कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात. यासाठी कर्करोगाची शक्यता मनात बाळगून रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष दिले तरच कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. यासाठी खालील घटना कर्करोग सूचक मानून पुढे तपासणीसाठी पाठवले पाहिजे. वजन एकदम कमी होणे (विशेषतः उतारवयात) अचानक रक्तपांढरी होणे भूक मरणे शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव (गर्भाशयाचा कर्करोग) स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे (स्तनांचा कर्करोग) आवाज बदलणे, बसणे (स्वरयंत्राचा कर्करोग) खोकल्यातून/बेडक्यातून रक्त पडणे (फुप्फुसाचा किंवा श्वासनलिकेचा कर्करोग) अन्न गिळताना आत अडकल्यासारखे वाटत राहणे (अन्ननलिकेचा कर्करोग) अन्न खाल्ल्यावर बराच काळ पोट जड वाटणे, करपट ढेकरा निघणे, न पचलेले अन्न उलटणे, इ. (जठराचा कर्करोग) तोंडात कोठेही बरा न होणारा, न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे (तोंडाचा कर्करोग) लघवीतून किंवा शौचातून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव (मूत्राशय, किंवा गुदाशय यांचा कर्करोग) शौचविसर्जनाच्या सवयी अचानक बदलणे, बध्दकोष्ठतेची तक्रार (मोठया आतडयाचा कर्करोग) कोठूनही (नाक, हिरडया, लघवी, शौच, गर्भाशय) अचानक कारणाशिवाय रक्तस्राव (रक्तपेशींचा कर्करोग) काखेत, जांघेत, गळयात, दगडासारख्या कडक गाठींचे अवधाण येणे (अर्थात या अवस्थेत रोग निदानाला उशीर झालेला असतो)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्...
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे....