आंबट ढेकरा येणे, घशाशी जळजळ होऊन आंबट ओकारी होणे या अर्थी ‘अम्लपित्त’ ही संज्ञा वापरतात. हा एक रोग नसून अनेक विकारांत दिसून येणारे असे एक लक्षण आहे.
अम्लपित्ताचे तीव्र व चिरकारी (दीर्घकालिक) असे दोन प्रकार आहेत. तळकट, तिखट, आंबट, मसालेयुक्त व पचनास जड असलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने जठरात हायड्रोक्लोरिक अम्ल अधिक प्रमाणात स्रवते. त्यामुळे अम्लपित्त हे लक्षण दिसते. असे हायड्रोक्लोरिक अम्ल नेहमीच जास्त प्रमाणात स्रवत राहिल्यास जठरात किंवा ग्रहणीत (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात) व्रण उत्पन्न होतो [⟶ पचनज व्रण]
दुसऱ्या प्रकारचे अम्लपित्त जठराच्या श्लेष्मकलेला (जठराच्या आतील बाजूच्या नाजूक थरयुक्त पृष्ठभागाला) चिरकारी शोथ (दाहयुक्त सूज) झाल्यास होते. अशा चिरकारी शोथात श्लेष्मस्तरातील कोशिका (शरीरातील सूक्ष्म घटक) व ग्रंथी यांचा अपकर्ष (ऱ्हास) झाल्यामुळे तेथे हायड्रोक्लोरिक अम्लाची उत्पत्ती होत नाही; त्यामुळे जठरातील अन्नपचन क्रिया थांबून अन्न जठरात जास्त वेळ राहते. तसे झाले म्हणजे अन्न कुजू लागून त्यात दुग्धाम्ल (लॅक्टिक अम्ल) इ. अम्ले तयार होऊन घशाशी आग व आंबट ओकारी होऊ लागते.
अम्लपित्ताची चिकित्सा कारणानुवर्ती करावी लागते. तात्पुरता उपाय म्हणून सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड यांसारखी औषधे देतात.
आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : आतुरचिकित्सा–अम्लपित्त.
अंतिम सुधारित : 8/21/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...