অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्करोग

कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्‍या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.

ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.

कर्करोगाचे मुख्य प्रकार

  • कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणार्‍या कर्करोगाचे नाव.
  • सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
  • ल्यूकेमिया: रक्त तयार करणार्‍या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
  • लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
  • सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाचे मूळ

आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. कर्करोग समजून घेण्यासाठी आधी आपण सर्वसामान्य पेशी कर्करोगग्रस्त कशी होते ते पाहू.

आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे – नियंत्रित पद्धतीने - विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हातार्‍या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात.

परंतु कधीकधी ही नीट चाललेली प्रक्रिया बिघडते. एखाद्या पेशीमधील जनुकीय (DNA) नकाशा बदलतो किंवा खराब होतो आणि त्यामध्ये उत्परिवर्तन (म्यूटेशन्स) निर्माण होते. ह्या म्यूटेशन्समुळे पेशीची सर्वसाधारपणे होणारी वाढ आणि विभाजन यांवर परिणाम होतो. अशा पेशी म्हातार्‍या होऊन मरत नाहीत आणि परिणामी तेथे नवीन पेशी येत नाहीत. ह्या अतिरिक्त पेशींचा एक गठ्ठा बनतो – त्याला ट्यूमर (गाठ) असे नाव आहे. सर्व ट्यूमर कर्करोगजन्य नसतात. ट्यूमर निरुपद्रवी किंवा जीवघेणा असू शकतो.

  • निरुपद्रवी (बेनाइन) ट्यूमर: कर्करोगजन्य नसतात. ते काढून टाकता येतात आणि बहुतांश प्रकरणांमध्ये ते पुनः वाढत नाहीत. निरुपद्रवी ट्यूमरमधील पेशी शरीरात इतरत्र पसरत नाहीत.
  • जीवघेणा (मॅलिग्नंट) ट्यूमर: मात्र कर्करोगजन्य असतो. अशा ट्यूमरमधील पेशी त्यांच्या आसपासच्या पेशींवर हल्ला करून शरीरात इतरत्र पसरतात. कर्करोगाच्या अशा पसरण्याला मेटास्टॅटिस असे म्हणतात.
  • रक्तक्षय (ल्यूकेमिया): हा अस्थिमज्जा आणि रक्ताचा कर्करोग असतो, त्याचा ट्यूमरशी संबंध नाही.

काही लक्षणे

  • छाती किंवा शरीराच्या इतर भागात गाठ जाणवणे
  • त्वचेवर नवीन तीळ उद्भवणे किंवा असलेल्या तिळात बदल होणे
  • बरी न होणारी जखम
  • आवाज बसणे किंवा खोकला बरा न होणे
  • पचनसंस्थेत किंवा लघवी होण्याच्या सवयींमध्ये बदल
  • खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणे
  • गिळताना फार त्रास होणे
  • विनाकारण वजन वाढणे अथवा घटणे
  • अनैसर्गिक रक्त - अथवा इतर – स्त्राव होणे
  • फार थकल्यासारखे वाटणे

बहुतेक वेळा ही लक्षणे थेट कर्करोगामुळे उद्भवत नाहीत. निरुपद्रवी ट्यूमर वा इतर काही कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. ह्याबाबत फक्त डॉक्टरच खात्रीने सांगू शकतात. वरील लक्षणे दाखवणार्‍या किंवा आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे हे उत्तम. कर्करोगाच्या सुरूवातीला दुखत नाही. त्यामुळे ही लक्षणे असल्यास, दुखू लागण्याआधी, डॉक्टरांना भेटा.

स्क्रीनिंग तपासणी

प्रयोगशालेय चाचण्या

रक्त, लघवी तसेच इतर शारीरिक द्रवांच्या चाचणीमधून डॉक्टर निदान करू शकतात. अंतर्गत अवयवांचे काम कितपत व्यवस्थित चालू आहे हे ह्या चाचण्यांमधून समजते. काही द्रवांचे वाढलेले प्रमाण कर्करोगाचे चिह्न दाखवू शकते. अशांना ट्यूमर-कारी म्हणता येईल. परंतु प्रयोगशालेय चाचण्याचे निष्कर्ष वेगळे दिसण्याचा अर्थ त्या व्यक्तीस कर्करोग आहेच असा होत नाही. कर्करोगाच्या निदानासाठी फक्त ह्या चाचण्यांवर अवलंबून राहता येत नाही.

प्रतिमा घेण्याची प्रक्रिया (इमेजिंग)

शरीरांतर्गत अवयवांच्या प्रतिमामंधून तेथे ट्यूमर आहे काय हे डॉक्टरांना तपासता येते. ह्या प्रतिमा मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत:

  • क्ष किरण (एक्सरे): शरीरातील हाडे व इतर अवयवांच्या प्रतिमा पाहण्यासाठीचे हे सर्वात लोकप्रिय साधन आहे.
  • सी टी (सीटी) स्कॅन: सीटी स्कॅन म्हणजे संगणकाला जोडलेले क्ष किरण यंत्र. ह्यामधून विरुद्ध रंगाचा द्रव सोडला जात असल्याने मिळणारी प्रतिमा वाचणे सोपे जाते.
  • रेडिओन्यूक्लाइड स्कॅन: ह्यामध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात किरणोत्सारी (रेडिओऍक्टिव्ह) द्रव शरीरात सोडले जाता. ते रक्तातून वाहून काही अवयवांत साठते. तेथील किरणोत्सार स्कॅनर यंत्राद्वारे मोजला जातो. स्कॅनरद्वारे हाडे किंवा अवयवांच्या प्रतिमा संगणकाच्या पडद्यावर किंवा फिल्मवर दाखवल्या जातात. हा रेडिओऍक्टिव्ह द्रव नंतर शरीरातून लगेचच बाहेर टाकला जातो.
  • अल्ट्रासाउंड: ऐकण्याच्या मानवी क्षमतेपलिकडील ध्वनिलहरी (अल्ट्रासाउंड) यंत्राद्वारे निर्माण केल्या जातात. ह्या लहरी शरीरातील ऊतींवरून परावर्तित होतात. संगणक ह्यांचे विश्लेषण करून सोनोग्राम नावाची प्रतिमा आपणांस दाखवतो.
  • एमआरआय: संगणकासोबत काम करणार्‍या एका शक्तिशाली लोहचुंबकाद्वारे शरीराच्या विशिष्ट भागाचे चित्र मिळवता येते. हे चित्र डॉक्टर पडद्यावर अथवा फिल्मवर पाहू शकतात.
  • पीईटी स्कॅन: किरणोत्सारी द्रव अगदी कमी प्रमाणात शरीरात सोडतात. शरीरातील रासायनिक क्रियांचे चित्र एका यंत्राद्वारे दाखवले जाते. काही वेळा कर्करोगाच्या पेशींची हालचाल ह्यामधून दिसू शकते.

बरेचदा कर्करोगाच्या निदानासाठी बायोप्सी करणे गरजेचे असते. बायोप्सी म्हणजे एखाद्या ट्यूमरमधील पेशींचा छोटा नमुना काढून प्रयोगशाळेतील सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो.

बायोप्सी

नमुना मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत:

  • सुई: उती किंवा द्रव काढण्यासाठी डॉक्टर सुईचा वापर करतात.
  • एंडोस्कोप: डॉक्टरएक अतिशय बारीक, पुढे दिवा असलेली नळी (एंडोस्कोप) वापरून शरीराचा आतील भाग पाहू शकतात. ह्या नळीमधून उती किंवा द्रव खेचून घेता येतो.
  • शस्त्रक्रिया: शस्त्रक्रिया इन्सिजन किंवा एक्सिजन पद्धतीची असू शकते.
    • एक्सिजन बायोप्सीमध्ये सर्जन संपूर्ण ट्यूमर काढतो. त्याबरोबरच त्याच्या आसपासच्या काही निरोगी उतीदेखील निघतात.
    • इन्सिजन बायोप्सीमध्ये ट्यूमरचा काही भागच काढला जातो. त्याच्या स्क्रीनिंग चाचणीमध्ये कर्करोगाची चिह्ने आढळल्यास त्यांमागील कारण कर्करोगच आहे की आणखी काही हे तपासले जाते.

आयएसएफ सोडिअम फ्लोराइड बोन स्कॅन

म्हणजे नक्की काय?

१८ एफ सोडिअम फ्लोराइड बोन स्कॅन हे पीईटी-सीटी स्कॅनरवर करण्याचे स्केलेटल सायंटिग्राफीचे अत्याधुनिक तंत्र आहे. नेहमीच्या न्यूक्लिअर एमडीपी बोन स्कॅनच्या तुलनेमध्ये ही चाचणी खूपच जास्त संवेदनशील आणि उच्च दर्जाची असते. तिचा वापर रोगाच्या खालील स्थितींमध्ये केला जातो:

  • कर्करोग झालेल्या व्यक्तींमधील स्केलेटल मेटास्टॅटिस (कर्करोग हाडांपर्यंत पोहोचणे)
  • नेहमीच्या क्ष-किरण तपासणीत न दिसणारी फ्रॅक्चर्स (हाडे मोडणे)
  • नेहमीच्या क्ष-किरण तपासणीत न दिसणारे संसर्ग
  • हाडांच्या दुखण्यांसंबंधीच्या इतर बाबी – उदा. खेळताना दुखापत होणे, चयापचय क्रियेशी संबंधित अस्थिरोग, पॅजेटचा रोग इ.

पारंपारिक बोन स्कॅनपेक्षा हे तंत्र वेगळे कसे आहे?

हाडांतील फटींचा सुरूवातीच्या अवस्थेतच छडा लावण्यामध्ये पारंपारिक बोन स्कॅनपेक्षा १८ एफ सोडिअम फ्लोराइड बोन स्कॅन निर्विवादपणे श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे भरपूर पुरावे आहेत. १८ एफ सोडिअम फ्लोराइड बोन स्कॅनसोबत मिळणार्‍या अतिरिक्त सीटी स्कॅन माहितीमुळे शारीरिक माहिती मिळून अचूक रोगनिदान होते. परिणामी औषधोपचार करणार्‍या डॉक्टरांना योग्य नियोजन करता येते.

ही चाचणी कशी करतात?

  • ह्या चाचणीसाठी १८ एफ सोडिअम फ्लोराइडचे इंजेक्शन शिरेतून (इंट्राव्हेनस – आयव्ही) दिले जाते आणि त्यानंतर अर्ध्या तासाने बोन स्कॅन केला जातो.

चाचणीची तयारी कशी करतात?

  • ह्या बोन स्कॅनसाठी पूर्वतयारी लागत नाही. स्कॅनच्या आधी तसेच नंतरही आपण आपले नेहमीचे खाणेपिणे घेऊ शकता तसेच (लागू असल्यास) औषधे घेणेही चालू ठेवू शकता.
  • अर्थात आधी वेळ ठरवणे आवश्यक असते.

सावधानी

  • संबंधित डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज गर्भवतींचे ह्या पद्धतीने स्कॅनिंग केले जात नाही. चाचणी घेण्यापूर्वी रोग्याने आपल्या स्थितीबाबत बोलणे आवश्यक आहे.
  • स्तनपान करवणार्‍या मातांनी इंजेक्शननंतर एका पूर्ण दिवसासाठी आपल्या बाळास अंगावरून दूध पाजू नये.

चाचणीची कार्यपद्धती कशी आहे?

  • रोग्याचा वैद्यकीय पूर्वेतिहास विचारला जातो तसेच पूर्वीच्या संबंधित चाचण्यांचे रिपोर्ट गोळा केले जातात.
  • रोग्यास सोयीस्कर व सुटसुटीत कपडे घालण्यास सांगितले जाते.
  • आयव्ही कॅन्युला लावून आयसोटोप (समस्थानीय) टोचला जातो.
  • रोग्यास ३०-६० मिनिटे वाट पाहण्यास सांगितले जाते.
  • रोगी लघवीस जाऊन आल्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेतात. ह्याला २०-२५ मिनिटे लागतात.
  • स्कॅनिगनंतर आयव्ही कॅन्युला काढून रोग्यास कपडे बदलण्यास सांगितले जाते व हलके खाणे दिले जाते.
  • जुने तसेच नवीन रिपोर्ट नेण्याची वेळ ठरवून दिली जाते.

६८ गॅलिअम डोटा पेप्टाइड

पीईटी/सीटी स्कॅन

६८ गॅलिअम डीओटीए पेप्टाइड पीईटी / सीटी स्कॅन - न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर (एनईटी) चे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम आहे.

न्युरो-इंडोक्राइन ट्युमर म्हणजे काय?

जीआयटी, पांथरी, फुफ्फुसे इ. अवयवांवर अशा प्रकारचे ट्यूमर होतात. जीआयटी तसेच फुफ्फुसांचे कार्सिनॉइड ट्यूमर, पांथरीचा इंसुलिनोमा, गॅस्ट्रिनोमा ही त्याची काही उदाहरणे आहेत. काही रोगी इंट्रॅक्टेबल डायरिया (अतिसार), फ्लश इ. सारखी लक्षणे दाखवतात. त्यांना वैद्यकीय परिभाषेत कार्सिनॉइड सिंड्रोम म्हणतात.

६८ गॅलिअम डीओटीए पेप्टाइड पीईटी स्कॅन म्हणजे नक्की काय?

६८ गॅलिअम डीओटीए पेप्टाइड हे एक किरणोत्सारी केंद्रक आहे. त्याचे अर्धायन (हाफ लाइफ) अगदीच कमी म्हणजे १ तासाचे असते. विशिष्ट स्थितीत किरणोत्सारी (पोझिशन एमिटिंग) हे द्रव पेप्टाइड्सना जोडलेले असते. हे नंतर विविक्षित गटातील ट्यूमरच्या ग्राहक पेशीला जोडले जाते. ह्या ट्यूमरना न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर म्हणतात. असे ट्यूमर शोधण्यासाठी हे द्रव वापरले जाते. ह्यामुळे औषधोपचारांचे पर्याय निश्चित करण्याआधी रोगाचे स्वरूप कळण्यासाठी तसेच नंतरच्या प्रतिसादांबाबत समजण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

68 गॅलिअम डीओटीए पेप्टाइड चे इंजेक्शन दिल्यानंतर केल्या जाणार्‍या पीईटी / सीटी स्कॅनला 68 गॅलिअम डीओटीए पेप्टाइड पीईटी / सीटी स्कॅन असे नाव आहे.

सीटी स्कॅन तसेच एमआरआय पेक्षा हि चाचणी वेगळी आहे कि तुलनायोग्य आहे?

हे कार्यकारी/चयापचयात्मक स्कॅनिंग असून न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरबाबत सीटी व एमआरआय सारख्या चाचण्यांच्या तुलनेमध्ये खूपच जास्त संवेदनशील असल्याचे सिद्ध झाले आहे. औषधोपचारांचे पर्याय निश्चित करण्यासाठी तसेच रोगाचे स्वरूप आणि नंतरच्या प्रतिसादांबाबत समजण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

चाचणी आधी कोणती सावधगिरी बाळगावी लागते?

रोग्याचा निदानत्मक सीटी ह्याआधीच झालेला असल्यास कोणतीही पूर्वतयारी आवश्यक नसते. परंतु रोग्यास, ६८ गॅलिअम पीईटी सोबत सीईसीटी करणे असल्यास त्याला त्याआधी किमान २ तास उपाशी राहणे अत्यावश्यक आहे.

चाचनीचे अनुषांघिक दुष्परिणाम (साईड इफेक्ट) असतात का?

६८ गॅलिअम डीओटीए पेप्टाइड स्कॅन पूर्णपणे सुरक्षित आहे व त्याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत.

पीईटी-सीटी वापरण्यासाठी मार्गदर्शन

वैद्यकीय स्थिती

लक्षण

पीईटी-सीटी चा वापर कधी करावा

ऑन्कॉलॉजी मेंदूतील ट्यूमर

रेडिएशन दिल्यानंतर पुनरुद्भवासाठी तपासणे

  • संभाव्य पुनरुद्भवाची खात्री करणे
  • रेडिएशन टीएक्स नियोजनाचे मार्गदर्शन

डोक्याचा आणि मानेचा कर्करोग

स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख, रेडिएशन उपचारांचे नियोजन

  • टीएक्स मार्गदर्शनासाठी स्टेजिंग
  • प्रभाव निश्चित करणे
  • पुनरुद्भव तपासणे (शस्त्रक्रिया व रेडिएशननंतरच्या शारीरिक बदलांमुळे फक्त सीटी तपासणी अचूक नसते)
  • रॅड टीएक्स नियोजनासाठी मार्गदर्शन

थायरॉइड ग्रंथींचा कर्करोग

आयोडिन निगेटिव मेटास्टॅटिस मध्ये रीस्टेजिंग. टीएक्स देखरेख

  • संभाव्य पुनरुद्भवाचे रीस्टेजिंग
  • i – १३१ नंतरचे अब्लॅशन
  • (-) i-१३१ एक्स डब्ल्यूबी स्कॅन

सॉलिटरी पल्मनरी नोड्यूल

वर्गाकरण: निरुपद्रवी की जीवघेणा

  • पल्मनरी नोड्यूल >०.५ सेंमी व < ४ सेंमी
  • (-) पीईटी-सीटी:फॉलोअप ३ मी, सीटी सोबत
  • (+) पीईटी-सीटी:बायोप्सी आणि गरजेनुसार टीएक्स

फुफ्फुसांचा कर्करोग

रोगनिदान, स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख, रेडिएशन उपचारांचे नियोजन

  • कार्यपद्धतीची खात्री करणे
  • टीएक्स च्या आधी व नंतर मेटास्टॅटिस मूल्यमापन
  • टीएक्स च्या प्रभावीपणाची निश्चिती
  • संभाव्य पुनरुद्भवाची खात्री करणेe
  • रेडिएशन टीएक्सनियोजनासाठी मार्गदर्शन

इसोफेगल कर्करोग

स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख, रेडिएशन उपचारांचे नियोजन

  • कार्यपद्धतीची खात्री करणे
  • टीएक्स च्या आधी व नंतर मेटास्टॅटिस मूल्यमापन
  • टीएक्स च्या प्रभावीपणाची निश्चिती
  • संभाव्य पुनरुद्भवाची खात्री करणे
  • रेडिएशन टीएक्सनियोजनासाठी मार्गदर्शन

स्तनाचा कर्करोग

डब्ल्यू/बी स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख

  • टीएक्स मार्गदर्शनासाठी डिस्टंस मेटास्टॅटिस करता आरंभिक स्टेजिंग
  • प्राथमिक/आरंभिक डीएक्स करता सूचित नाही
  • ऍक्सिलाच्या प्रारंभिक स्टेजिंगकरता सूचित नाही
  • टीएक्स च्या प्रभावीपणासाठी आधी व नंतर केमोथेरेपी
  • संभाव्य पुनरुद्भवाची खात्री करणे
  • रेडिएशन टीएक्स नियोजनासाठी मार्गदर्शन

कोलोरेक्टल कर्करोग

स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख

  • कार्यपद्धतीची खात्री करणे
  • टीएक्स आधी व नंतर मेटास्टॅटिस मूल्यमापन
  • टीएक्स प्रभावीपणाची निश्चिती करणे
  • वाढत्या cea सोबत पुनरुद्भव
  • रेडिएशन टीएक्सनियोजनासाठी मार्गदर्शन

पुनरुत्पादन मार्गातील ट्यूमर

  • स्त्रिया:
    • गर्भाशयमुखाचा तसेच एंडोमेट्रिकल कर्करोग
    • गर्भाशयाचा कर्करोग
  • पुरुष:
    • वृषणाचा (टेस्टिक्युलर)
    • लिंग व प्रोस्टेट ग्रंथीचा
  • स्त्रिया:
    • आरंभिक स्टेजिंग, रीस्टेजिंग, स्टेजिंग, रेडिएशन उपचारांचे नियोजन आरंभिक स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख रीस्टेजिंग
  • पुरुष:
    • सीटी/एमआरआय मध्ये दिसणारा लिम्फ नोडल गाठींचा विकास
  • आरंभिक स्टेजिंग, (-) किंवा समान सीटी अथवा एमआरआय नंतर
  • वाढत्या ca१२५ सोबत संभाव्य पुनरुद्भव
  • वाढत्या ट्यूमर मार्कर्ससोबत संभाव्य
  • ग्लीसन्स स्कोअर जास्त/वाढता पीएसए

लिम्फोमा

स्टेजिंग, रीस्टेजिंग, टीएक्स देखरेख

  • टीएक्स मार्गदर्शनासाठी ज्ञात आजाराचे स्टेजिंग
  • केमोथेरेपीच्या आधी व नंतर देखरेख
  • रेडिएशन टीएक्स नियोजनासाठी मार्गदर्शन

न्यूरॉलॉजी एपिलेप्सी/रिफ्रॅक्टरी सीझर

शस्त्रक्रियेआधी Foci ची स्थान-निश्चिती

  • शस्त्रक्रियेआधी सीझर फोकस ची स्थाननिश्चिती

डीमेन्शिया

रोगनिदान पार्किन्सन्स प्लस आजाराच्या लक्षणांपासून वेगळे ओळखणे

  • अल्झायमर्स रोग आणि डीमेन्शियाच्या इतर रूपांमधील फरक ओळखणे, उदा. एफटीडी
  • एमएसए, पीएसपी, सीबीजीडी मधील फरक ओळखणे

कार्डिओलॉजी इश्केमिक हृदयरोग डायलेटेड कार्डिओमायोपॅथी इडिओपॅथिक वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, कार्डिऍक सार्कोडिओसिस

मायकॉर्डिअल इश्केमिया इन्फ्लेमेटरी मायोकार्डिऑटिसचे निदान करण्यासाठी मायोकॉर्डिअल व्हाएबिलिटी

  • अमोनिया पीईटी स्कॅन –९५% पेक्षा जास्त संवेदनशीलता आणि विशिष्टता
  • एफडीजी पीईटी स्कॅन- कार्डिऍक व्हाएबिलिटीच्या मूल्यमापनासाठी गोल्ड स्टॅँडर्ड

१८ एफ सोडिअम फ्लोराइड बोन स्कॅन

सर्व प्रकारचे कर्करोग हाडांची स्थिती – मोडलेली हाडे, ट्यूमर, संसर्ग इ.

  • मेटास्टॅटिक सर्वेक्षण – एमडीपी पेक्षा जास्त संवेदनशीलता आणि विशिष्टता
  • न्यूक्लिअर बोन स्कॅन
  • शारीरिक सीटी लेजन्सच्या अचूक स्थान-निश्चिती सहित उच्च संवेदनशीलता आणि विशिष्टता

ऑन्कॉलॉजिकल नसलेली एफडीजी ऍप्लिकेशन्स संसर्ग

पीयुओ ऑर्थोपेडिक्स

  • ताप, मधुमेही पाय इ. ची कारणमीमांसा निश्चित करणे, संसर्गित प्रोस्थेसिस

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate