भारत सरकारने गलगंड या कार्यक्रमाचे नाव 1992 नंतर आयोडिन न्युनता विकार नियंञण कार्यक्रम असे ठेवले आहे. आयोडिन हे महत्वाचे सुक्ष्म घटक आहे व ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. तसेच ते थायरॉईड हार्मोन तयार करणे कामी आवश्यक आहे.
रोज 150 मायक्रोग्रॅम ची शरीराला गरज असते. आयोडिन हे पाणी, मासे, समुद्रातील अन्नामध्ये मिळते. आयोडिनचे प्रमाण हे पर्वताजवळ, पर्वतावरुन येणा-या पाण्यात कमी प्रमाणात असते.
महाराष्ट्र् राज्यात गलगंड कार्यक्रम हा मध्यवर्ती आरोग्य समितीच्या् मार्गदर्शक सुचनेप्रमाणे खालील हेतुने दिला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे 32 जिल्हे व 4 नवीन जिल्हे यांचा सर्व्हे झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणामध्ये सर्व जिल्हयाचे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात आर्थिक तरतुदीसह 5 सर्वेक्षण टीम तयार केल्या आहेत. त्या नागपुर, कोल्हापुर औरंगाबाद पुणे, व नाशिक हे जिल्हे आहेत.
ग्रामीण भागातील नियमित भेटीमध्ये संशयीत रोगी शोधणे, मिठाचे नमुने तपासणे, लघवीचे नमुने जमा करणे व आयोडिन मात्रा तपासणे, आरोग्य शिक्षण देणे
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 3/9/2020
शरीरातील स्नायू ताठ होऊन त्यांचे प्रचंड, अनियंत्रि...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्या विका...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्...