অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्ण रोपण तंत्रज्ञान (कॉक्लिअर इम्प्लांट)

कर्ण रोपण तंत्रज्ञान (कॉक्लिअर इम्प्लांट)

कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल माहिती

कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. ज्याच्या सहाय्याने कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते. ज्या व्यक्तीस श्रवण यंत्र फायदेशीर नसते त्या व्यक्तीस Cochlear Implant यशस्वीरित्या हे आवाज ऐकवण्याचे काम करते. 1980 च्या मध्यांपासून हा तंत्रज्ञानाचा वापर तीव्र ते अति तीव्र श्रवण दोष असलेल्या सुरु झाला आहे. छोटी शस्त्रक्रिया करून हे यंत्र कानामागील त्वचेखाली बसवले जाते. इम्पलांट आतील कानाचा खराब झालेला भाग बायपास करून थेट कानाच्या नसेला उत्तेजित करते.


आकृती १ - कानात टाकलेल्या कर्णरोपणाच्या शस्रक्रियेद्वारे आतील भाग व बाह्य भाग दिलेल्या आकृतीत दर्शविला आहे

कॉक्लिअर इम्प्लांट चे भाग

कॉक्लिअर इम्प्लांट अंतर्गत व बाह्य असे दोन भाग आहेत. बाह्य भागामध्ये मायक्रोफोन, स्पीच प्रोसेसर आणि हेड पीस (आकृती 2 (अ) यांचा समावेश होतो. तसेच रिसिव्हर कॉइल व इलेक्ट्रोड ऑरे अंतर्गत भागाचा हिस्सा आहे. बाह्य भाग हा शरीरावर (कानावर) घातला जातो तर अंतर्गत भाग हा शस्त्रक्रिये द्वारा कानाच्या आत (Cochlear) मध्ये बसवला जातो.(आकृती 1)


आकृती २ (अ)


आकृती २ (ब)

कॉक्लिअर इम्प्लांटचे काम

कॉक्लिअर इम्प्लांट कसे काम करतात ते खाली दिलेल्या प्रमाणे सांगितले आहे.

वातावरणातील आवाज माईक्रोफोन द्वारा एकत्रित करून छोट्या बारीक केबल द्व्रा हा आवाज कानावर घातलेल्या स्पीच प्रोसेसर कडे पाठविला जातो. (कानामागील मशीन सारखे दिसत्प) (आकृती 2 (अ)

  • स्पीच प्रोसेसर हे एक सूक्ष्म संगणक आहे, जसे आत आलेल्या आवाजाचे रुपांतर विद्युतीय (electrical) सांकेतिक भाषेमध्ये करते.
  • स्पीच प्रोसेसर मधील आवाजाचा संकेत त्याच बारीक केबलद्वारे हेडपिस रेडियो कडे पाठविला जातो, नंतर रेडियो तरंगाच्या सहाय्याने तो आवाज इम्प्लांटच्या आतील भागाकडे पाठविला जातो.
  • तो आवाज अंतरकर्णामध्ये बसविलेल्या विद्युत ऑरे (electrode array) द्वारा कानाच्या नसेला संकेत पाठवितो. तोच विद्युतीय संकेत अर्थपूर्ण आवाज ओळखला जातो.
  • थोडक्यात सरळ शब्दात सांगायचे झाले तर, विद्युतीय संकेत थेट कानाच्या नसेल दिला जातो. कानाची नस तोच संकेत आपल्या पर्यंत पोहोचवते.
  • ज्या व्यक्तींना/मुलांना सर्वात जास्त पॉवर चे मशीनही भाषा समज व ओळखायला फायदा करत नाही त्यांना अशा सिग्नल प्रक्रिया व प्रसार माध्यमाचा फायदा होऊ शकतो.
  • योग्य स्पीच व भाषा विकासासाठी लागणारा चांगला आवाज इम्प्लांट कॉक्लिअर इम्प्लांटच्या सहाय्याने व्यक्तीस/मुलाला काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा लागू शकतात.
  • शस्त्रक्रिये नंतर चे किमान ऐकवायचे संवाद प्रशिक्षण मुलाला तोंडी संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

कॉक्लिअर इम्प्लांट करिता ADIP मार्गदर्शक सूचना

सुधारित ADIP योजनेनुसार (2014 पासून लागू) दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सुचानांपासून कोणत्या मुलांना कॉक्लिअर इम्प्लांटने फायदा होऊ शकतो स्पष्टपणे सांगता येईल.

खालील दिलेल्या अटी पूर्ण होऊ शकत असतील तर मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट होऊ शकतो:

  • मुलाचे वय 1 8 वर्ष असून ऐकण्याचा त्रास जन्मापासून आहे.
  • मुलाच्या दोन्ही कानात तीव्र अती तीव्र श्रवण दोष असावा (Serve to profound श्रवणदोष)
  • मुलाला श्रवण अपंगत्वा व्यतिरिक्त दुसरे कोणते अपंगत्व नसावे.
  • मुलाने कमीत कमी ३ ते ६ महिने कानाच्या यंत्राचा उपयोग केलेल्या असावा व त्या कानाच्या यंत्राचा योग्य तो फायदा नसल्यास –

Contraindications ADIP – योजनेनुसार (2014 पासून लागू)

खालील अटी असलेल्या व्यक्तीस/मुलां वर कॉक्लिअर इम्प्लांट होऊ शकणार नाही:

  • मुलाचे वय 5 वर्षापेक्षा जास्त असेल आणि श्रवण दोष खूप उशिरा निदान झाले असून त्याला तीव्र व अती तीव्र श्रेणीचा श्रवण दोष आहे.
  • मुलामध्ये मतीमंद किंवा दुसरा कोणता मानसिक आजार/ त्रास असेल तर भाषा शिकण्यामध्ये अडथळे येऊ शकतात
  • कर्णयंत्राने पुरेपूर चांगला फायदा असेल
  • जर कानाची नस किंवा मध्यवर्ती श्रवण विषयक पद पथ (Central auditory pathway) यामध्ये त्रास असेल तर
  • कानाच्या पडद्याला छिद्र असतांना किंवा नसतांना मध्य कानाचा त्रास/रोग कॉक्लिअर पूर्ण विकसित नसल्याने विद्युत (electro) ऑरो आत बसविणे शक्य नसेल किंवा कॉक्लियाचे रुपांतर हाडात झाले असेल.
  • शॉक्रिया करण्याकरिता जर मुलगा सशक्त नसेल उदा. तरुणपणात झालेला मधुमेह (juvenile diabetics)

कर्णरोपणाची (Cochlear Implant) प्रक्रिया

शॉक्रिया आधीची तयारी:

  • वेगवेगळ्या चाचण्या जसे श्रवण चाचणी, वाचा आणि भाषेची, बुद्धीची चाचणी, शैक्षणिक आणि/ किंवा श्रवण विषयक प्रक्रिय, सर्व चाचण्या झाल्यावर योग्य श्रवण यंत्रासोबत उपचार करणे किमान 3’ 8महिने
  • सर्व तपासणींच्या निकालावर मुलाची शॉक्रियेसाठी योग्य पात्रता आहे कि नाही ठरवले जाईल आणि नंतर हॉस्पिटलला देणारे पत्र तयार करून देण्यात येईल.
  • पालकांना मुलांसमवेत ऑटोलेरिडगोलॉजीस्टला (otparyngpogist) ENT डॉक्टर ला भेटावे लागेल.
  • मुलाच्या कानाची रेडियोलॉजिकल तपासणी जसे CT, MRI, x-ray करावे लागतील आणि त्याबद्दल डॉक्टर शस्त्रक्रियेबद्दल निर्णय घेतील.
  • सर्जन/ डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी योग्य ते लसीकरण मुलाला देण्यास सांगतील. लसीकरण झाल्यावर २-४ आठवड्यानंतर मुलावर शॉक्रिया करण्यात येईल.

शस्त्रक्रियेची प्रक्रिया:

शस्त्रक्रिया ENT सर्जन द्वारा करण्यात येईल. सामान्यतः शस्त्रक्रिया सर्वसाधारण भूल (General anesthesia) देऊन करण्यात येते. शस्त्रक्रिया अंदाजे एक ते दीड तास चालते. त्यानंतर टाके काढले जातात.

शस्त्रक्रिये नंतरचे क्रियाकलाप

श्रवण पुनर्वसन : शस्त्रक्रिये नंतर : वाक-भाषा उपचार, ह्यालाच mappen 8 असे म्हणतात.   (CT प्रोग्रामिंग, ऑडीटरी वर्बलथेरपी, समुपदेशन (counsepng)

वाक-भाषा थेरपी : एका आठवड्यात ३ तास असे १० आठवडे एकंदरीत ३० तास वाक-भाषा थेरपी देण्यात येईल. यापेक्षा कमी थेरपी फायदेशीर ठरणार नाही, मलाच्या गरजेनुसार हे थेरपीची वारंवारता वाढवणे गरजेचे ठरेल. अशावेळी अधिकाऱ्यांकडून पूर्ण परवानगी घेणे आवश्यक आहे.

स्पीच प्रोसेसर ३-४ आठवड्यानंतर सुरु करण्यात येईल व सहन होणार योग्य रित्या आवाजाची पातळी ठरवण्यात येईल. ह्या आवाजाची पातळी कालांतराने तपासून ती आवश्यकतेनुसार बदलण्यात येऊ शकते. आवाजाची ही पातळी ठरवण्यासाठी पंधरवडा, मग महिन्यातून एकदा व कालांतराने वर्षातून एकदा यावे लागेल.

ऑडियोलॉजिकल (ओरल) पुनर्वसन हे वाक-भाषेचे मुलाला प्रशिक्षण, ऑडीटरी वर्बलथेरपी आणि पालकांचे समुपदेशन (कौन्सिलींग ) ह्याच्या सहाय्याने करण्यात येते.

स्पीच प्रोसेसरचे प्रोग्रामिंग आणि वाक-भाषेचे प्रशिक्षण – आठवड्याचे ३ तास असे १० आठवड्यापर्यंत म्हणजे किमान ३० तास असे प्रशिक्षण घ्यावे. ह्यापेक्षा कमी हे मुलासाठी प्रभावी होऊ शकणार नाही. प्रशिक्षणाची वारंवारता ही गरजेनुसार वाढवता येऊ शकते. मात्र अधिक प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांकडून नीट परवानगी घेणे आवश्यक आहे. मॉपींग आणि वाक-भाषेची कामगिरी व प्रगती बघण्या/तपासण्यासाठी ६, ९, व १२ महिन्यांनी केंद्रात यावे लागेल.

कॉक्लिअर इम्प्लांटचे फायदे

ज्या मुलांना मशीनचा थोडा किंवा काहीच फायदा नसेल त्यांना कॉक्लिअर इम्प्लांटने खूप फायदा होतो.

तरीही प्रत्येक मुलाला झालेला फायदा वेगवेगळा असू शकतो. कोणाला कमी तर कोणाला जास्त फायदा होतो. काही फायदे खाली नमूद केले आहेत.

  1. सामान्य पातळीत बोललेल्या भाषा समजणे.
  2. ओठांची हालचाल न बघता भाषा समजणे.
  3. फोनची रिंग/आवाज, अलार्म आणि संभाषण ऐकण्यात मदत होते.
  4. टी.वी. वरील कार्यक्रम ऐकून समजण्यास सोपे होते.
  5. संगीताचा आस्वाद घेणे शक्य होते.
  6. वेगवेगळ्या आवाजांची अनुभूती होते: सौम्य, मध्यम व तीव्र
  7. आवाजाची गुणवत्ता, आवाजातील चढ-उतार व्यवस्थित घेतो.

कॉक्लिअर इम्प्लांटचे जोखीम आणि मर्यादा

कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन खूप धोकादायक नसून थोड्या गुंतागुंतीच्या जोखीम बाबीवर लक्ष देणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही शस्त्रक्रियेमध्ये असलेल्या धोका असतो. जसे: रक्तस्त्राव, कोणत्या प्रकारचे संक्रमण (infection) व अनेस्थेसिया विषयक काही जोखीम शॉक्रिये मधील व नंतर होणाऱ्या गुंतागुंतीचा दर फार कमी आहे. मात्र जर कॉक्लिअर इम्प्लान काम करायचे थांबले तर ADIP योजने अंतर्गत १० वर्षाचे कॉक्लिअर इम्प्लांट ची (CI) कामगिरीची देखभाल व प्रोसेसर मधले सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन आहे. बाह्य भागाची ३ वर्षाचे वॉरंटी वाढवणे सुद्धा शक्य होऊ शकते. हे फक्त ADIP योजने अंतर्गतच आहे. बाजारातील इतर कोणत्या हि मशीन सोबत असे नसते.

खाली दिलेले १’ ८ मुद्दे नित वाचा व तुमचा मुलगा कॉक्लिअर इम्प्लांट साठी योग्य उमेद्वार आहे का ते ठरवा.

१) तुमच्या मुलाचा श्रवणदोष तीव्र ते अती तीव्र श्रेणीतला सेन्सरीन्यूरल (SN) आहे का? हो/नाही
२) याच्या पहिल्या दोन वर्षातच मुलाला श्रावण दोष आहे हे लक्षात आले हो/नाही
३) श्रवण यंत्र लावून वाक-भाषेचे प्रशिक्षण घेऊन सुद्धा मुलाला श्रवणयंत्राचा पुरेसा फायदा होत नाही हो/नाही
४) मानसशास्त्रज्ञांच्यानुसार तुमच्या मुलाला मानसिक/संज्ञातमक त्रास आहे का? हो/नाही
५) कानातून पाणी येते किंवा कानामध्ये इन्फेक्शन आहे का? हो/नाही

जर वरील प्रश्नांचे तुमचे हो असे असतील तर तुमचा मुलगा ADIP योजनेनुसार कॉक्लिअर इम्प्लांटसाठी योग्य उमेदवार आहे. असे असेल तर त्वरित तुमच्या जवळच्या कॉक्लिअर इम्प्लांटच्या केंद्रात संपर्क करा. त्या केंद्रातील (टीम) संघ प्रमुख तुम्हाला तुमच्या मुलाचे शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेण्यास मदत करतील.

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे कॉक्लिअर इम्प्लांटसंबंधित सर्व चाचण्या करत असाल तेव्हा त्या संबंधित काऊन्सिलिंग (समुपदेशन) तुम्हाला योग्य वास्तववादी अपेक्षा करण्यात मुलाच्या भाषा शिक्षणातील हे खूप महत्वाचे आहे हे समजावून देतील.

ह्या तंत्रज्ञानामध्ये कानाचे डॉक्टर, श्रवणतज्ञ, वाक-भाषा तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ व समाजसेवकांचा समावेश असतो. हे सर्व एक संघ (team) म्हणून शस्त्रक्रीयेआधी व नंतरच्या फेर तपासणी व उपचारामध्ये तुम्हाला मदत करतील.

 

 

पीडीएफ (pdf ) फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्त्रोत : अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, मुंबई

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate