हा डास चावल्यामुळे होणारा रोग किंवा आजार आहे. डासांचे अनेक प्रकार आहेत. आनिफिलास डासांच्या माद्यांमार्फत या जंतूचा प्रसार होतो. हे डास बहुधा स्वच्छ पाण्यात वाढतात. विहिरी, फार घाण नसलेले सांडपाणी, पावसाळ्यात निर्माण होणारी डबकी इ. डास अडचणीच्या जागेत विश्रांती घेतात व रात्री चावतात.
हिवतापाचा उपद्रव जुलै ते डिसेंबर (पाणी जास्त असेल तेव्हा) या काळात होतो. हिवतापाने आजरी पडण्याचे प्रमाण याच काळात सर्वात जास्त असते.
हिवताप हा आजार सर्वत्र आढळतो. यात मुख्यतः थंडी वाजून ताप येतो. थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो. ताप थोडा टिकतो (दोन-तीन तास) व नंतर घाम येऊन उतरतो. ताप सहसा दुपार नंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो. याच बरोबर आणखीन काही ठळक लक्षणे.
१) फ्लूसारखा ताप,
२) थंडी
३) स्नायूदुखी / अंगदुखी
४) डोकेदुखी
५) उलटया जुलाब
अशी लक्षणे दिसतात. तसेच खोकला, कावीळ आणि डोळे खूप निस्तेज होऊ शकतात. हुडहुडी भरून थंडी वाजणे, ताप आणि पाठोपाठ घाम असे सलग २-३ दिवस चालू राहते.
धोकादायक लक्षणांमध्ये भरपूर रक्त स्त्राव बेशुद्धपणा, किडनी निकामी होणे, मज्जातंतूचे त्रास आणि काही वेळेला तर माणूस मरू पण शकतो. डास चावल्यापासून सुमारे २-३ आठवड्याने लक्षणे दिसू लागतात.
योग्य त्या औषधोपचाराने मलेरिया बरा होऊ शकतो. वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जाने. गरोदर बाईला मलेरिया होणे हे धोक्याचे असते.
मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर कट येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. रक्त नमुना तपासल्या खेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते. म्हणून रक्त नमूना तपासणी अत्यंत महत्वाची आहे.
१. शक्य असल्यास मच्छरदाण्या वापरणे.
२. सांडपाण्याचा निचरा करणे तसेच पाणी साठू देवू नये.
३. मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर ते कपडे घालावेत.
४. डास चावू नये म्हणून शक्य असल्यास क्रिम लावावे.
५. शोषखड्डे तयार करावे.
६. बंद गटारे तयार करण्यावर भर दयावा.
७. सूर्य उगवण्याआधी आणि मावळायच्या वेळीच्या काळात जास्त बाहेर पडू नये.
८. जंतू नाशक फवारणी ग्रामपंचायत मार्फत सर्व ठिकाणी करून घेणे आवश्यक आहे.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/16/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...