बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे. बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतर्कर्ण, मेंदूची संबंधित आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यापैकी कोठेही दोष असेल तर बहिरेपणा येतो. काही मुलांमध्ये जन्मजात कर्णबधिरता असते व त्यातला मुकेपणा हा बहिरेपणाचाच परिणाम असतो. हा आजार वेळीच ओळखू आल्यास काही उपचार व प्रशिक्षण करता येते. कोणतेही मूल ऐकून ऐकूनच बोलायला शिकते, म्हणून त्याच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे. काही मुलांना जन्मजात बधिरता असते. हे आईवडिलांच्या लक्षात यायला उशीर होतो. यावर औषधोपचार काही नाही, मात्र हा दोष लवकर ओळखून त्या दृष्टीने संगोपन व प्रशिक्षण करणे आवश्यक असते. बधिरतेमुळे शब्द कळत नाहीत, म्हणून ही मुले मुकी राहतात. अशा मुलांना सुरुवातीस वेगळया शाळांमध्ये घालावे लागते. अशा शाळा काही शहरांमध्ये आहेत. आधीचे बाळ मूकबधिर असेल तर पुढील बाळ देखील असे होण्याची बरीच शक्यता असते.
गरोदरपणात आईला जर्मन गोवरचा ताप किंवा गालफुगीचा ताप आल्यास गर्भावर हा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची लवकरात अशी तपासणी केली पाहिजे. टाळी वाजल्यावर दचकणे ही सर्वात सोपी खूण आहे. एक महिन्याचे बाळ टाळीला दचकते. टाळीने बाळ दचकत नसेल तर बधिरता असू शकते. तसेच आईचा आवाज, चमचा- वाटीचा ओळखीचा आवाज वगैरे आवाजांना बाळ प्रतिसाद देते की नाही हे आईने ध्यानात घ्यायला पाहिजे. चार महिन्याचे बाळ आवाजाच्या बाजूच्या दिशेला डोळे फिरवते.
सहा महिन्याचे बाळ वरच्या आवाजाच्या दिशेने डोळे वळवते. वर्षाचे बाळ तोंडाने बोकाळते पण केवळ बा, बा, मा, मा एवढा आवाज पुरेसा नाही, निरनिराळे आवाज काढले पाहिजेत. कर्णबधिरता ओळखण्याची नंतरच्या वयात एक महत्त्वाची खूण आहे. अशा मुलाला हवी आहे ती वस्तू न सांगता ते त्या वस्तूकडे बोट करते. (उदा. पाण्याचा माठ, जेवण,इत्यादी) मात्र यावेळी मूल थोडे मोठे झालेले असते. दोन वर्षाचे बाळ बोलायला लागते. असे झाले नाही तर तपासणी केली पाहिजे. कधीकधी बहिरेपणा पूर्ण नसतो, थोडाच असतो. अशा वेळी तपासणीसाठी यंत्रांची मदत होते.
जन्मजात नसलेला, पण नंतर तयार होणारा बहिरेपणा हा बहुधा एका बाजूला येतो. वर लिहिल्याप्रमाणे त्याची कारणे कानाच्या निरनिराळया भागांत असू शकतात ती अशी
बहिरेपणाचे आपल्या देशात सर्वात जास्त आढळणारे महत्त्वाचे कारण लांबलेली मध्यकर्णसूज हेच आहे. कान फुटल्यावर पूर्ण आणि योग्य उपचाराची व्यवस्था होणे हे महत्त्वाचे असते. हे आपणही करू शकतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...