या वर्षापासून हा नवा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम सुरु झाला आहे.
भारतात दर हजार लोकसंख्येस सुमारे 3 जणांना गंभीर कर्णबधिरता असते. यातली बहुतेक मुलेच असतात. याचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर दुष्परिणाम होतो. सौम्य कर्णबधिरता असणा-यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात सरासरी 6% लोकांना कमीजास्त कर्णबधिरता असते.1. कर्णबधिरता होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. (प्रतिबंध) मुख्यत: जंतुदोष व इजा होणे या दोन कारणांनी येणारी कर्णबधिरता टाळता येते. 2. कर्णबधिरता लवकरात लवकर शोधून उपचार सुरु करणे. विशेषत: जन्मजात कर्णबधिरता लवकर शोधणे महत्त्वाचे आहे. 3. कर्णबधिरतेसाठी योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करणे. 4. कर्णबधिरतेवर उपचार करण्यासाठी सुसज्ज केंद्रे तयार करणे. (कानाच्या प्रगत उपचारासाठी खूप यंत्रसामग्री लागते.) भारत सरकारतर्फे 2006 ते 2008 या काळात यासाठी काही जिल्ह्यांमध्ये एक पथदर्शक कार्यक्रम घेण्यात आला आहे. यावर्षी (2008-09) पासून 2012 पर्यंत हा कार्यक्रम देशात200 जिल्ह्यांमध्ये विस्तारला जाईल. मात्र या पथदर्शक प्रकल्पात महाराष्ट्रातील जिल्हे घेतलेले नाहीत. या कार्यक्रमात - 1. लोकांमध्ये कर्णबधिरतेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कर्णबधिरतेची कारणे, प्रतिबंध लवकर निदान - उपचार, इ. गोष्टींबद्दल जाणीवजागृती करायची आहे. 2. प्राथमिक आरोग्यसेवेच्या विविध कार्यकर्त्यांना प्रतिबंध लवकर निदान - उपचार, इ. गोष्टींबद्दल काही विशेष प्रशिक्षण द्यायचे आहे. 3. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्सना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 5/31/2020
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो