असंसर्गजन्यरोग हे अतितीव्र आजार म्हणुनसुद्धा ओळखले जातत. यात प्रामुख्यने हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग, आणि अपघात यांचा समावेश होतो. या सर्व आजारांचे मुख्य कारण म्हणजे तम्बाखुचे सेवन, धुम्रपान, असमतोल आहर, मानसिक तणाव आणि दैनंदीन जिवनशैलितील बदल इ. असे समजण्यात येते कि भारतमध्ये सर्वसाधारणपणे मधुमेह, उच्चरक्तदब, हृदयरोग आणि पक्षाघात यांचे अनुक्रमे ६.२%, १५.९%, ३.७% आणि ०.१५% ई. नुसार प्राबल्य आढळते.
भारतामध्ये अंदाजे २५ लक्ष कर्करोगी आहेत. या असंसर्गजन्यरोगच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रिय कर्करोग, मधुमेह, ह्रदय्रोग आणि पक्षाघात प्रतिबंध व नियंञण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. याकरीता केंद्र शासनाकडुन ८०% तर राज्यशासनाकडुन २०% अनुदान प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रराज्यात हा कार्यक्रम अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, वर्धा आणि वाशिम या जिल्हयांमध्ये राबविला जात आहे.
आरोग्य सेवा संचालनालय, मुबई येथे राज्यस्तरीय असंसर्गजन्यरोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, नियंञण आणि मुल्यमापन करुन भौतिक आणि आर्थिक ध्येय गाठण्याची जबाबदारी या कक्षाची आहे. हा कक्ष राज्य कार्यक्रम अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.
कार्यक्रमराबविल्या जाणा-या जिल्हयांमध्ये जिल्हा मुख्यालयात जिल्हा असंसर्गजन्यरोग नियंञण कक्षाची स्थापना केली जाईल. जिल्यामध्ये कार्यक्रमाअंतर्गत राबविल्याजाणा-या विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, नियंञण आणि मुल्यमापन करुन भौतिक आणि आर्थिक ध्येय गाठण्याची जबाबदारी या कक्षाची आहे.
ग्रामीण रुग्णालयात नियमित एन.सी.डी. क्लिीनीक सरु ठेवणे. रुगणालयात येणा़-या सर्व ३० वर्षावरील व्यक्तींची डॉक्टर मार्फत एनसीडी क्लिीकमध्ये तपासणी करावी. त्यातप्रामुख्याने तंबाखु, धुम्रपान व दारुचे सेवन याबाबत विचारणा व सर्वाचे ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी, ईसीजी, ब्लड क्लोरेस्टॉल व आवश्यकतकेनुसार सोनाग्राफी, एक्सरे याबाबत चाचण्याकराव्यात. मधुमेह, उच्च रक्तदाब व स्ट्रोक केसेसवर योग्य तो उपचार करावा.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रातील ए.एन.एम. आणि एम.पी. डब्ल्यु यांनी सदर कार्यक्रमाबाबात जनजाग्रती करणे यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो.
शिबीर आणि विशिष्ट दिवशी ए.एन.एम. किंवा आरोग्य सहायक यांनी तीस वर्षांवरील सर्व व्यकतींची दारुचे आणि तंबाखुचे सेवन, व्यायाम, रक्तशर्करा, रक्तदाब यांची तपासणी करावी. या तपासणीच्या दरम्यान आरोग्य सहायकांनी तपासणीच्यावेळी वजन, उंची आणि बी.एम.आय. इ. ची चाचणी करावी. रक्तशर्करा मोजण्याकरीता ग्लुकोस्टि्प्स आणि लॅनसेटस् आरोग्य सहायकांना पुरविले जाईल. ए.एन.एम. आणि आरोग्य सहायक यांनी मधुमेह आणि उच्चरक्तदाबाकरीता संशयीत रुग्णांना उपजिल्हा/ग्रामिण रुग्णालय किंवा उच्च स्तरावर पुढिल निदान आणि उपचाराकरीता संदर्भित करावे.
अनु.क्र. | आरोग्य केंद्र | सेवा |
---|---|---|
१ | उपकेंद्र | वर्तन बदलाकरीता जनजाग्रुती, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करणे, संशयीत रुग्णांना उपजिल्हा/ ग्रामिण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे. |
२ | प्राथमिक आरोग्य केंद्र | वर्तन बदलाकरीता जनजाग्रुती, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करणे, संशयीत रुग्णांना उपजिल्हा/ ग्रामिण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे. |
३ | उपजिल्हा / ग्रामिण रुग्णालय | वैद्यकिय किंवा प्रयोगशाळा चाचण्यांद्वारे लवकर निदान करणे. समुपदेशनातुन प्रतिबंधात्मक जनजाग्रुती करणे. मधुमेह, ह्रदयरोग, लकवा आणि कर्करोग यासर्वसामान्य असंसर्गजन्यरोगांचे व्यवस्थापन करणे. ग्रुह भेटी दरम्यान अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना भेट देणे समुपदेशन करणे आणि गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकरीता संदर्भित करणे. |
४ | जिल्हा रुग्णालय | मधुमेह, ह्रदयरोग, लकवा आणि कर्करोग इ. यांचे लवकरात लवकर निदान करणे, तसेच रक्तशर्करा, लिपिड प्रोफाईल, केएफटी, एलफटी, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, एक्स-रे, कॉल्पोस्कोपी, मेमोग्राफी इध् तपासण्या करुन घेणे. रुग्णांकरीता वैद्यकिय सेवेचे व्यवस्थापन करणे, बेड रिडन रुग्णांचा पाठपुरावा, गंभीर रुग्णांना उच्चस्तरावर संदर्भित करणे. |
५ | त्रुतीय कर्करोग सेवा केंद्र | प्रतिबंध, लवकर निदान, उपचार करण्याकरीता कर्करोगरुग्णांना सेवा देणे तसेच उपशामक आणि पुनर्वसन सेवा पुरविणे. |
अ) पहीला टप्पा – वर्धा आणि वाशिम जिल्हा
ब) दुसरा टप्पा – अमरावती, भंडारा, चंद्रपुर आणि गडचिरोली
तपशील | प्रती वर्ष् मानके |
---|---|
एन.पी.सी.डी.सी.एस. | ४२६ .११ |
कर्करोग | २११.३४ |
राज्यस्तरीय असंसर्गजन्यरोग नियंञण कक्ष | २३.४८ |
अनावर्ती अनुदान | ५.०० |
आवर्ती अनुदान | १८.४८ |
जिल्हास्तरीय असंसर्गजन्यरोग नियंञण कक्ष | २१.४४ |
अनावर्ती अनुदान | ५.०० |
आवर्ती अनुदान | १६.४४ |
जिल्हा रुग्णालयातील कर्करोग सेवा | १६६.४२ |
अनावर्ती अनुदान | ५.०० |
आवर्ती अनुदान | १६१.४२ |
मधुमेह , हदयरोग आणि पक्षाघात | २१४ .७७ |
असंसर्गजन्यरोग चिकित्सालय आणि सी.सी.यु. | १९० .७२ |
अनावर्ती अनुदान | १६१.०० |
आवर्ती अनुदान | २९.७२ |
ग्रा.रु. /उपजि.रु. असंसर्गजन्यरोग चिकित्सालय | २४.०३ |
अनावर्ती अनुदान | १.०० |
आवर्ती अनुदान | २३.०३ |
उपकेंद्र | ०.०२ |
आवर्ती अनुदान | ०.०२ |
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 3/9/2020
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे....