मदर अॅन्ड चाईल्ड‍ (ट्रकिंग) सिस्टी्म (MCTS) हे गरोदर माता व बालकांना दर्जात्मक आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्य सेवा नोंदीची माहिती अदयावत ठेवून त्याबाबत पाठपुरावा करण्या्साठी इंटरनेटच्या माध्य‍मातून नावावर आधारित माहिती संकलन करण्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंञालय, भारत सरकार यांनी सुरु केलेले सॉफट्वेअर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात जानेवारी २०११ पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नॅशनल ई गव्हकर्नन्स प्लान च्या अंतर्गत केंद्रशासनाकडून या प्रकल्पाला मिशन मोड प्रकल्प म्ह्णुन घो‍षित करण्यात आले आहे.

उद्दिष्टे

गरोदर माता व बालकांचा आरोग्य सेवांसाठी पाठपुरावा करुन माता मृत्यु व अर्भक मृत्युं दर कमी करण्यासाठी प्रभावी सनियंत्रण करणे हे या प्रकल्पायचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तीव्र रक्ताक्षय व जोखमीचा आजार असणा-या गरोदर माता तसेच जन्मगतः कमी वजन असणारी बालके यांचा आरोग्य सेवांसाठी पाठपुरावा व सनियंञण करणे, पूर्ण संरक्षित गरोदर माता व पूर्ण सुरक्षित बालके यांच्यास अनुषंगाने त्याच्यावर आरोग्य सेवांसाठी सनियंत्रण करणे, आरोग्य संस्था व आरोग्य कर्मचारी यांच्यायसाठी लाभार्थी निहाय मासिक कृती आराखडा (Monthly Work plan) उपलब्ध करुन देणे ही या प्रकल्पाची इतर उद्दिष्टे आहेत.

प्रकल्पाची व्याप्ती

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या अंतर्गत कार्यक्षेत्रातील गरोदर माता व बालकांची नोंदणी या सॉफट्वेअर मध्ये करण्यात येते. सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैदयकीय महाविदयालये, महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य् केंद्रे, प्रसूती गृह व रुग्णालये इत्यादी शासकीय आरोग्यय संस्थांमार्फत सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते.

अंमलबजावणी पध्दत

गरोदर माता व बालकांची सॉफट्वेअर मध्ये नोंद केल्यानंतर लाभार्थ्यासाठी एकमेव असा १८ अंकी संगणक सां‍केतिक क्रमांक (MCTS Unique ID) तयार होतो. जो लाभार्थ्यासाठी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर तसेच लाभार्थ्यासाठी सॉफट्वेअर मध्ये संलग्न करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचा-याच्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाव्दारे (SMS) पाठविला जातो. सदर संगणक सांकेतिक क्रमांकाचा वापर करुन राज्यातील इतर कोणत्याही शासकीय आरोग्य संस्थेत लाभार्थ्याची तसेच त्याला दिलेल्या आरोग्ये सेवांची माहिती उपलब्ध होते व व सॉफट्वेअरमध्ये सेवांची अदयावत करण्यात येते. सदर सॉफट्वेअरचा वापर करणा़-या देशातील इतर कोणत्याही शासकीय आरोग्य संस्थेव्दारे देखील माहितीची अदयावत करण्याची सोय लाभार्थ्याच्या या सांकेतिक क्रमांकामुळे उपलब्ध होते. प्रत्येमक आरोग्य संस्थेतसाठी व त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य कर्मचा-यासाठी चालू व पुढील महिन्या्त गरोदर माता व बालकांसाठी अपेक्षित सेवा देण्याच्या अनुषंगाने लाभार्थी निहाय कृती आराखडा (Work plan) सॉफट्वेअरमधून तयार केला जातो व त्याप्रमाणे लाभार्थ्यांना सेवा दिल्या जातात. तसेच त्याची सॉफट्वेअर मध्ये नोंद करुन सेवा अदयावत केल्या जातात.

प्रकल्पाची वैशिष्टये

  • राज्‍यस्‍तरीय कॉलसेंटर व्‍दारे लाभार्थ्‍यांच्‍या सॉफट्वेअर नोंदविलेल्‍या मोबाईल क्रमांकावर दुरध्‍वनीव्‍दारे फोन करुन त्‍यांना मिळालेल्‍या सेवांची तसेच नोदंविलेल्‍या सेवांची पडताळणी करण्‍यात येते. त्‍याचप्रमाणे त्‍यांना जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम या सारख्‍या शासकीय आरोग्‍य कार्यक्रमांची माहिती उपलब्‍ध करुन देण्‍यात येते.
  • राज्‍य, जिल्‍हा, तालुका व आरोग्‍य संस्‍था स्‍तरावर कार्यरत आरोग्‍य विभागातील विविध अधिका-यांना त्‍यांच्‍या मोबाईल क्रमांकावर सॉफट्वेअरमध्‍ये दैनंदिन नविन नोंदविलेले लाभार्थी व सेवा अदयावत केलेले लाभार्थी यांची माहिती लघुसंदेशाव्‍दारे (SMS) दररोज सकाळी पाठविली जाते.
  • आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या मोबाईल क्रमांकावर त्‍यांना सॉफट्वेअरमध्‍ये संलग्‍न करण्‍यात आलेल्‍या लाभार्थ्‍यांच्‍या ठराविक महिन्‍यातील अपेक्षित आरोग्‍य सेवा (Due Services) त्‍या त्‍या महिन्‍यात लघुसंदेशाव्‍दारे (SMS) पाठविल्‍या जातात.
  • MCTS सॉफट्वेअर मध्‍ये आधार कार्डवर आधारित प्रत्‍यक्ष लाभ देयक प्रणाली (Direct Benefit Transfer) व्‍दारे जननी सुरक्षा योजना पात्र लाभार्थ्‍यांना लाभ अदा करण्‍यासाठी पात्र लाभार्थ्‍यांची माहिती, आधार कार्ड क्रमांक व बॅंक खाते क्रमांक इत्‍यादी गोळा केले जातात व या माहितीसह लाभार्थ्याची यादी केंद्र शासनाच्‍या CPSMS या वित्‍त विभागाच्‍या संकेतस्‍थळाशी लाभार्थ्‍यांना लाभ अदा करण्‍यासाठी दैनंदिन संलग्‍न केली जाते.

माता व शिशु रेखापथन (ट्रॅकिंग) पद्धति आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन


अंतिम सुधारित : 8/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate