অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम

पार्श्वभूमी

माणसाला जसे शारिरीक विकार होत असतात त्याचप्रमाणे मानसिक व्याधी सुध्दा होत असतात. तथापि शारिरीक विकार दृश्य स्वरुपात असतात. परंतु मानसिक विकार वैयक्तिक असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो व सुमारे 10 ते 12 टक्के माणसं कमी तिव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने ञस्त आहेत.म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे असे म्हणणे वावगे ठरु नये.

मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभिर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने ऑगस्ट 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा चालू आहे जेणे करुन सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा. सदर कार्यक्रमासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयात विशेष मानसिक आरोग्यकक्ष स्थापन करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर म्हणून अतिरिक्त मुख्य संचालक हे आहेत.

उद्दीष्टे

  • राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.
  • आरोग्य सेवेतील उचित अधिका-यांना कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध कार्य आणि जबाबदा-या निश्चित करणे.
  • मानसिक आरोग्य सेवा या सामान्यतः आरोग्य सेवा सुविधांचा अविभाज्य भाग मानुन सदर कार्यक्रम पूर्तता करणे.
  • विविध सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य, जागृकता व सोयी सुविधा यांची माहिती देणे.
  • मानसिक आरोग्य सेवा विकास व अंमलबजावणी यामध्ये जनतेला समाविष्ट करुन घेणे.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ठे

  • रुग्णालयात मानसिक रुग्ण भरती करताना मानसिक आरोग्य कायदा 1987 ची अंमलबजावणी.
  • शासन निर्णय 1985 व 2001 अन्वये प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य कायदा 1987 नुसार भरती झालेल्या रुग्णांना प्रति दिन रु. 22 /- खावटी खर्च त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत सेवा.
  • रुग्ण वरीलप्रमाणे भरती झाल्यानंतर मानसिक आरोग्य कायद्याअंतर्गत तपासणी , मनोविकार तज्ञ परिचारिका यांच्या कडून मानसिक विकारांची नोंद , वैद्यकीय अधिका-यामार्फत शारिरीक तपासणी व शेवटी मानसोपचार तज्ञाकडून संपूर्ण तपासणी व नंतर उपचार .
  • सर्व प्रादेशिक मनोरुग्णालये ही फार जुन्या काळातील असल्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये निर्देशित समितीने मनोरुग्णालयातील यंञ व साधनसामुग्री जीर्ण झाल्याबद्दल निष्कर्ष काढला आहे . वरील आदेशाप्रमाणे उपसमिती नेमून रुग्णासेवा व सुविधा यांमध्येर यांमध्ये सुधारणा करण्यासाठी 72 कलमी सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या . सदर सुधारणांची अंमलबजावणी चारही प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये सुरु आहे.
  • प्रादेशिक मनोरुग्णालयामधील आहार व्यवस्थेवर विशेष लक्ष देवून स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच सकस अन्न व त्याचे सुनियोजित वाटप यामध्येही विशेष लक्ष्य देण्यात येते.
  • उपरोल्लिखित समितीच्या निर्देशाप्रमाणे चार मोठे कक्ष बांधण्यात आले असून उर्वरित दोन कक्ष निधी उपलब्ध होताच पूर्ण करण्यात येतील.
  • रुग्णांचा दैनंदीन आहार खालीलप्रमाणे असतो.
    • चहा सकाळी 6.00 वा.
    • नास्ता 2 पाव ,उसळ सकाळी 8.30 वा.
    • दुपारचे जेवण 2 चपाती (सोया पावडर मिश्रीत ) भाजी, डाळ आणि भात 12. 30 वा.
    • दुपारचा चहा 3.00 वा.राञीचे जेवण 7.30 वा.
  • मा. उच्च न्यायालयाच्या समितीच्या सुचनांप्रमाणे रुग्णांना ताट, ग्लास, बाऊल (चहासाठी) इ. वापरले जातात. बसण्यास बैठक आसनाची व्यवस्था करण्यात येते. बहुतेक सर्व धार्मिक व राष्ट्रीय सणांना सामाजिक संस्थांच्या मदतीने गोडधोड जेवण दिले जाते. रुग्णांना आंघोळीसाठी सोलर एनर्जीवर चालणारे यंञामधून गरम पाणी दिले जाते. प्रती रुग्ण, स्वच्छ कपडे, टॉवेल दिला जातेा. केसांचे तेल, साबण टूथ पावडर, कंगवा इ. सुविधा पुरविल्या जातात. थंडीसाठी ब्लॅकेट, जॅकेट इ. गरम कपडे पुरविले जातात. प्रती रुग्ण 5 कपडयांचा जोड दिला जातो. रुग्णात सुधारणा दिसू लागताच त्याला व्यावसायोपचार विभागामार्फत त्याला तज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्याच्या कलेनुसार शिवणकाम / भरतकाम / शेती / बागकाम/ हस्तकला /योगा/ संगीत / नृत्य इ. मध्ये गुंतविले जाते. यातील काही वस्तू उदा. तयार केलेला भाजीपाला, रुग्णालयातच भाजीसाठी वापरल्या जातात . हस्तकलेतून बनवलेल्या वस्तु विक्रीसाठी ठेवल्या जातात. सामाजिक संस्थांच्या मदतीने जॉब प्लेसमेंट साठी प्रयत्न केले जातात.

खाजगी मानसिक रुग्णालयाचे पंजीकरण व मानसिक तपासणी

मानसिक आरोग्य कायदा 1987 नुसार खाजगी मानसिक रुग्णालयांना पंजीकृत करणे बंधनकारक असून यांना “ संचालक आरोग्य सेवा ” यांचे मार्फत परवाना पञ दिले जाते. अद्याप पावेतो 120 खाजगी मानसिक शुश्रुषागृहांना पंजीकृत प्रमाणपञ देण्यात आलेले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर रुग्णालयांची मासिक तपासणी होणे बंधनकारक असल्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय पातळीवर अभ्यागत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीमध्ये खालील सदस्य आहेत.

  1. उपसंचालक, आरोग्य सेवा ( परिमंडळ)
  2. वैदयकीय अधिक्षक, मनोरुग्णालय ( शासकीय )
  3. कार्यकारी अभियंता ( परिमंडळ )
  4. मानसिक सामाजिक कार्यकर्ता ( अशासकीय)
  5. मनोविकार तज्ञ ( अशासकीय)
  6. चिकित्सालयीन मानसोपचार तज्ञ ( अशासकीय)

जिल्हा पातळीवरील मानसिक आरोग्य सेवांचे सबलीकरण

शासन निर्णय क्रमांक जिरुक्र.130/आ.3/ मंञालय,मुंबई 32 दि. 1/3/06 नुसार राज्यातील 22 जिल्हा रुग्णालयात 10 खाटांचा मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करण्यात येऊन त्यासाठी 20 पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्हामानसिक आरोग्य कार्यक्रम

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, प्रादेशिक मनोरुग्णालयामधील सेवा – सुविधांचे उन्नतीकरण तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागांचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या दहाव्या पंचवार्षिक योजेनअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमातंर्गत निधीतून प्राप्त झाला आहे.

सदर निधीतून

  1. मनुष्यबळ निर्माण
  2. यंञ,साधनसामुग्री व वाहन
  3. औषधे,वंगण,इंधन आणि इतर
  4. माहिती व जनजागृतीपर कार्यक्रम
  5. कर्मचा-यांचे प्रशिक्षण

मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (Training of Trainers) पूर्ण झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिका-यांचे प्रशिक्षण चालू आहे.

व्यावसायोपचार विभागाचे (Occupational Therapy) विभागाचे बळकटीकरण व 'डे केअर सेंटर' ची स्थापना.

व्यावसायोपचार विभागाचे बळकटीकरण तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ‘ डे केअर सेंटरची ‘स्थापना.
दीर्घ मुदतीच्या आजाराने अनेक रुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भरती होत असतात. अशा रुग्णांना त्याचे आत्मबल वाढवून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्वतःच्या हिम्मतीवर उभे राहण्याच्या दृष्टीने व्यवसाय उपचार विभाग व डे केअर सेंटर यांचे माध्यमातून विविध व्यवसाय कौशल्य शिकविले जातात आणि त्यानंतर विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो

केंद्र सरकारकडून रु. 5 कोटी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले असून विविध प्रकारची यंञ साधनसामुग्री उपलब्ध करुन देवून विविध प्रकारचे व्यवसायोपचार कौशल्ये शिकविली जातात. यासाठी एप्रिल 2012 मध्ये सुरु झालेल्या सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिक आरोग्य (शारिरीक व मानसिक सेवा केंद्र)

सन 2008 – 09 या वर्षी वृध्दापकाळातील शारिरीक व मानसिक समस्यांसाठी शासकीय वैदयकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई, जि. बीड येथे आरोग्य केद्राची स्थापना करण्यास मान्यता मिळाली आहे. सदर प्रकल्पासाठी 2008 – 09 साली अनावर्ती रु. 14 करोड आवर्ती मध्ये रु. 2.30 करोड निधीला मंजुरी देण्यात आली होती.

उदृीष्ठे

  • वृध्द नागरिकांना त्यांचे विविध शारिरीक, मानसिक व सामाजिक समस्यांसाठी एकात्मिक उपचार केंद्र निर्माण करणे व सदर क्षेञात कार्य करणा-या विविध समस्यांना मार्गदर्शन करणे.
  • वृध्दापकाळातील समस्यांवर काम करणा-या विविध संस्थांबरोबर सहकार्य करुन आरोग्य विषयक बाबींबाबत संशोधन करणे.
  • वृध्दापकाळातील मानसिक व्याधीसाठी आंतररुग्ण व बाहयरुग्णांना सेवा उपलब्ध करुन देणे.
  • डे केअर केंद्राची स्थापना
  • कर्मचा-यांचे प्रशिक्षण,
  • रुग्णांचे पुनर्वसन

सदयस्थिती

  • मराठवाडा विकास योजनेतर्गत शासन निर्णय क्र. Pac-2007/CR341/07/Health- 4/ dt. 6/2/2008 प्रमाणे सदर प्रकल्पास मान्यता
  • तहसीलदार अंबेजोगाई जि. बीड यांच्याकडून प्रकल्पासाठी 8 एकर जमीन संपादन
  • शासनाकडून दि. 21/2/2008 रोजी सदर प्रकल्पासाठी रु. 9,46,48,000/- निधीस मान्युता
  • फेज – 1 बांधकाम पूर्ण फेज – 2 बांधकाम प्रगती पथावर

 

स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate