कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत. साध्या पेशींमधून कर्कपेशी तयार होतात. पेशीकेंद्राच्या गुणसूत्रबदलांमुळे असे होते हे नक्की. आता हे बदल का घडतात याबद्दल काही थोडी माहिती कळली आहे, ती पुढीलप्रमाणे : निसर्गत:आपल्या शरीरात नेहमीच थोडया कर्कपेशी सतत तयार होत असतात. त्यातील ब-याच कर्कपेशी आपोआप नष्ट होतात. मात्र काही शिल्लक राहतात. काही रासायनिक पदार्थांशी संबंध येणे : उदा. रंगात वापरले जाणारे काही रासायनिक पदार्थ, डांबरापासून बनवलेली काही रसायने, काजळी (उदा. कारखान्यांच्या धुराडयांची काजळी), ऍसबेस्टॉस (ज्याचे पत्रे बनवले जातात), पेट्रोलियम ज्वलनानंतर तयार झालेले वायू, सिगरेट-विडीमधील निकोटिन, इत्यादी.
किरणोत्सर्गी पदार्थ : म्हणजे अणुविभाजनानंतर तयार होणारे ऊर्जाभारित किरण. यामुळे पेशीकेंद्रात निश्चित बदल होतो. अणुभट्टया व अणुविभाजन प्रक्रिया वापरणा-या अनेक कारखान्यांच्या आजूबाजूच्या लोकांना व कामगारांना विशिष्ट प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात होतात हे दिसून आलेले आहे. जपानमध्ये अणुबाँब टाकल्यानंतर लक्षावधी लोकांना व त्यांच्या पुढच्या पिढयांना अनेक प्रकारचे कर्करोग झाले हे याचे सर्वात मोठे व भयानक उदाहरण आहे. अणुभट्टीची राख ही किरणोत्सर्गी म्हणून कर्करोगाला कारण ठरते. एखाद्या जागी सतत घर्षण : त्वचेवर एखाद्या ठिकाणी सतत घर्षण किंवा अन्य त्रास (उदा. उष्णता) होत असल्यास काही जणांना त्या ठिकाणी कर्करोग होतो असे आढळले आहे. उदा. काहीजणांना कमरेवरच्या धोतराच्या रेघेवर कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. पण हे केवळ त्वचेपुरतेच मर्यादित आहे.
तिखट पदार्थ खाण्याचे जास्त प्रमाण असलेल्या भागात जठराच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे असे दिसते, पण याबद्दल अजून निश्चिती होणे आवश्यक आहे.
व्यसने
दारू व तंबाखू यांचा कर्करोगाशी संबंध आहे. दारूमुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याहीपेक्षा धूम्रपान आणि फुप्फुसाचा कर्करोग यांतला संबंध अधिक पक्का आहे. या दृष्टीने धूम्रपान हे अधिक घातक व्यसन आहे असे म्हणता येईल. गुटखा खाण्यामुळे तोंडाचा कर्करोग आढळतो. अनेक विषाणूंचा कर्करोगाशी संबंध सिध्द होत आहे. (उदा. गर्भाशय कर्करोग
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे....
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे.
नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्...