राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तसेच 6 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीमही राबविण्यात येणार आहे. त्याविषयी ही माहिती...
आपल्याकडे कुष्ठरोगाची समस्या आजही दिसून येते. खरोखर कुष्ठरोग हा एक किरकोळ आजार आहे. तो मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. कुष्ठरोग हा काही स्पर्शाने होणारा आजार नाही. या रोगाचे निदान व उपचार सर्व सरकारी दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत केला जातो. लवकर वेळेत निदान व उपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. पुढे निर्माण होणाऱ्या शारीरिक विकृतीपासून बचाव होतो. कुष्ठरोगाच्या तीव्रतेनुसार त्याचा उपचार सहा महिने किंवा बारा महिने इतका आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांत 1 हजार 187 एवढे रुग्ण एमडीटी हा औषधोपचार घेवून कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. त्यामुळे कुष्ठरुग्णांना भेदभावाची वागणूक देऊ नका. नागरिकांनी आपण, आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या- 46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील- 16, किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकूण- 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागातील- 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार आहे. म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती आपण आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व उपचारांनी कुष्ठरोगमुक्त व्हावे.
लेखक - संकलन- काशिनाथ र. आरेवार,
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड.
अंतिम सुधारित : 7/31/2023
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...
या विभागात आरोग्य जनजागृतीसाठीची काही गाणी दिली आह...
या विभागात आरोग्य कृषी जनजागृती ची काही गाणी / ऑडी...